सोने चांदी भाव, ३० जुलै २०२०:  १० दिवसांनी सोन्याच्या किंमती झाल्या स्वस्त, फटाफट चेक करा ३० जुलैचा भाव

 सोने चांदी भाव, ३० जुलै २०२०:  नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीत  (Gold Rate)भारतीय बाजारात पुन्हा एकदा १० दिवसांनंतर घट दिसून आली.  एमसीएक्स (MCX)ऑगस्टच्या फ्युचर डिलिव्हरीमध्ये ०.२ टक्क्यांची घट झाली.

Gold and Silver Rate 30 July 2020
सोने चांदी भाव, २९ जुलै २०२०: सोने झाले स्वस्त 

थोडं पण कामाचं

  • सध्या सोन्याचा दर खाली असला तरी सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 
  • भारतात या वर्षी सोन्याच्या किंमतीत सुमारे ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. 
  • चांदीचाही दर झाला स्वस्त

सोने चांदी भाव, ३० जुलै २०२०:  नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीत  (Gold Rate)भारतीय बाजारात पुन्हा एकदा १० दिवसांनंतर घट दिसून आली.  एमसीएक्स (MCX)ऑगस्टच्या फ्युचर डिलिव्हरीमध्ये ०.२ टक्क्यांची घट होऊन १० ग्रॅमसाठी सोन्याचा दर ५३ हजार ६५ झाला आहे. गेल्या नऊ दिवसांत पिवळ्या धातूने सुमारे ५,५०० रुपयांची वाढ पाहिली आहे. ही वाढ सुमारे ११ टक्के होती.  तर चांदीच्या फ्युचर व्यवहारातही एमसीएक्समध्ये २ टक्क्यांची घट होऊन चांदीचा दर प्रति  १ किलोला ६३ हजार ९०९ रुपये झाला.  गेल्या सत्रात सोन्याच्या दरात १.४ टक्क्यांची वाढ दिसून आली होती. त्यामुळे प्रति १० ग्रॅम ७३० रुपये वाढ झाली होती. यात सोन्याने नवा विक्रमी उच्चांक गाढून ५३ हजार ३९९ ची पातळी गाठली होती. 
 
 जागतिक बाजारात सोन्याच्या दराने जराशी उसंत घेतली आहे. नऊ दिवसांच्या वाढीनंतर सोन्याच्या दराने उच्चांकी पातळी गाठली होती.  अमेरिकेत सॉप्ट गोल्डची किंमती ०.३ टक्क्यांनी कमी झाली असून प्रती औंस १९६५.९० डॉलर भाव होता. मंगळवारी आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. सोन्याचा दर १९८१ डॉलर प्रति औंसपर्यंत वर गेला होता.  सोन्याचा फ्यूचर ट्रेड हा ०.२ टक्क्यांनी वाढून १९८१.६० पर्यंत वर गेला होता. या आठवड्यात फ्यूचर ट्रेड २००० पर्यंत वर गेला होता. 

मुंबईत सोन्यात घट तर चांदीचे भाव कोसळले 

सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात किरकोळ वाढ दिसून आली. पण नंतर सोन्याच्या दरात आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम  ३०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५२ हजारवर १०० सुरू आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५१ हजारवर १०० सुरू आहे. सोन्याच्या दरात जशी घट दिसून आली  त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात चांदीत घट दिसून आली.  चांदीत ३०५० रुपयांची  घट झाली.  काल ६६ हजार ०५० वर असलेली चांदी आज  ६३ हजार ००० रुपयांपर्यंत खाली गेला. 

काल २४ कॅरेट सोन्याचा दर  ५२ हजारवर ४०० वर बंद झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर   ५१ हजारवर ४०० वर बंद झाला होता.

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट  सोन्याचे दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५२ हजार १००  ५२ हजार ४००
पुणे  ५२ हजार १०० ५२ हजार ४००
जळगाव  ५२ हजार १०० ५२ हजार ४००
कोल्हापूर ५२ हजार १०० ५२ हजार ४००
लातूर ५२ हजार १०० ५२ हजार ४००
सांगली ५२ हजार १०० ५२ हजार ४००
बारामती  ५२ हजार १०० ५२ हजार ४००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५१ हजार १००  ५१ हजार ४००
पुणे  ५१ हजार १०० ५१ हजार ४००
जळगाव  ५१ हजार १०० ५१ हजार ४००
कोल्हापूर ५१ हजार १०० ५१ हजार ४००
लातूर ५१ हजार १०० ५१ हजार ४००
सांगली ५१ हजार १०० ५१ हजार ४००
बारामती  ५१ हजार १०० ५१ हजार ४००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६३ हजार ००० ६६ हजार ०५०
पुणे  ६३ हजार ००० ६६ हजार ०५०
जळगाव  ६३ हजार ००० ६६ हजार ०५०
कोल्हापूर ६३ हजार ००० ६६ हजार ०५०
लातूर ६३ हजार ००० ६६ हजार ०५०
सांगली ६३ हजार ००० ६६ हजार ०५०
बारामती  ६३ हजार ००० ६६ हजार ०५०

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी