सोने चांदी भाव, २९ जून २०२०: विक्रमी उंचीच्या जवळ जाऊन सोने झाले स्वस्त 

Gold and Silver Rate| सोन्याचा बाजार खुला झाला तेव्हा सुरूवातीच्या सत्रात नव्या विक्रमी उंचीच्या जवळपास जाऊन सोने स्वस्त झाले.  MCXमध्ये ऑगस्टच्या सोन्याच्या डिलिव्हरीमध्ये ५० रुपयांची घट दिसून आली

Gold and Silver Rate 29 June 2020
सोने चांदी आजचा भाव, २९ जून २०२०: विक्रमी उंचीच्या जवळ जाऊन सोने झाले स्वस्त  

थोडं पण कामाचं

  • सोन्याचा बाजार खुला झाला तेव्हा सुरूवातीच्या सत्रात नव्या विक्रमी उंचीच्या जवळपास जाऊन सोने स्वस्त झाले.
  •  MCXमध्ये ऑगस्टच्या सोन्याच्या डिलिव्हरीमध्ये ५० रुपयांची घट दिसून आली
  • आजच्या दिवसभरात सोन्याच्या दराने ४८ हजार ४६२ ची उंची गाठली होती. 

सोने चांदी भाव, २९ जून:    सोन्याचा बाजार खुला झाला तेव्हा सुरूवातीच्या सत्रात नव्या विक्रमी उंचीच्या जवळपास जाऊन सोने स्वस्त झाले.  MCXमध्ये ऑगस्टच्या सोन्याच्या डिलिव्हरीमध्ये ५० रुपयांची घट दिसून आली त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा दर ४८ हजार २५० रुपये झाला. आजच्या दिवसभरात सोन्याच्या दराने ४८ हजार ४६२ ची उंची गाठली होती. 

 सोन्यानंतर चांदीच्या दरातही घट दिसून आली. जुलैमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या चांदीचा MCXमध्ये भावात कोणताही बदल झाला नाही. प्रति कोलि चांदीचा दर ४९ हजार ५८९ रुपये होता. कोराना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे जगभरात मंदीचे सावट आहे, अशात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे.   भारतीय बाजारात सोन्याने या आठवड्यात विक्रमी ४८ हजार ५८९ रुपये प्रति १० ग्रॅमची उंची गाठली होती.  गेल्या व्यापारी सत्रात सोन्याच्या दरात ०.८ टक्के आणि चांदीच्या दरात ०.६ टक्के वाढ झाली होती. 
 
जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढीचे सातत्य काम दिसते आहे.  सोन्याच्या दराने गेल्या आठ वर्षांच्या उच्चांकाजवळ मजल मारली आहे. कोरोना व्हायसमुळे अनेक गुंतवणूकदारांना सोन्याकडे आपला कल दाखवला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.  तसेच सोने, बॉन्ड्स आणि अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे.  जागतिक बाजारातही सोन्याच्या किंमतीत ०.१ टक्क्यांच्या वाढीसह १७७२.६१ डॉलर प्रति औंस झाली आहे. 
  
 मुंबईत सोने झाले स्वस्त, चांदी मात्र वधारली 
 
आज देखील सोन्याच्या दरात घट झाली आहे. मात्र आजची घट ही फारच किरकोळ आहे. आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम ६० रुपयांनी स्वस्त झाले आहे. प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४८ हजार ३०० वर सुरू आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४७ हजार ३०० वर सुरू आहे..   सोन्याच्या दरासोबत चांदीतही १० रुपयांची  वाढ  दिसून आली. काल ४८ हजार ११० असलेली चांदी आज ४८ हजार ५०० रुपयांवर विक्री सुरू आहे. साधारण चांदीच्या दरात प्रतिकिलो ३९० रुपयांची 

काल २४ कॅरेट सोन्याचा दर ४८ हजार ३६० वर बंद झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ४७ हजार ३६० वर बंद आहे.

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट  सोन्याचे दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४८ हजार ३००  ४८ हजार ३६०
पुणे  ४८ हजार ३०० ४८ हजार ३६०
जळगाव  ४८ हजार ३०० ४८ हजार ३६०
कोल्हापूर ४८ हजार ३०० ४८ हजार ३६०
लातूर ४८ हजार ३०० ४८ हजार ३६०
सांगली ४८ हजार ३०० ४८ हजार ३६०
बारामती  ४८ हजार ३०० ४८ हजार ३६०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४७ हजार ३००  ४७ हजार ३६०
पुणे  ४७ हजार ३००  ४७ हजार ३६०
जळगाव  ४७ हजार ३००  ४७ हजार ३६०
कोल्हापूर ४७ हजार ३००  ४७ हजार ३६०
लातूर ४७ हजार ३००  ४७ हजार ३६०
सांगली ४७ हजार ३००  ४७ हजार ३६०
बारामती  ४७ हजार ३०० ४७ हजार ३६०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४८ हजार ५०० ४८ हजार ११०
पुणे  ४८ हजार ५०० ४८ हजार ११०
जळगाव  ४८ हजार ५०० ४८ हजार ११०
कोल्हापूर ४८ हजार ५०० ४८ हजार ११०
लातूर ४८ हजार ५०० ४८ हजार ११०
सांगली ४८ हजार ५०० ४८ हजार ११०
बारामती  ४८ हजार ५०० ४८ हजार ११०

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी