सोने चांदी भाव, 23 जून 2020: सोन्याच्या दरात वाढ, चांदी मात्र घसरली

काम-धंदा
रोहित गोळे
Updated Jun 24, 2020 | 12:49 IST

सोने चांदी भाव: सोने आणि चांदी याच्या किंमतीत आज किरकोळ वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचे दर हे काहीसे वाढले आहेत. 

gold and silver rate 23 june 2020 mumbai pune jalgaon kolhapur latur nashik sangli
सोने चांदी भाव, 23 जून 2020  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सोने-चांदीचे दरात आज बदल, सोने वधारले चांदी घसरली
  • कोरोना व्हायरसमुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणुकीचा पर्याय निवडला
  • दिवसेंदिवस सोन्याच्या दरात होतोय वाढ

सोने चांदी  भाव:  सोने चांदी आजचा भाव: सध्या सोन्याची किंमत नवनवे  विक्रम पातळीला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सोने आणि चांदी यांच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज देखील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मात्र आजची वाढ ही फारच किरकोळ आहे. आज सोनं प्रति ग्राम ५० रुपयांनी महागलं आहे. प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४७ हजार ६५० वर बंद झाला. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४६ हजार ६५० वर बंद झाला.   सोन्याच्या दरात वाढ तर चांदीच्या दरात सुमारे ३०० रुपयांची घट दिसून आली. काल ४८ हजार ८०० असलेली चांदी आज ४८ हजार ५०० वर बंद झाली. 

MCX मध्ये सोने चांदी घसरली

 भारतीय बाजारात सोन्याच्या दराने (Gold Price) विक्रमी उंची गाठल्यानंतर (record high) आज पुन्हा सोन्याच्या किंमतीत घट दिसून आली.  MCXमध्ये झालेल्या फ्युचर ट्रेडिंगमध्ये सोन्याच्या किंमती किरकोळ घट दिसून आली. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा दर ४७ हजार ९२० झाला.  गेल्या व्यवहारी सत्रात सोन्याच्या किंमतीने प्रति १० ग्रॅमसाठी  ४८ हजार २८९ रुपये  इतकी विक्रमी उसळी मारली होती. चांदीच्या दरातही घट दिसून आली. MCXमधील फ्युचर ट्रेंडिगमध्ये ०.४ टक्क्यांची घट दिसून आली. प्रति किलो चांदीचा दर ४८ हजार ३११ रुपये झाला.  गेल्या व्यवहारी सत्रात हा दर  ४९ हजार १९० रुपये होता. 
 

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट  सोन्याचे दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४७ हजार ६५० ४७ हजार ६००​
पुणे  ४७ हजार ६५० ४७ हजार ६००
जळगाव  ४७ हजार ६५० ४७ हजार ६००
कोल्हापूर ४७ हजार ६५० ४७ हजार ६००
लातूर ४७ हजार ६५० ४७ हजार ६००
सांगली ४७ हजार ६५० ४७ हजार ६००
बारामती  ४७ हजार ६५० ४७ हजार ६००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४६ हजार ६५०     ४६ हजार ६००    
पुणे  ४६ हजार ६५०     ४६ हजार ६००
जळगाव  ४६ हजार ६५०     ४६ हजार ६००
कोल्हापूर ४६ हजार ६५०     ४६ हजार ६००
लातूर ४६ हजार ६५०     ४६ हजार ६००
सांगली ४६ हजार ६५०     ४६ हजार ६००
बारामती  ४६ हजार ६५०     ४६ हजार ६००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४८ हजार ५००     ४८ हजार ८००
पुणे  ४८ हजार ५०० ४८ हजार ८००
जळगाव  ४८ हजार ५०० ४८ हजार ८००
कोल्हापूर ४८ हजार ५०० ४८ हजार ८००
लातूर ४८ हजार ५०० ४८ हजार ८००
सांगली ४८ हजार ५०० ४८ हजार ८००
बारामती  ४८ हजार ५०० ४८ हजार ८०० 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी