सोने चांदी भाव, 8 जून  2021: सोन्याचा भाव पडला, चांदीही घसरली, पटापट चेक करा 8 जूनचा भाव

Gold and Silver Rate |  गेल्या आठवड्यातील जोरदार घसरणीनंतर आज पुन्हा एकदा स्थानिक वायदा बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली.  

gold and silver rate 8 June 2021 mumbai pune jalgaon kolhapur latur nashik sangli baramati
सोने चांदी भाव, 8 जून  2021: सोन्याचा भाव पडला 

थोडं पण कामाचं

  • गेल्या आठवड्यातील जोरदार घसरणीनंतर आज पुन्हा एकदा स्थानिक वायदा बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली.  
  • आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1,883 डॉलर तर चांदीचा भाव 27.55  डॉलर प्रति औंस होता.
  • सोमवारी स्थिर असलेल्या डॉलरच्या दबावाखाली सोन्याच्या किंमती कमी झाल्या.

Gold Price ,सोने चांदी भाव, 8 जून  2021 :  नवी दिल्ली :  गेल्या आठवड्यातील जोरदार घसरणीनंतर आज पुन्हा एकदा स्थानिक वायदा बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली.   आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याने सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. मंगळवारी एक्सचेंज सुरू झाल्यानंतर सोन्याचा वायदा भाव ऑगस्टच्या कराराचे सोने 43 रुपयांनी घसरून 49100 रुपयांवर आले. ऑक्टोबरची कराराचे सोने 49403 रुपयांवर ट्रेंड करत आहे.  ते खाली 18 रुपयांवर होते. सराफा बाजारचीही तीच स्थिती आहे. तेथेही 10 ग्रॅम सोन्याचा दर कमी होत आहे.

सोने आणि चांदी किंमती

सोमवारी सोन्याचा भाव 152 रुपयांनी घसरून 48,107 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, जागतिक पातळीवरील कमकुवत ट्रेंडमुळे सोन्याच्या मागील व्यापार सत्रात प्रति दहा ग्रॅम 48,259 रुपयांवर बंद झाला. त्याचप्रमाणे चांदीदेखील 540 रुपयांनी घसरून 69,925 रुपये प्रतिकिलोवर आली. मागील सत्रात चांदीचा बंद भाव प्रति किलो 70,465 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1,883 डॉलर तर चांदीचा भाव 27.55  डॉलर प्रति औंस होता.

डॉलर मजबूत

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, सोमवारी स्थिर असलेल्या डॉलरच्या दबावाखाली सोन्याच्या किंमती कमी झाल्या. स्थानिक फ्युचर्स मार्केटमध्ये सोमवारी सोन्याचे भाव 167 रुपयांनी घसरून 48,827 रुपयांवर गेले, कारण सट्टेबाजांनी कमकुवत मागणीच्या पार्श्वभूमीवर सौद्यांची संख्या कमी केली..

एमसीएक्सवर सोने 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑगस्टमध्ये डिलीव्हरीसाठी असलेले सोन्याचे भाव 167 रुपये म्हणजे 0.34  टक्क्यांनी घसरून 48,827 रुपये प्रति १० ग्रॅम झाले. त्यात 11,798 लॉटची उलाढाल होती. बाजाराचे विश्लेषक म्हणाले की, सट्टेबाजांनी आपल्या सौद्यांची संख्या कमी केल्याने सोन्याच्या वायदा किंमतींना नुकसान झाले. जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 0.30 टक्क्यांनी घसरून 1,886.30 डॉलर प्रति औंस झाले.

चांदी पडली कमकुवत

सोमवारी चांदीचे दर 519  रुपयांच्या घसरल्याने प्रति किलो चांदीचा भाव 71,020  झाला. 
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा भाव जुलैमध्ये 519  रुपये म्हणजे  0.73 टक्क्यांनी घसरून 71,020 रुपये प्रतिकिलो राहिला. फ्युचर्स कराराचा व्यवहार 11,331 लॉटमध्ये झाला. जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमध्ये चांदी 0.79 टक्क्यांनी घसरून 27.68 डॉलर प्रति औंस झाली.

महाराष्ट्रातील सोने आणि चांदीचा भाव काय?

महाराष्ट्रात सोन्याच्या भावात वाढ झाली.  सोन्याचे भावात 170 रुपयांची वाढ झाली.  राज्यात २४ कॅरेट सोन्याच्या भाव 48,680 रुपये झाला आहे. काल सोन्याचा दर 48,510 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर तर २२ कॅरेट सोन्याचा भाव 47,680 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. काल हा दर  47,510  रुपये प्रति 10 ग्रॅम  होता.   यासोबतच चांदीच्या भावात 700 रुपये प्रति किलोग्रॅमने वाढ झाली आहे. त्यामुळे काल 71000 रुपये प्रति किलोग्रॅम असणारी चांदीची किंमत 71700 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. 

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४८ हजार ६८० ४८ हजार ५१०
पुणे  ४८ हजार ६८० ४८ हजार ५१०
जळगाव  ४८ हजार ६८० ४८ हजार ५१०
कोल्हापूर ४८ हजार ६८० ४८ हजार ५१०
लातूर ४८ हजार ६८० ४८ हजार ५१०
सांगली ४८ हजार ६८० ४८ हजार ५१०
बारामती  ४८ हजार ६८० ४८ हजार ५१०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४७ हजार ६८० ४७ हजार ५१०
पुणे  ४७ हजार ६८० ४७ हजार ५१०
जळगाव  ४७ हजार ६८० ४७ हजार ५१०
कोल्हापूर ४७ हजार ६८० ४७ हजार ५१०
लातूर ४७ हजार ६८० ४७ हजार ५१०
सांगली ४७ हजार ६८० ४७ हजार ५१०
बारामती  ४७ हजार ६८० ४७ हजार ५१०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ७१ हजार ७०० ७१ हजार ०००
पुणे  ७१ हजार ७०० ७१ हजार ०००
जळगाव  ७१ हजार ७०० ७१ हजार ०००
कोल्हापूर ७१ हजार ७०० ७१ हजार ०००
लातूर ७१ हजार ७०० ७१ हजार ०००
सांगली ७१ हजार ७०० ७१ हजार ०००
बारामती  ७१ हजार ७०० ७१ हजार ०००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी