सोने चांदी भाव, ७ सप्टेंबर २०२०:  सोन्या-चांदीत वायदा भावात तेजी फटाफट चेक करा ७ सप्टेंबरचा भाव 

 Gold and Silver Rate| वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या व्यापारी सत्रात सोमवारी सोन्यात तेजी पाहायला मिळाली आहे.

Gold and Silver Rate 7 September 2020
सोने चांदी भाव, ७ सप्टेंबर २०२०  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या व्यापारी सत्रात सोमवारी सोन्यात तेजी पाहायला मिळाली आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर शुक्रवारी सकाळी  वायदा भावात वाढ पाहायला मिळाली.
  • सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात किरकोळ वाढ आली.

Gold Price , सोने चांदी भाव, ७ सप्टेंबर २०२०:  नवी दिल्ली : वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या व्यापारी सत्रात सोमवारी सोन्यात तेजी पाहायला मिळाली आहे.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)वाढ पाहायला मिळाली.  एमसीएक्स (MCX)वर सकाळी १० वाजून ४८ मिनिटांनी पाच ऑक्टोबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात ०.१३ टक्के म्हणजे ६७ रुपयांची वाढ होऊन प्रती १० ग्रॅम ५० हजार ७४५ रुपयांवर ट्रेंड करत होता. जागतिक स्तरावर सोमवारी सोन्याच्या वायदा किंमतीत वाढ दिसून आली. 

 
दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी चांदीच्या वायदा किंमतीत वाढ  दिसली आहे.  एमसीएक्सवर चार सप्टेंबर  २०२० च्या चांदीचा भाव  सोमवारी सकाळी १० वाजून ५७ मिनिटांनी १.२७ टक्के म्हणजे ८२४ रुपयांच्या तेजीसह ६८ हजार १२० रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती.  जागतिक स्तरावर सोमवारी चांदीच्या वायदा किंमतीत वाढ दिसून आली. 

 
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर शुक्रवारी सकाळी  वायदा भावात वाढ पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोने ऑक्टोबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या ०६.७० डॉलर म्हणजे ०.३५ टक्के वाढीसह १९४१ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव ०.०३ टक्के म्हणजे ०.६१ डॉलरच्या घटीसह १९३४.५५ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर सोमवारी सकाळी  चांदीत वाढ पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर डिसेंबरच्या करारची चांदीचा वायदा भाव गेल्या सत्राच्या ०.५५ डॉलर म्हणजे २.०७ टक्के वाढीसह २७.२७ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव ०.४४ टक्के म्हणजे ०.१२ डॉलरच्या वाढीसह २७.०३ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 
 

महाराष्ट्रात सोने चांदी महागले 

सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात किरकोळ वाढ आली.  आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम ९०  रुपयांनी महागले. प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५० हजार ५९० रुपयांवर सुरू आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४९ हजार ५९०  रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर ५० हजार ५१० रुपयांवर बंद झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ४९ हजार ५१०  रुपयांवर  बंद झाला होता.

सोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरात  सुरूवातीला भरघोस वाढ  दिसून आली. चांदीत ८९० रुपये प्रति किलोची वाढ झाली.  काल  ६७ हजार २१० वर असलेली चांदी आज  ६८ हजार १०० रुपयांवर विक्री सुरू आहे. 

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५० हजार ५९० ५० हजार ५१०
पुणे  ५० हजार ५९० ५० हजार ५१०
जळगाव  ५० हजार ५९० ५० हजार ५१०
कोल्हापूर ५० हजार ५९० ५० हजार ५१०
लातूर ५० हजार ५९० ५० हजार ५१०
सांगली ५० हजार ५९० ५० हजार ५१०
बारामती  ५० हजार ५९० ५० हजार ५१०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४९ हजार ५९० ४९ हजार ५१०
पुणे  ४९ हजार ५९० ४९ हजार ५१०
जळगाव  ४९ हजार ५९० ४९ हजार ५१०
कोल्हापूर ४९ हजार ५९० ४९ हजार ५१०
लातूर ४९ हजार ५९० ४९ हजार ५१०
सांगली ४९ हजार ५९० ४९ हजार ५१०
बारामती  ४९ हजार ५९० ४९ हजार ५१०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६८ हजार १०० ६७ हजार २१०
पुणे  ६८ हजार १०० ६७ हजार २१०
जळगाव  ६८ हजार १०० ६७ हजार २१०
कोल्हापूर ६८ हजार १०० ६७ हजार २१०
लातूर ६८ हजार १०० ६७ हजार २१०
सांगली ६८ हजार १०० ६७ हजार २१०
बारामती  ६८ हजार १०० ६७ हजार २१०

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी