सोने चांदी भाव, २९ ऑक्टोबर २०२०:  वायदा सोने झाले स्वस्त, चांदी़त किरकोळ तेजी , चेक करा २९ ऑक्टोबरचा भाव

स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.

Gold and Silver Rate 29 October 2020
सोने चांदी आजचा भाव, २९ ऑक्टोबर २०२० 

थोडं पण कामाचं

  • स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.
  • दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी त्यांच्या किंमतीत किरकोळ तेजी दिसली आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या    चौथ्या दिवशी गुरूवारी सकाळी वायदा  भावात वाढ पाहायला मिळाली.

Gold Price Today, सोने चांदी आजचा भाव, २९ ऑक्टोबर २०२०:  नवी दिल्ली : स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.  एमसीएक्स (MCX)वर सकाळी दुपारी 11:41  वाजता डिसेंबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात 0.17 टक्के 85 रुपयांची घट होऊन प्रती 10 ग्रॅम 50,410 रुपयांवर ट्रेंड करत होता.  यापूर्वी गेल्या सत्रातीली डिसेंबरच्या कराराचे सोने  50,495 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तर दुसरीकडे फेब्रुवारी २०२१ च्या कराराचे सोने 84 रुपये म्हणजे 0.17 टक्के घटीसह 50,510 रुपये प्रति 10 ग्रॅम ट्रेंड करत होते. फेब्रुवारी २०२१ च्या डिलेवरीचे सोन्याचा रेट बुधवारी 50,594 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. 
 
दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी त्यांच्या किंमतीत किरकोळ तेजी दिसली आहे.  एमसीएक्सवर डिसेंबर 2020 च्या चांदीचा भाव सोमवारी सकाळी 11:41 वाजयात    0.02 टक्के  म्हणजे 14 रुपयांच्या तेजीसह  60,152 रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती.  गेल्या सत्रात डिसेंबरच्या कराराची चांदीची किंमत 60,138  रुपये प्रति किलो ग्रॅम होती.  या शिवाय मार्च २०२१ वायदा चांदी या वेळी 0.13 टक्के म्हणजे 80 रुपयांच्या वाढीसह 61,837  रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड करत होती.  यापूर्वी मंगळवारी मार्चच्या कराराची चांदीची किंमत 61,757 रुपये प्रति किलो होती. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या    चौथ्या दिवशी गुरूवारी सकाळी वायदा  भावात वाढ पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोने डिसेंबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या 3.60  डॉलर म्हणजे 0.19 टक्के वाढीसह 1,882.80   डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव 0.27  टक्के म्हणजे 5.15 डॉलरच्या वाढीसह 1,882.34 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या   चौथ्या दिवशी गुरूवारी वैश्विक वायदा भावात तेजी पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर चांदी वायदा भाव गेल्या सत्राच्या  0.10 डॉलर म्हणजे 0.41 टक्के घटीसह  23.46  डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव 0.20 टक्के म्हणजे 0.05 डॉलरच्या वाढीसह 24.34 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी