सोने चांदी भाव, 26 मार्च 2021: सोन्याच्या दरात झाली घसरण तर चांदी महागली, फटाफट चेक करा आजचा भाव

Gold and Silver rate | शुक्रवारी सोन्याचा भावात घसरण झाल्याचं पहायला मिळालं तर चांदी महागली आहे. जाणून घ्या आजचा सोने आणि चांदीचा भाव.

Gold Silver Rate
सोने-चांदीचे दर  

Gold Rate : शुक्रवारी (२६ मार्च २०२१) सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचं पहायला मिळालं तर चांदी महागली आहे. भारताची राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावात १४७ रुपयांनी घसरण होत ४४,०८१ रुपये प्रति १० ग्रॅम इतका भाव झाला आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने सोनं स्वस्त झालं आहे. गुरुवारी सोन्याचा भाव ४४,२२८ रुपपायंवर बंद झाला होता. सोन्याच्या भावात घसरण झाली असताना चांदी महागली आहे. चांदीच्या भावात १,०३६ रुपयांनी वाढ होत ६४,२७६ रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. गुरुवारी चांदीचा भाव ६३,२४० रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. (gold and silver rate 26 march 2021 mumbai pune jalgaon kolhapur latur nashik sangli baramati)

आज देशांतर्गत शेअर बाजारात सकारात्मक सुरुवातीमुळे भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १४ पैशांनी मजबूत होऊन ७२.४८ वर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १,७२६ डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव २५.१४ डॉलर प्रति औंस इतका आहे.

वायदा बाजारात चांदीचा भाव 

वायदा बाजारात चांदीच्या भावात १७१ रुपयांनी वाढ होत ६५,०४० रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये मे महिन्यातील डिलिव्हरीसाठी चांदीच्या भावात १७१ रुपये म्हणजेच ०.२६ टक्क्यांनी वाढून ६५,०४० रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला ज्यामध्ये ११,००१ लॉटसाठी व्यापार झाला.

महाराष्ट्रात सोने-चांदीचा भाव काय?

महाराष्ट्रातही सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. मुंबईत सोन्याच्या भावात १६० रुपयांनी घसरण झाल्याने २४ कॅरेट सोन्याचा भाव ४४,७६० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४३,७६० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. तर चांदीच्या भावात ७०० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे चांदीचा भाव ६५,००० रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे.

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४४ हजार ७६० ४४ हजार ९२०
पुणे  ४४ हजार ७६० ४४ हजार ९२०
जळगाव  ४४ हजार ७६० ४४ हजार ९२०
कोल्हापूर ४४ हजार ७६० ४४ हजार ९२०
लातूर ४४ हजार ७६० ४४ हजार ९२०
सांगली ४४ हजार ७६० ४४ हजार ९२०
बारामती  ४४ हजार ७६० ४४ हजार ९२०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४३ हजार ७६० ४३ हजार ९२०
पुणे  ४३ हजार ७६० ४३ हजार ९२०
जळगाव  ४३ हजार ७६० ४३ हजार ९२०
कोल्हापूर ४३ हजार ७६० ४३ हजार ९२०
लातूर ४३ हजार ७६० ४३ हजार ९२०
सांगली ४३ हजार ७६० ४३ हजार ९२०
बारामती  ४३ हजार ७६० ४३ हजार ९२०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६५ हजार ००० ६५ हजार ७००
पुणे  ६५ हजार ००० ६५ हजार ७००
जळगाव  ६५ हजार ००० ६५ हजार ७००
कोल्हापूर ६५ हजार ००० ६५ हजार ७००
लातूर ६५ हजार ००० ६५ हजार ७००
सांगली ६५ हजार ००० ६५ हजार ७००
बारामती  ६५ हजार ००० ६५ हजार ७००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी