सोने चांदी भाव, 3 मे  2021:  वायदा सोन्यात वाढ, चांदी चमकली, पटापट चेक करा 3 मेचा भाव

Gold and Silver Rate |  सोन्याच्या वायदा भावात सोमवारी वाढ पाहायला मिळाली. चांदी स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी वधारली. 

gold and silver rate 3 may 2021
सोने चांदी भाव, 3 मे  2021:  वायदा सोन्यात वाढ, चांदी चमकली 

थोडं पण कामाचं

  • सोन्याच्या वायदा भावात सोमवारी तेजी पाहायला मिळाली.
  • जागतिक बाजारात सोमवारी सकाळी सोन्याचे स्पॉट व फ्युचर्सचे दोन्ही भाव दिसून आले.
  • चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी  चांदीच्या किंमतीत तेजी  दिसली आहे.

Gold Price , सोने चांदी भाव, 3 मे 2021:  नवी दिल्ली :  सोन्याच्या वायदा भावात सोमवारी तेजी पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सकाळी 10:40  वाजता  चार जून 2021 मध्ये डिलिव्हरी सोन्याचे भाव (Gold Price) 304 रुपये म्हणजे 0.65 टक्के तेजीसह 47,041 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. मागील सत्रात जूनच्या कराराची सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,303 रुपये होती. त्याचप्रमाणे ऑगस्ट कराराची सोन्याची किंमत  339 रुपये किंवा 0.72 टक्क्यांनी वाढून 47,390 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. त्याचबरोबर जागतिक बाजारात सोमवारी सकाळी सोन्याचे स्पॉट व फ्युचर्सचे दोन्ही भाव दिसून आले.

वायदा बाजारात चांदीची किंमत (Silver Price in Futures Market)

दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी  चांदीच्या किंमतीत तेजी  दिसली आहे.   मल्टी कमोडिटी एक्सचेंजला सकाळी 10:40  वाजता 5 जुलै 2021 रोजीच्या डिलिव्हरी चांदीची किंमत 455 रुपये म्हणजे  0.67  टक्क्यांनी वाढून 68,821 रुपये प्रती किलो झाली.  आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलतानाही सोमवारी सकाळी चांदीच्या वायदा व स्पॉटच्या किंमती या दोन्हीमध्ये वाढ दिसून आली.


आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी  सकाळी वायदा  भावात तेजी  पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव  6 डॉलर म्हणजे  0.34 टक्क्यांच्या घटीसह 1,773.70 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव (Gold Price) 0.27 टक्के म्हणजे 4.78 डॉलरच्या तेजीसह 1,773.91  डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  पहिल्या दिवशी सोमवारी   वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली.   चांदीची किंमत 0.17 डॉलर म्हणजे 0.65  टक्क्यांनी घटीसह 26.04 डॉलर प्रति औंसवर स्थिरावली. हाजीर बाजारात चांदीची किंमत  0.06  डॉलर म्हणजे 0.25 टक्के घटीसह 25.98  डॉलर प्रति औंस सुरू होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी