सोने चांदी भाव, 5 मार्च  2021:  वायदा सोने झाले स्वस्त, चांदीही घसरली, फटाफट चेक करा 5 मार्चचा भाव

Gold and Silver Rate | मंगळवारी सोन्या-चांदीच्या वायदा (Gold Futures Price) किंमती खाली आल्या.

gold and silver rate 5 March 2021 mumbai pune jalgaon kolhapur latur nashik sangli baramati
सोने चांदी भाव, 5 मार्च  2021  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मंगळवारी सोन्या-चांदीच्या वायदा (Gold Futures Price) किंमती खाली आल्या.
  • चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी  चांदीच्या किंमतीत घट दिसली आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी    सकाळी वायदा  भावात घट पाहायला मिळाली.

Gold Price , सोने चांदी भाव, 5 मार्च 2021:  नवी दिल्ली :   मंगळवारी सोन्या-चांदीच्या वायदा (Gold Futures Price) किंमती खाली आल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर  एप्रिलच्या डिलीव्हरी सोन्याचे भाव  दुपारी 1:23 वाजता 176 रुपयांनी म्हणजे 0.40 टक्क्यांनी घसरून 44,365 रुपयांवर गेले. मागील सत्रात एप्रिलमध्ये सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 44,541 रुपये होता. दुसरीकडे, जून २०२१ च्या डिलिव्हरी सोन्याची किंमत ( Gold Price) 191 रुपयांच्या  घट म्हणजेच 0.43 टक्क्यांनी घटून प्रति १० ग्रॅम, 44,545 होती. मागील सत्रात जूनच्या करारामध्ये सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 44,736 रुपये होती.  

वायदा बाजारात चांदीची किंमत (Silver Price in Futures Market)   

दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी  चांदीच्या किंमतीत घट दिसली आहे.  मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर  मे 2021 च्या वायदा चांदीची किंमत 575 रुपये म्हणजे 0.87 टक्क्यांनी घसरून 65,346 रुपये प्रति किलो झाली. गेल्या सत्रात मे च्या कराराची चांदीची किंमत 65,921  रुपये प्रति किलो होती.  त्याचप्रमाणे जुलै २०२१ मध्ये डिलिव्हरी चांदी 569 रुपये म्हणजे 0.85 टक्यांच्या घटीसह 66,395 रुपये प्रतिकिलो पातळीवर घसरली.  गेल्या सत्रात जुलैच्या कराराची चांदीची किंमत 66,964 रुपये प्रति किलो होती. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी    सकाळी वायदा  भावात घट पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव 8.60 डॉलर म्हणजे 0.51 टक्क्यांच्या घटीसह 1,692.10 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव (Gold Price) 0.21  टक्के म्हणजे 3.51 डॉलरच्या वाढीसह  1,694.01 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  अखेरच्या दिवशी शुक्रवारी    वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली.    चांदीची किंमत 0.22 डॉलर किंवा 0.85 टक्क्यांनी घसरून 25.25 औंस डॉलर प्रति औंसवर स्थिरावली. हाजीर बाजारात चांदीची किंमत  0.14 डॉलर म्हणजे 0.56 टक्के घटीसह 25.21 डॉलर प्रति औंस सुरू होती. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी