सोने चांदी भाव, २६ ऑक्टोबर २०२०:  सोन्याचे वायदा भाव खाली, चांदीत मोठी घसरण, चेक करा २६ ऑक्टोबरचा भाव

Gold and Silver Rate| स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.  

Gold and Silver Rate 26 October 2020
सोने चांदी भाव, २६ ऑक्टोबर २०२० 

थोडं पण कामाचं

  • स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या   पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी वायदा आणि हाजीर भावात घट पाहायला मिळाली.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  पहिल्या दिवशी सोमवारी वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली.

Gold Price , सोने चांदी भाव, २६ ऑक्टोबर २०२०:  नवी दिल्ली : स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.  एमसीएक्स (MCX)वर सकाळी डिसेंबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात 0.48 टक्के 243 रुपयांची घट होऊन प्रती 10 ग्रॅम 50,596  रुपयांवर ट्रेंड करत होता.    जागतिक स्तरावर सोन्याच्या वायदा आणि हाजिर किंमतीत सोमवारी सकाळी घट पाहायला मिळाली. 
 
दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी त्यांच्या किंमतीत घट दिसली आहे.  एमसीएक्सवर डिसेंबर 2020 च्या चांदीचा भाव सोमवारी सकाळी 1.66 टक्के 1,036 रुपयांच्या घटीसह 61,413 रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती.  जागतिक स्तरावर चांदीच्या वायदा आणि हाजिर किंमतीत सोमवारी सकाळी घट पाहायला मिळाली. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या   पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी वायदा आणि हाजीर भावात घट पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोने डिसेंबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या  7.20 डॉलर म्हणजे 0.38 टक्के घटीसह 1,898.10   डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव 0.22 टक्के म्हणजे 4.21  डॉलरच्या घटीसह 1,897.84 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  पहिल्या दिवशी सोमवारी वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर चांदी वायदा भाव गेल्या सत्राच्या  0.46 डॉलर म्हणजे 1.88 टक्के घटीसह 24.21 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव 1.67 टक्के म्हणजे 0.41 डॉलरच्या घटीसह 24.20 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी