सोने चांदी भाव, 3 मार्च  2021:  वायदा सोन्यात घट, चांदीही घसरली, फटाफट चेक करा 3 मार्चचा भाव

Gold and Silver Rate | बुधवारी सोन्या-चांदीच्या वायदा (Gold Futures Price) किंमती खाली आल्या.

gold and silver rate 3 March 2021 mumbai pune jalgaon kolhapur latur nashik sangli baramati
सोने चांदी भाव, 3 मार्च  2021  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • बुधवारी सोन्या-चांदीच्या वायदा (Gold Futures Price) किंमती खाली आल्या.
  • चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी चांदीच्या किंमतीत घट दिसली आहे.  
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी वायदा  भावात घट पाहायला मिळाली.

Gold Price , सोने चांदी भाव, 3 मार्च 2021:  नवी दिल्ली :   बुधवारी सोन्या-चांदीच्या वायदा (Gold Futures Price) किंमती खाली आल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर  एप्रिलच्या डिलीव्हरी सोन्याचे भाव  सकाळी 10:56 वाजता 123 रुपयांनी म्हणजे 0.27 टक्क्यांनी घसरून 45,425  रुपयांवर गेले. मागील सत्रात एप्रिलमध्ये सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 45,308 रुपये होता. दुसरीकडे, जून २०२१ च्या डिलिव्हरी सोन्याची किंमत ( Gold Price) 138 रुपयांच्या  घट म्हणजेच 0.30 टक्क्यांनी घटून प्रति १० ग्रॅम, 45,611 होती. मागील सत्रात जूनच्या करारामध्ये सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 45,749 रुपये होती.  

वायदा बाजारात चांदीची किंमत (Silver Price in Futures Market)   

दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी चांदीच्या किंमतीत घट दिसली आहे.  मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर  मे 2021 च्या वायदा चांदीची किंमत सकाळी 10:56 वाजता 235 रुपये म्हणजे 0.34 टक्क्यांनी घसरून 68,980  रुपये प्रति किलो झाली. गेल्या सत्रात मे च्या कराराची चांदीची किंमत 69,215 रुपये प्रति किलो होती.  त्याचप्रमाणे जुलै २०२१ मध्ये डिलिव्हरी चांदी 205 रुपये म्हणजे 0.29 टक्यांच्या घटीसह 70,056 रुपये प्रतिकिलो पातळीवर घसरली. मागील सत्रात जुलै करारासाठी चांदीचा दर प्रति किलो 70,261 रुपये होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी वायदा  भावात घट पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव  4.50 डॉलर म्हणजे 0.26 टक्के घटीसह 1,729.10 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव (Gold Price) 5.68  डॉलरच्या घटीसह  1,732.68 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  तिसऱ्या दिवशी बुधवारी वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर चांदी मार्च, 2021 वायदा भाव 0.19 डॉलर म्हणजे 0.72 टक्के घटीसह 26.69  डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव 1.61 टक्के म्हणजे  0.12 डॉलरच्या घटीसह 26.64 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी