सोने चांदीचा भाव, 27 June 2020: सोनं पुन्हा महागलं जाणून घ्या भाव 

Today Gold and Silver Rate, 27 June 2020 : सोनं आणि चांदीच्या दरात शनिवारी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या मुंबई, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सांगली, लातूर, बारामती या ठिकाणचे सोन्याचे भाव.

Gold Rate
सोने-चांदीचे आजचे दर  

थोडं पण कामाचं

  • तीन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्यावर आता पुन्हा झाली वाढ
  • केवळ सोनेच नाही तर चांदीच्या दरातही झाली वाढ
  • पाहा सोनं आणि चांदीचे नवे दर 

सोने चांदीचा भाव, २७ जून: सोन्याच्या दरात (Mumbai Gold Rate) गेले काही दिवस सातत्याने वाढ होत होती त्यानंतर सलग तीन दिवस सोन्याचे दर खाली घसरले. पण आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. २४ कॅरेट (24 Carat Gold) सोन्याच्या दरात १०० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे आता २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,३५० रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव (22 Carat Gold Rate) ४७,२६० रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे.

सोन्याच्या भावात वाढ झाली असताना चांदीही महागली आहे. चांदीच्या दरात प्रति किलोग्रॅम ४०० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे चांदीचा भाव हा ४८,१०० रुपये प्रति किलो इतका जात आहेत. शुक्रवारी चांदीच्या दरात १०० रुपयांची घसरण झाली होती. शुक्रवारी चांदीचा दर ४७,७०० रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट  सोन्याचे दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४८ हजार ३५०  ४८ हजार २५०
पुणे  ४८ हजार ३५०  ४८ हजार २५०
जळगाव  ४८ हजार ३५०  ४८ हजार २५०
कोल्हापूर ४८ हजार ३५०  ४८ हजार २५०
लातूर ४८ हजार ३५०  ४८ हजार २५०
सांगली ४८ हजार ३५०  ४८ हजार २५०
बारामती  ४८ हजार ३५०  ४८ हजार २५०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४७ हजार ३५०   ४७ हजार २५०
पुणे  ४७ हजार ३५०   ४७ हजार २५०
जळगाव  ४७ हजार ३५०    ४७ हजार २५०
कोल्हापूर ४७ हजार ३५०   ४७ हजार २५०
लातूर ४७ हजार ३५०   ४७ हजार २५०
सांगली ४७ हजार ३५०   ४७ हजार २५०
बारामती  ४७ हजार ३५०   ४७ हजार २५०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४८ हजार १०० ४७ हजार ७००
पुणे  ४८ हजार १०० ४७ हजार ७००
जळगाव  ४८ हजार १०० ४७ हजार ७००
कोल्हापूर ४८ हजार १०० ४७ हजार ७००
लातूर ४८ हजार १०० ४७ हजार ७००
सांगली ४८ हजार १०० ४७ हजार ७००
बारामती  ४८ हजार १०० ४७ हजार ७००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी