Gold and Silver Rate Today, 04 July 2022: नवी दिल्ली: आयात शुल्कात वाढ आणि ट्रेझरीच्या परताव्यात घट झाल्यामुळे सोन्याच्या भावात (Gold Price) पुन्हा तेजी आली आहे. भारतात सोन्याच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे. डॉलर अलीकडच्या दोन दशकांच्या उच्चांकाच्या जवळ पोचला होता. त्यामुळे इतर चलनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सोने कमी आकर्षक बनले होते. मात्र आता देशातील बाजारपेठेत सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या भावातदेखील तेजी आली आहे. (Gold surges amid global trends, silver also hikes)
एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.07 % जास्त, 0.36 टक्क्यांनी किंवा 187 रुपयांनी वाढून 52,104 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत होते. तर चांदीचा भाव 0.43 टक्क्यांनी किंवा 250 रुपयांनी वाढून 58,425 रुपये प्रति किलो झाला. सोन्याकडे महागाई विरोधात बचावाचे साधन म्हणून पाहिले जाते. अल्प-मुदतीचे वाढलेले अमेरिकेतील व्याजदर आणि बॉंडच्या उत्पन्नामुळे सोने होल्डिंगचा खर्च वाढतो, ज्यामध्ये कोणतेही व्याज मिळत नाही. एक मजबूत अमेरिकन डॉलर इतर चलनांमध्ये गुंतवणूक करणार्या खरेदीदारांसाठी सोने कमी आकर्षक बनवते.
अधिक वाचा : ITR Filing: कमी पगार असूनही टीडीएस कापला गेला आहे, नो टेन्शन! असा मिळेल रिफंड
प्रीतम पटनायक, प्रमुख - कमोडिटीज, अॅक्सिस सिक्युरिटीज म्हणाले की, तीन आठवड्यांच्या घसरणीच्या ट्रेंडनंतरही सोन्याचे भाव स्थिर आहेत. मात्र ही स्थिती तात्पुरती वाटते.
अमेरिकन आयएसएम मॅन्युफॅक्चरिंगनंतर शुक्रवारी मंदीची भीती वाढली असूनही, पीएमआय दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरला, असेही ते म्हणाले. "रशिया आणि युक्रेनमधील भू-राजकीय तणाव आणि बटिंग सपोर्ट प्रदान करण्यात चीनचे अपयश यामुळे जगातील तणाव वाढला आहे."
भारताने सोन्यावरील मूलभूत आयात शुल्क 7.5 टक्क्यांवरून 12.5 टक्के केले आहे. सरकारने शुक्रवारी सांगितले की, भारत हा सोन्याचा जगातील दुसरा-सर्वात मोठा ग्राहक असून मागणी कमी करण्याचा आणि व्यापार तूट कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. मागणी कमकुवत राहिल्याने भारतातील सोन्याच्या विक्रेत्यांनी गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात सवलती देऊ केल्या. आयात कर वाढीमुळे व्याज आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : Bank FD: पीएनबी, एचडीएफसी, एसबीआय या बॅंकांमध्ये कोणती बॅंक एफडीवर सर्वाधिक व्याज देतेय ते जाणून घ्या
भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, स्पॉट मार्केटमध्ये, सर्वोच्च शुद्धतेचे सोने 51,791 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर होते. तर चांदीची किंमत 57,773 रुपये प्रति किलो इतकी होती. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या भावात सुमारे 1,000 रुपयांची वाढ झाली आहे. तर गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात प्रति किलो 3,800 पेक्षा जास्त घसरण झाली आहे.
राहुल कलंत्री, व्हीपी कमोडिटीज, मेहता इक्विटीज यांनी सांगितले की, अमेरिका, ब्रिटन आणि युरोपियन मध्यवर्ती बँक प्रमुखांनी महागाईचा सामना करण्यासाठी अधिक धोरणात्मक कारवाईचे संकेत दिल्यानंतर गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावांमध्ये उच्च अस्थिरता दिसून आली. आयातीला आळा घालण्यासाठी आणि रुपयाला आधार देण्यासाठी भारत सरकारने सोन्यावर अचानक शुल्क वाढ केल्यानंतर देशांतर्गत बाजारात शुक्रवारी सोन्याचे भाव वाढले.
शुक्रवारी 1,783.50 डॉलर या पाच महिन्यांच्या नीचांकी स्तरावर पोचल्यानंतर स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी घसरून 1,807.19 डॉलर प्रति औंस झाला. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.5 टक्क्यांनी वाढून 1,809.50 डॉलरवर पोचले. स्पॉट सिल्व्हर 0.2 टक्क्यांनी घसरून 19.82 डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम 0.5 टक्क्यांनी घसरून 884.39 डॉलर आणि पॅलेडियम 0.6 टक्क्यांनी घसरून 1,948.50 डॉलरवर आले.