Gold Price: सोन्याचा भाव वधारला, जाणून घ्या आजचे सोन्याचे दर!

काम-धंदा
Updated Jun 18, 2019 | 21:40 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोबतच चांदीचा भावही वधारलाय.आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि स्थानिक ज्वेलर्सची वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली. पाहा आजचे सोनं-चांदीचे दर

Gold Rate
सोने-चांदी महागले  |  फोटो सौजन्य: BCCL

नई दिल्ली: सोनाच्या दरात आज पुन्हा वाढ झालीय. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे आजचे दर १०० रुपयांनी वाढलेले आहेत. सोन्याच्या दरात झालेल्या वाढीमागे स्थानिक ज्वेलर्सची मागणी आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती असल्याचं समजतंय. तर चांदीचे दरही १३० रुपयांनी वाढलेले आहेत. सोन्याचे दर १०० रुपयांनी वाढत ३३७२० रुपयांवर पोहोचले. तर चांदीही १३० रुपयांच्या वाढीसह ३८२२० रुपये इतका झालाय. चांदीची आज इंडस्ट्रियल यूनिट आणि चांदीच्या नाण्यांची मागणी वाढल्यामुळे चांदीचे दर वधारले.

केडिया कमोडिटीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, "फेडरल रिझर्व्हच्या मिनिट्सची वाट बघितली जातेय. अमेरिकेतील केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हची आज बैठक आहे. केडिया यांच्यामते आंतरराष्ट्रीय पातळीवर आगामी काळात सोन्याचे दर १३६० ते १३७५ डॉलर प्रति औंसवर पोहोचतील. तर MCX वर सोन्याचे दर ३३६०० रुपयांपर्यंत जावू शकतात.

तर एंजेल ब्रोकिंगचे डीवीपी अनुज गुप्ता यांच्या मते आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे दर १३५० पासून १३५५ ची लेव्हल टेस्ट करणार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, MCX वर सोनं ३३,३०० रुपये दरांवर दिसू शकतं.

आज आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे दर १३४४ डॉलर आणि चांदी १४.९६ डॉलर दरानं सुरू आहे. राजधानी दिल्लीमध्येही असेच काही वातावरण पहायला मिळाले. दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्ध असलेल्या सोन्याच्या दरात मंगळवारी १००-१०० रुपयांनी वाढ होत ३३,७२० रुपये आणि ३३,५५० रुपयांवर पोहोचला. तर ८ ग्रामच्या सोन्याच्या नाण्यांचा भाव २६,८०० रुपये होता.

तर चांदीच्या दरात १४० रूपयांनी वाढ होत ३८,४०० रुपयांवर स्थिरावला आहे. तर आठवड्यातील डिलिव्हरीवाली चांदीचे दर १४० रुपये वाढून ३७,२५६ रुपये प्रति किलोवर पोहोचले. दुसरीकडे चांदीच्या शिक्क्यांचे दर आज स्थिर राहिले. चांदीच्या नाण्यांचा लिलाव ८० हजार रुपये प्रति शेकडावर तर विक्रीचा दर ८१ हजार रुपयांवर पोहचला आहे. रायपुरच्या सराफा बाजारात शुक्रवारी ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर ३३,८०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका राहीला. तर चांदीचा भाव ३८,१०० रुपये प्रति किलोवर पोहचला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Gold Price: सोन्याचा भाव वधारला, जाणून घ्या आजचे सोन्याचे दर! Description: Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोबतच चांदीचा भावही वधारलाय.आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि स्थानिक ज्वेलर्सची वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली. पाहा आजचे सोनं-चांदीचे दर
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola