Gold Price , सोने चांदी भाव, 27 जानेवारी 2021: नवी दिल्ली : स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली. सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली. एमसीएक्स (MCX)वर सकाळी 10 वाजून 36 मिनिटांनी डिसेंबर 2020 च्या सोन्याचा वायदा भावात 0.55 टक्के 270 रुपयांची घट होऊन प्रती 10 ग्रॅम 48,873 रुपयांवर ट्रेंड करत होता. गेल्या सत्रात फेब्रुवारीच्या सोन्याची किंमत 49,143 प्रती 10 ग्रॅम वर बंद झाली होती. तर दुसरीकडे एप्रिल 2021 च्या कराराचे सोने 252 रुपये म्हणजे 0.51 टक्के घटीसह 49,079 रुपये प्रति 10 ग्रॅम ट्रेंड करत होते. गेल्या सत्रात एप्रिलच्या सोन्याची किंमत 49,331 प्रती 10 ग्रॅम वर बंद झाली होती.
दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी चांदीच्या किंमतीत घट दिसली आहे. एमसीएक्सवर सकाळी 10 वाजून 37 मिनिटांनी डिसेंबर 2020 च्या चांदीचा भाव सकाळी 0.45 टक्के म्हणजे 297 रुपयांच्या घटीसह 66,238 रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. गेल्या सत्रात मार्चच्या कराराची चांदीची किंमत 66,535 रुपये प्रति किलो ग्रॅम बंद झाली होती. दुसरीकडे मे महिन्याच्या डिलेव्हरीची चांदीची किंमत 176 रुपये म्हणजे 0.26 टक्के घटीसह 67,095 रुपये प्रति किलो सुरू होती. गेल्या सत्रात कराराची चांदीची किंमत 67,271 रुपये प्रति किलोवर सुरू होती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी वायदा भावात घट पाहायला मिळाली. कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव 5.90 डॉलर म्हणजे 0.32 टक्के घटीसह 1,848.90 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव 0.19 टक्के म्हणजे 3.44 डॉलरच्या घटीसह 1,847.48 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली. कॉमेक्सवर चांदी मार्च, 2021 वायदा भाव 0.16 डॉलर म्हणजे 0.62 टक्के घटीसह 25.38 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव 0.51 टक्के म्हणजे 0.13 डॉलरच्या घटीसह 25.34 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.