सोने चांदी, ३१ जुलै २०२०:  सोन्याने मारली उसळी, चांदीमध्येही तेजी, फटाफट चेक करा ३१ जुलैचा भाव 

सोने आणि चांदीच्या किंमतीत  (Gold Rate)वायदा बाजारात शुक्रवारी सुरूवातीच्या व्यवहारात वाढ दिसून आली.  

Gold and Silver Rate 31 July 2020
सोने-चांदीच्या वायदा किंमती झाली वाढ  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सोने आणि चांदीच्या किंमतीत  (Gold Rate)वायदा बाजारात शुक्रवारी सुरूवातीच्या व्यवहारात वाढ दिसून आली.  
  •  सोन्यासोबत चांदीचा वायदा भावातही शुक्रवारी वाढ दिसून आली.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याबाबत बोलायचे झाले तर ब्लुमबर्गनुसार शुक्रवारी सकाळी कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव ०.९७ टक्के म्हणे १९ डॉलरच्या वाढीसह १९८५.८० डॉलर प्रति औंस वर ट्रेंड करत होता.

सोने चांदी, ३१ जुलै २०२०:  नवी दिल्ली :  स्थानिक बाजारात शुक्रवारी सोने-चांदीच्या हाजीर भावात मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी सोन्याचा भाव ६८७ रुपये प्रति दहा ग्रॅमने वाढला. त्यामुळे दिल्लीत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ५४ हजार ५३८ रुपये झाला.  जागतिक बाजारात वाढत्या किंमतीमुळे स्थानिक स्तरावर सोन्याचे भावात ही तेजी दिसून आली आहे. गेल्या सत्रात गुरूवारी सोन्याचा दर ५३ हजार ८५१ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. 

तर दुसरीकडे चांदी हाजिर किंमतीत शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली. चांदी शुक्रवारी २८५४ रुपये प्रति किलो ग्रॅम वाढली. यामुळे चांदीचा एक किलोचा दर ६५ हजार ९१० रुपये झाला. गुरूवारी चांदी ६३ हजार ०५६ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. 

सोने आणि चांदीच्या किंमतीत  (Gold Rate)वायदा बाजारात शुक्रवारी सुरूवातीच्या व्यवहारात वाढ दिसून आली.  एमसीएक्स (MCX) शुक्रवारी सकाळी १० वाजून १३ मिनिटांनी पाच ऑक्टोबर २०२० च्या वायदा सोन्याची किंमत ०.७८ टक्क्यांच्या वाढीसह १० ग्रॅमसाठी ४१० रुपयांनी वाढली. त्यामुळे  सोन्याचा दर ५३ हजार १९० वर ट्रेंड करत होता.  या शिवाय ४ डिसेंबर २०२० च्या सोन्याचा वायदा भाव या वेळी ०.८० टक्क्यांच्या वाढीसह ४२२ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅमसाठी ५३ हजार ३५० रुपये ट्रेंड करत होता. दुसरीकडे पाच ऑगस्ट २०२० सोन्याच्या वायदा भाव ०.७२ टक्क्यांनी वाढून ३८३ रुपयांच्या वाढीसह प्रती १० ग्रॅम ५३ हजार ५२१ रुपयांवर ट्रेंड करत होता. 
 
 सोन्यासोबत चांदीचा (Silver Rate) वायदा भावातही शुक्रवारी वाढ दिसून आली. एमसीएक्सवर चार सप्टेंबर २०२० च्या चांदीचा वायदा भाव शुक्रवारी सकाळी १० वाजून २९ मिनिटांनी १.४० टक्क्यांच्या तेजीसह ८७८ रुपये वाढला. त्यामुळे प्रति किलो चांदी ६३ हजार ५४८ रुपये ट्रेंड करत होती. या शिवाय चार डिसेंबर २०२० च्या चांदीचा वायदा भाव या वेळी एमसीएक्स वर १.३६ टक्के किंवा ८७३ रुपये वाढीसह प्रति किलो ६५ हजार १८० रुपये ट्रेंड करत आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याबाबत बोलायचे झाले तर ब्लुमबर्गनुसार शुक्रवारी सकाळी कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव ०.९७ टक्के म्हणे १९ डॉलरच्या वाढीसह १९८५.८० डॉलर प्रति औंस वर ट्रेंड करत होता. या शिवास सोन्याचा जागतिक हाजिर भाव ०.५८ च्या म्हणजे ११.३१ डॉलरच्या वाढीसह १९६७.९५ डॉलर प्रति औंस ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीबाबत बोलायचे झाले तर ब्लुमबर्गनुसार शुक्रवारी सकाळी कॉमेक्सवर चांदीचा वायदा भाव १.४९ टक्के म्हणे ०,३५ डॉलरच्या वाढीसह २३.७१ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवास चांदीचा जागतिक हाजिर भाव ०.६४च्या म्हणजे ०.१५ डॉलरच्या वाढीसह २३.६५  डॉलर प्रति औंस ट्रेंड करत होता. 

मुंबईत सोने चांदीच्या दरात मोठी वाढ

सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात किरकोळ वाढ दिसून आली. पण दिवस अखेर आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम  ८०० रुपयांनी महाग झाले आहे. प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५२ हजार ९०० झाला आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५१ हजार ९०० झाला आहे. सोन्याच्या दरात  जशी भरघोस वाढ दिसून आली तसेच चांदीनेही चांगली उसळी मारली . चांदीत २००० रुपयांची  वाढ  झाली.  काल ६३ हजार ००० वर असलेली चांदी आज  ६५ हजार ००० रुपयांवर बंद झाली. 

काल २४ कॅरेट सोन्याचा दर  ५२ हजारवर १०० वर बंद झाला होता. २२ कॅरेट सोन्याचा दर  ५१ हजारवर १०० वर बंद झाला होता.

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट  सोन्याचे दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५२ हजार ९००  ५२ हजार १००
पुणे  ५२ हजार ९०० ५२ हजार १००
जळगाव  ५२ हजार ९०० ५२ हजार १००
कोल्हापूर ५२ हजार ९०० ५२ हजार १००
लातूर ५२ हजार ९०० ५२ हजार १००
सांगली ५२ हजार ९०० ५२ हजार १००
बारामती  ५२ हजार ९०० ५२ हजार १००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५१ हजार ९००  ५१ हजार १००
पुणे  ५१ हजार ९०० ५१ हजार १००
जळगाव  ५१ हजार ९०० ५१ हजार १००
कोल्हापूर ५१ हजार ९०० ५१ हजार १००
लातूर ५१ हजार ९०० ५१ हजार १००
सांगली ५१ हजार ९०० ५१ हजार १००
बारामती  ५१ हजार ९०० ५१ हजार १००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६५ हजार ००० ६३ हजार ०००
पुणे  ६५ हजार ००० ६३ हजार ०००
जळगाव  ६५ हजार ००० ६३ हजार ०००
कोल्हापूर ६५ हजार ००० ६३ हजार ०००
लातूर ६५ हजार ००० ६३ हजार ०००
सांगली ६५ हजार ००० ६३ हजार ०००
बारामती  ६५ हजार ००० ६३ हजार ०००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी