सोने चांदी भाव, 25 नोव्हेंबर 2020 :  सोने -चांदीत तेजी, चेक करा 25 नोव्हेंबरचा भाव

Gold and Silver Rate | जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत सुधार आल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी सोन्याची किंमती 45 रुपयांची तेजी पाहायला मिळाली.

gold and silver rate 25 November 2020
सोने चांदी भाव, 25 नोव्हेंबर 2020  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत सुधार आल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी सोन्याची किंमती 45 रुपयांची तेजी पाहायला मिळाली.
  • राजधानी दिल्लीमध्ये सोन्याची किंमत 48,273 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली होती.
  • कमकुवत मागणीमुळे व्यापाऱ्यांनी आपल्या सौद्याचा आकार कमी ठेवला यामुळे वायदा बाजारात बुधवारी चांदी वायदा किंमत 131 रुपयांच्या घटीसह 59,490 रुपये प्रति किलो झाली.

 Gold/Silver price , 25 November 2020  : जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत सुधार आल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी सोन्याची किंमती 45 रुपयांची तेजी पाहायला मिळाली.   एचडीएफसी सिक्योरिटीजनुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोन्याची किंमत 48,273 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली होती. गेल्या सत्रात ही  48,228 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. दुसरीकडे चांदी 407 रुपयांच्या तेजीसह  59,380 रुपये प्रति किलो झाली होती. गेल्या सत्रात मंगळवारी ती  58,973 रुपये प्रति किलोवर बंद होती.  वायदा बाजारात  सोने आणि चांदीच्या किंमतींत घट झाली होती.  दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने वाढीसह 1,812  अमेरिकी डॉलर प्रति औंस आणि चांदी 23.34 डॉलर प्रति औंसवर सपाट राहिली. 
 

एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ जिंस विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, ‘‘सोने सकाळच्या घटीनंतर उसळी घेऊन वर आला. कोविड-19 च्या व्हॅक्सीनच्या संदर्भात झालेली प्रगती आणि जो बाइडन याची अमेरिकेचे  राष्ट्राध्यक्षाचा पदभार सांभाळण्याची तयारीत प्रोत्साहन पॅकेजची आशा वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. 

कमकुवत मागणीमुळे व्यापाऱ्यांनी आपल्या सौद्याचा आकार कमी ठेवला यामुळे वायदा बाजारात बुधवारी चांदी वायदा किंमत 131 रुपयांच्या घटीसह 59,490 रुपये प्रति किलो झाली.  मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीची डिसेंबरची डिलीवरीच्या कराराची किंमत 131 रुपये म्हणजे 0.22 टक्के घटीसह 59,490 रुपये प्रति किलो झाली. यात 10,245 लॉट व्यापार झाला.  जागतिक स्तरावर न्यूयार्कमध्ये चांदी 0.60 टक्के घटीसह 23.27 डॉलर प्रति औंस झाली. 

कमकुवत हाजीर मागणीमुळे व्यापाऱ्यांनी आपल्या सौद्याचा आकार कमी ठेवला यामुळे  वायदा बाजारात बुधवार सोने 0.11टक्के घटीसह 48,531 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिसेंबरच्या सोना वायदाची किंमत 54 रुपये म्हणजे 0.11 टक्के घटीसह 48,531 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.  यात 4,346 लॉट व्यापार झाला.  आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयार्क में सोना 0.10 टक्के घटीसह 1,809.10 डॉलर प्रति औंस झाला. 
 

महाराष्ट्रात सोने महाग चांदीत बदल नाही

महाराष्ट्रात आज सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. सोनं प्रति 10 ग्रॅम 50 रुपयांनी घट झाली. प्रति 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोन्याचा दर 50,750 रुपयांवर सुरू आहे. तर प्रति 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा दर 49,750   रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर 50,800 रुपयांवर बंद झाला होता. 22 कॅरेट सोन्याचा दर 49,800 रुपयांवर बंद झाला होता.

सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी महाराष्ट्रात चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. काल 60,000  वर असलेली चांदी आजही 60,0 00 रुपयांवर विकली जात आहे. 

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५० हजार ७५० ५० हजार ८००
पुणे  ५० हजार ७५० ५० हजार ८००
जळगाव  ५० हजार ७५० ५० हजार ८००
कोल्हापूर ५० हजार ७५० ५० हजार ८००
लातूर ५० हजार ७५० ५० हजार ८००
सांगली ५० हजार ७५० ५० हजार ८००
बारामती  ५० हजार ७५० ५० हजार ८००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४९ हजार ७५० ४९ हजार ८००
पुणे  ४९ हजार ७५० ४९ हजार ८००
जळगाव  ४९ हजार ७५० ४९ हजार ८००
कोल्हापूर ४९ हजार ७५० ४९ हजार ८००
लातूर ४९ हजार ७५० ४९ हजार ८००
सांगली ४९ हजार ७५० ४९ हजार ८००
बारामती  ४९ हजार ७५० ४९ हजार ८००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६० हजार ००० ६० हजार ०००
पुणे  ६० हजार ००० ६० हजार ०००
जळगाव  ६० हजार ००० ६० हजार ०००
कोल्हापूर ६० हजार ००० ६० हजार ०००
लातूर ६० हजार ००० ६० हजार ०००
सांगली ६० हजार ००० ६० हजार ०००
बारामती  ६० हजार ००० ६० हजार ०००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी