सोने चांदी भाव, ८ सप्टेंबर २०२०:  सोन्याच्या वायदा भावात घट, चांदीही घसरली फटाफट चेक करा ८ सप्टेंबरचा भाव

 Today Gold and Silver Rate| वायदा बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या व्यापारी सत्रात मंगळवारी सोन्यात घट पाहायला मिळाली आहे.

Gold and Silver Rate 8 September 2020
सोने चांदी भाव, ८ सप्टेंबर २०२० 

थोडं पण कामाचं

  • वायदा बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या व्यापारी सत्रात मंगळवारी सोन्यात घट पाहायला मिळाली आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर मंगळवारी वायदा भावात वाढ पाहायला मिळाली.  
  • सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात किरकोळ घट आली.

Gold Price Today, सोने चांदी आजचा भाव, ८ सप्टेंबर २०२०:  नवी दिल्ली : वायदा बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या व्यापारी सत्रात मंगळवारी सोन्यात घट पाहायला मिळाली आहे. .  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.  एमसीएक्स (MCX)वर सकाळी  ९ वाजता पाच ऑक्टोबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात २६२ रुपयांची घट होऊन प्रती १० ग्रॅम ५० हजार ८०३ रुपयांवर ट्रेंड करत होता. जागतिक स्तरावर मंगळवारी सोन्याच्या वायदा किंमतीत घट दिसून आली. 

 
दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी  चांदीच्या वायदा किंमतीत घट दिसली आहे.  एमसीएक्सवर चार सप्टेंबर  २०२० च्या चांदीचा भाव  मंगळवारी सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी ४६८ रुपयांच्या घटीसह ६७ हजार ८०३ रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती.  जागतिक स्तरावर मंगळवारी चांदीच्या वायदा किंमतीत घट दिसून आली.  सप्टेंबरमध्ये चांदीच्या किंमती गेल्या महिन्याच्या तुलनेत सुमारे १०हजार रुपये प्रती किलोग्रॅमपर्यंत घट दिसून आली आहे. 

 
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर मंगळवारी वायदा भावात वाढ पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोने ऑक्टोबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या ०४.०० डॉलर म्हणजे ०.२१ टक्के वाढीसह १९३८.३० डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव ०.१४ टक्के म्हणजे २.६३ डॉलरच्या घटीसह १९३१.८९ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर मंगळवारी सकाळी  चांदीत वाढ पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर डिसेंबरच्या करारची चांदीचा वायदा भाव गेल्या सत्राच्या ०.५५ डॉलर म्हणजे २.०७ टक्के वाढीसह २७.२७ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव ०.३६ टक्के म्हणजे ०.९० डॉलरच्या वाढीसह २६.९३ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 
 

महाराष्ट्रात सोने चांदी झाले स्वस्त

सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात किरकोळ घट आली.  आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम ४०  रुपयांनी महागले. प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५० हजार ५५० रुपयांवर सुरू आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४९ हजार ५५०  रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर ५० हजार ५९० रुपयांवर बंद झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ४९ हजार ५९०  रुपयांवर  बंद झाला होता.

सोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरात  सुरूवातीला भरघोस वाढ  दिसून आली. चांदीत ८५० रुपये प्रति किलोची वाढ झाली.  काल  ६७ हजार १०० वर असलेली चांदी आज  ६८ हजार ००० रुपयांवर विक्री सुरू आहे. 

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५० हजार ५५० ५० हजार ५९०
पुणे  ५० हजार ५५० ५० हजार ५९०
जळगाव  ५० हजार ५५० ५० हजार ५९०
कोल्हापूर ५० हजार ५५० ५० हजार ५९०
लातूर ५० हजार ५५० ५० हजार ५९०
सांगली ५० हजार ५५० ५० हजार ५९०
बारामती  ५० हजार ५५० ५० हजार ५९०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४९ हजार ५५० ४९ हजार ५९०
पुणे  ४९ हजार ५५० ४९ हजार ५९०
जळगाव  ४९ हजार ५५० ४९ हजार ५९०
कोल्हापूर ४९ हजार ५५० ४९ हजार ५९०
लातूर ४९ हजार ५५० ४९ हजार ५९०
सांगली ४९ हजार ५५० ४९ हजार ५९०
बारामती  ४९ हजार ५५० ४९ हजार ५९०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६८ हजार ००० ६७ हजार १००
पुणे  ६८ हजार ००० ६७ हजार १००
जळगाव  ६८ हजार ००० ६७ हजार १००
कोल्हापूर ६८ हजार ००० ६७ हजार १००
लातूर ६८ हजार ००० ६७ हजार १००
सांगली ६८ हजार ००० ६७ हजार १००
बारामती  ६८ हजार ००० ६७ हजार १००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी