सोने चांदी भाव, 8 एप्रिल  2021:  वायदा सोने स्वस्त, चांदीची किंमत कमी, पटापट चेक करा 8 एप्रिलचा भाव

Gold and Silver Rate | सोन्याच्या वायदा भावात गुरूवारी घट पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी  वायदा  भावात वाढ पाहायला मिळाली

gold and silver rate 8 April 2021
सोने चांदी भाव, 8 एप्रिल  2021: 

थोडं पण कामाचं

  • सोन्याच्या वायदा भावात गुरूवारी घट पाहायला मिळाली.
  • स्थानिक बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी  चांदीच्या किंमतीत घट दिसली आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी  वायदा  भावात वाढ पाहायला मिळाली

Gold Price , सोने चांदी भाव, 8 एप्रिल 2021:  नवी दिल्ली :  सोन्याच्या वायदा भावात गुरूवारी घट पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सकाळी  11 वाजता  जून 2021 मध्ये डिलिव्हरी सोन्याचे भाव (Gold Price)
81 रुपये म्हणजेच 0.17 टक्क्यांनी घटीसह 46,281 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.  गेल्या सत्रात जूनच्या करारच्या सोन्याचा दर 46,362 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.  त्याचप्रमाणे ऑगस्ट 2021 मध्ये करार केलेल्या सोन्याच्या किंमतीत 30 रुपये म्हणजे 0.06 टक्के घटीसह 46,573 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेंड करत होती. यापूर्वी बुधवारी एप्रिलच्या कराराच्या सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम   46,603  रुपये होता. (gold and silver rate 8 April 2021 )

वायदा बाजारात चांदीची किंमत (Silver Price in Futures Market)   

दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी  चांदीच्या किंमतीत घट दिसली आहे.  मे 2021 रोजी सकाळी 11:01 वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंजला डिलिव्हरी चांदीची किंमत 125 रुपये किंवा  0.18  टक्क्यांनी घटून 66,509 रुपये प्रती किलो झाली.  गेल्या सत्रात मे कॉन्ट्रॅक्ट चांदीची किंमत प्रति किलो  66,634 रुपये होती. त्याचप्रमाणे जुलै 2021 मध्ये डिलीव्हरी चांदी 220 रुपये किंवा 0.33 टक्क्यांनी घसरून  67,380 रुपये प्रति किलो झाली. मागील सत्रात जुलैच्या कराराच्या चांदीची किंमत 67,600  रुपये प्रति किलो होती. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी  सकाळी वायदा  भावात वाढ पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव 2 डॉलर म्हणजे  0.11  टक्क्यांच्या वाढीसह 1,743.60  डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव (Gold Price) 0.32   टक्के म्हणजे 5.51 डॉलरच्या वाढीसह 1,743.23 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  चौथ्या दिवशी गुरूवारी   वैश्विक वायदा भावात वाढ पाहायला मिळाली.   चांदीची किंमत 0.10  डॉलर म्हणजे 0.39  टक्क्यांनी वाढून 25.35  डॉलर प्रति औंसवर स्थिरावली. हाजीर बाजारात चांदीची किंमत  0.17 डॉलर म्हणजे 0.69 टक्के वाढीसह 25.32 डॉलर प्रति औंस सुरू होती. (gold and silver rate 8 April 2021 )

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी