सोने चांदी भाव, 9 मार्च  2021: वायदा सोन्यात तेजी, चांदीही महागली, फटाफट चेक करा 9 मार्चचा भाव

Gold and Silver Rate | मंगळवारी सोन्याचे वायदा भाव वाढले. चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी चांदीचे भाव वाढले

gold and silver rate 9 March 2021
सोने चांदी भाव, 9 मार्च  2021 

थोडं पण कामाचं

  • मंगळवारी सोन्याचे वायदा भाव वाढले.
  • स्थानिक बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी चांदीचे भाव वाढले
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी वायदा  भावात वाढ पाहायला मिळाली.  

Gold Price , सोने चांदी  भाव, 9 मार्च 2021:  नवी दिल्ली :   मंगळवारी सोन्याचे वायदा भाव वाढले . एप्रिल २०२१ मध्ये सकाळी 10:02  वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) डिलीव्हरी सोन्याच्या किंमती Rs 110 रुपयांनी म्हणजे 0.25 टक्क्यांनी वाढून ते प्रति 10 ग्रॅम 44,328 रुपयांवर आल्या. मागील सत्रात एप्रिलमध्ये सोन्याचे मूल्य प्रति 10 ग्रॅम 44,218 रुपये होते. त्याच वेळी जून २०२१ मध्ये डिलिव्हरी सोन्याचा दर 144 रुपयांनी म्हणजेच 0.32 टक्क्यांनी घसरून 44,575 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. मागील सत्रात जून 2021 च्या सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 44,431 रुपये होती.

वायदा बाजारात चांदीची किंमत (Silver Price in Futures Market)   

दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी   चांदीच्या किंमतीत वाढ दिसली आहे.  मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर  मे 2021 च्या वायदा चांदीची किंमत 162 रुपये म्हणजे 0.25 टक्क्यांनी वाढून 66,014 रुपये प्रति किलो झाली. गेल्या सत्रात मे च्या कराराची चांदीची किंमत 65,852  रुपये प्रति किलो होती.  त्याचप्रमाणे जुलै २०२१ मध्ये डिलिव्हरी चांदी 208 रुपये म्हणजे 0.31 टक्यांच्या तेजीसह 67,126  रुपये प्रतिकिलो पातळीवर घसरली.  गेल्या सत्रात जुलैच्या कराराची चांदीची किंमत 66,918 रुपये प्रति किलो होती. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी   सकाळी वायदा  भावात वाढ पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव 7.60  डॉलर म्हणजे 0.45 टक्क्यांच्या वाढीसह 1,685.60 ड डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव (Gold Price) 0.29  टक्के म्हणजे 4.94 डॉलरच्या वाढीसह  1,688.48  डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  दुसऱ्या दिवशी मंगळवारी     वैश्विक वायदा भावात वाढ पाहायला मिळाली.    चांदीची किंमत 0.15 डॉलर किंवा 0.58 टक्क्यांनी वाढून 25.42 औंस डॉलर प्रति औंसवर स्थिरावली. हाजीर बाजारात चांदीची किंमत  0.21 डॉलर म्हणजे 0.84 टक्के वाढीसह 25.34 डॉलर प्रति औंस सुरू होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी