Gold Price Today, सोने चांदी आजचा भाव, 7 एप्रिल 2021 : सोने-चांदीच्या दरातील तेजी कमी झाली आहे. बुधवारी एका दिवसाच्या तेजीनंतर भारतीय बाजारपेठेतील सोन्या-चांदीच्या किंमती (Gold-Silver Price) खाली आल्या आहेत. बुधवारी, जून फ्युचर्सच्या सोन्याच्या किंमती ( Gold Price)मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) मध्ये 0.25 टक्क्यांनी घसरल्या आहेत. त्याचबरोबर मे वायद्याच्या चांदीच्या किमतींमध्ये (Silver Price) 0.23 टक्क्यांची घसरण दिसून आला आहे. मागील व्यापारी सत्रात 10 ग्रॅम सोन्याचे दर 600 रुपयांनी म्हणजे 1.25 टक्क्यांनी वधारले होते. तर एक किलो चांदी 2 टक्क्यांनी म्हणजेच 1300 रुपये वाढीने बंद झाली होती (gold and silver rate 7 April 2021 mumbai pune jalgaon kolhapur latur nashik sangli baramati)
सोन्याच्या किमतींमध्ये नुकतीच घट असूनही, मौल्यवान धातू ऑगस्टच्या 56,200 च्या उच्चांकाच्या तुलनेत सुमारे 11,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्याचबरोबर या वर्षाच्या सुरूवातीपासूनच सोन्याच्या किंमतीत सुमारे 5000 रुपये प्रति 10 ग्रॅमने घट झाली आहे. गेल्या व्यापार सत्रात दोन आठवड्यांच्या उच्चांकी पातळी गाठल्यानंतर आज जागतिक बाजारात सोन्याची घसरण झाली. गेल्या व्यापार सत्रात डॉलरच्या कमकुवतपणामुळे आणि अमेरिकेच्या ट्रेझरी यील्ड्समध्ये कमतरता आल्यामुळे सोन्याला आधार मिळाला.
बुधवारी, जून फ्यूचर्स सोन्याचे मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये 115 रुपयांनी घसरण झाली. सोने प्रति 10 ग्रॅम 45,804 रुपयांवर आहे. मागील व्यापार सत्रात ते 1.25 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घटल्या आहेत. स्पॉट सोन्याचे भाव 0.2 टक्क्यांनी घसरून 1,739.46 डॉलर प्रति औंस झाले.
एमसीएक्सवर आज मे वायदा चांदीचा भाव 149 रुपयांनी घसरून 65,748 रुपये प्रति किलो झाला. गेल्या व्यापार सत्रात चांदी 2 टक्क्यांनी म्हणजेच 1300 रुपये वाढीसह बंद झाली होती.
मंगळवारी सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दराच्या वाढीचा परिणाम स्थानिक बाजारात दिसून आला. दिल्लीत सराफा बाजारात सोन्याचा भाव Rs 83 रुपयांनी वाढून 45,049 रुपयांवर बंद झाला. त्याचबरोबर एक किलो चांदीचा भाव 62 रुपयांनी वाढून 64,650 रुपयांवर बंद झाला. (gold and silver rate 7 April 2021 mumbai pune jalgaon kolhapur latur nashik sangli baramati)