सोने चांदी भाव, 5 एप्रिल  2021:  वायदा सोने स्वस्त, चांदीची किंमत कमी, पटापट चेक करा 5 एप्रिलचा भाव

Gold and Silver Rate | सोन्याच्या वायदा भावात सोमवारी घट पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी  सकाळी वायदा  भावात घट पाहायला मिळाली.

gold and silver rate 5 April 2021
सोने चांदी भाव, 5 एप्रिल  2021 

थोडं पण कामाचं

  •  सोन्याच्या वायदा भावात सोमवारी घट पाहायला मिळाली.
  • स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी  चांदीच्या किंमतीत घट दिसली आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी  सकाळी वायदा  भावात घट पाहायला मिळाली.

Gold Price , सोने चांदी भाव, 5 एप्रिल 2021 :  नवी दिल्ली :  सोन्याच्या वायदा भावात सोमवारी घट पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सकाळी  10:13 वाजता  जून 2021 मध्ये डिलिव्हरी सोन्याचे भाव (Gold Price) 50 रुपये म्हणजेच 0.11 टक्क्यांनी  घसरून 45,368 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.  गेल्या सत्रात जूनच्या करारच्या सोन्याचा दर 45,418 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.  त्याचप्रमाणे ऑगस्ट 2021 मध्ये करार केलेल्या सोन्याचा किंमत 45,625 रुपये प्रति 10 ग्रॅमवर सपाट करत होती. 

वायदा बाजारात चांदीची किंमत (Silver Price in Futures Market)   

दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी  चांदीच्या किंमतीत घट दिसली आहे.  मे 2021 रोजी सकाळी 10:13  वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंजला डिलिव्हरी चांदीची किंमत 166 रुपये किंवा  0.26  टक्क्यांनी घटून 64,923 रुपये प्रती किलो झाली.  गेल्या सत्रात मे कॉन्ट्रॅक्ट चांदीची किंमत प्रति किलो  65,089 रुपये होती. त्याचप्रमाणे जुलै 2021 मध्ये डिलीव्हरी चांदी 160 रुपये किंवा 0.24 टक्क्यांनी घसरून 65,816  रुपये प्रति किलो झाली. मागील सत्रात जुलैच्या कराराच्या चांदीची किंमत  65,976  रुपये प्रति किलो होती. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी  सकाळी वायदा  भावात घट पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव 3.50 डॉलर म्हणजे  0.20  टक्क्यांच्या घटीसह 1,724.90  डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव (Gold Price) 0.19टक्के म्हणजे 3.31 डॉलरच्या घटीसह 1,725,56 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  पहिल्या दिवशी सोमवारी   वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली.   चांदीची किंमत 0.11  डॉलर म्हणजे 0.43 टक्क्यांनी घटून 24.84 डॉलर प्रति औंसवर स्थिरावली. हाजीर बाजारात चांदीची किंमत  0.19 डॉलर म्हणजे 0.76 टक्के घटीसह 24.82 डॉलर प्रति औंस सुरू होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी