सोने चांदी भाव, 23 नोव्हेंबर 2020 :सोने झाले महाग, चांदीत किरकोळ घसरण, चेक करा 23 नोव्हेंबरचा भाव

Gold and Silver Rate | स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोनेच्या भावात वाढ पाहायला मिळाली.

 gold and silver rate 23 November 2020
सोने चांदी आजचा भाव, 23 नोव्हेंबर 2020 

थोडं पण कामाचं

  • स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोनेच्या भावात वाढ पाहायला मिळाली.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर, आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी वायदा  भावात घट पाहायला मिळाली.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  पहिल्या दिवशी सोमवारी वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली.  

Gold Price , सोने चांदी भाव, २३ नोव्हेंबर २०२०:  नवी दिल्ली : स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोनेच्या भावात वाढ पाहायला मिळाली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)वाढ पाहायला मिळाली.  एमसीएक्स ((MCX- Multi-Commodity Exchange)वर सकाळी डिसेंबर 2020 च्या सोन्याचा वायदा भावात 0.08 टक्क्यांची 38 रुपयांची किरकोळ वाढ होऊन प्रती 10 ग्रॅम 50,250 रुपयांवर ट्रेंड करत होता.  या शिवाय जागतिक स्तरावर सोन्याचा हाजीर भावात वाढ पाहायला मिळाली. 

दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी त्यांच्या किंमतीत किरकोळ घट दिसली आहे.  एमसीएक्सवर सकाळी डिसेंबर 2020 च्या चांदीचा भाव सकाळी 0.07 टक्क्यांच्या म्हणजे 45 रुपयांच्या घटीसह 62,113 रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती.  या शिवाय जागतिक स्तरावर चांदीचा वायदा भावात घट पाहायला मिळाली. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर, आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी वायदा  भावात घट पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोने डिसेंबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या  0.07 टक्के म्हणजे 1.30 डॉलर  घटीसह 1,876.90   डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव 0.16 टक्के म्हणजे 2.96  डॉलरच्या घटीसह 1,873.92 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  पहिल्या दिवशी सोमवारी वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली.   सकाळी कॉमेक्सवर  मार्च २०२१ च्या चांदी वायदा भावात 0.33 टक्के घटीसह 24.41  डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. पण चांदीची जागतिक हाजीर किंमत 0.41 टक्के  0.10 डॉलरच्या वाढीसह 24.28 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होती. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी