Gold-Silver Rate Today, 05 July 2022: सोन्यातील तेजी कायम, चांदीच्या भावातही चांगली वाढ, लगेच पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 05 July 2022 : सोन्याच्या भावातील तेजी सुरूच आहे. आज मंगळवारी भारतीय बाजारात सोन्याच्या भावातील (Gold Price)वाढ सुरूच राहिली. सोने आज 52,000 रुपयांच्या व्यवहार करते आहे. वायदे बाजारात म्हणजे एमसीएक्सवर (MCX)सोन्याचे फ्युचर्स 0.15 टक्क्यांनी वाढून किंवा 80 रुपयांनी वाढून 52,202 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत होते.

Gold and Silver Rate Today: Gold Price rises
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात वाढ सुरूच 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावातील वाढ सुरूच
  • चांदीच्या भावातदेखील तेजी
  • जागतिक आणि देशांतर्गत घटक सोने-चांदीच्या वाढीसाठी अनूकूल

Gold and Silver Rate Today, 05 July 2022 : नवी दिल्ली : सोन्याच्या भावातील तेजी सुरूच आहे. आज मंगळवारी भारतीय बाजारात सोन्याच्या भावातील (Gold Price)वाढ सुरूच राहिली. सोने आज 52,000 रुपयांच्या व्यवहार करते आहे. वायदे बाजारात म्हणजे एमसीएक्सवर (MCX)सोन्याचे फ्युचर्स 0.15 टक्क्यांनी वाढून किंवा 80 रुपयांनी वाढून 52,202 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे चांदीचा भाव (Silver Price) 0.43 टक्क्यांनी वाढून 252 रुपयांनी 58,740 रुपये प्रतिकिलो झाला. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या भावात जोरदार वाढ सुरू झाली आहे. (Gold prices continue to rise, silver also gains, check the latest rates)

भारतात आयात शुल्कात वाढ आणि अमेरिकन ट्रेझरीच्या परताव्यात घट झाल्यामुळे सोन्याच्या भावात पुन्हा तेजी आली आहे.  सोन्याकडे महागाई विरोधात बचावाचे साधन म्हणून पाहिले जाते. अल्प-मुदतीचे वाढलेले अमेरिकेतील व्याजदर आणि बॉंडच्या उत्पन्नामुळे सोने होल्डिंगचा  खर्च वाढतो, ज्यामध्ये कोणतेही व्याज मिळत नाही. एक मजबूत अमेरिकन डॉलर इतर चलनांमध्ये गुंतवणूक करणार्‍या खरेदीदारांसाठी सोने कमी आकर्षक बनवते.

अधिक वाचा : Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवाला यांना मोठा झटका, 3 महिन्यांत झाले 8 हजार कोटींचे नुकसान

जाणकार काय म्हणतात?

कोटक सिक्युरिटीजचे ईपीएटी, व्हीपी-हेड कमोडिटी रिसर्च, सीएमटी,  रवींद्र राव यांनी सांगितले की, सोन्याच्या भावाला बॉंडच्या परताव्यात झालेली घट, वाढत्या महागाईची चिंता आणि चीनमधील विषाणूची चिंता यामुळे सपोर्ट मिळाला आहे. म्हणजेच हे घटक सोन्याच्या भाववाढीसाठी अनूकूल ठरले आहेत. "मात्र अमेरिकन फेडरल रिझर्व्ह आणि इतर मध्यवर्ती बँकांची कठोर  आर्थिक भूमिका, अमेरिकन डॉलरचे वाढते मूल्य आणि गोल्ड ईटीएफमधून सतत काढून घेतली जाणारी गुंतवणूक आणि आयात शुल्क वाढीमुळे भारतीय मागणीत येणारी संभाव्य मंदी याचाही परिणाम सोन्याच्या भावावर होतो आहे," ते पुढे म्हणाले.

मागणी कमकुवत राहिल्यामुळे भारतातील सराफांनी गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात सवलती देऊ केल्या, आयात कर वाढीमुळे व्याज आणखी वाढण्याची शक्यता आहे, तर मुख्य ग्राहक असलेल्या चीनने कोविडसंदर्भात परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणली आहे. 

अधिक वाचा : ITR Filing: कमी पगार असूनही टीडीएस कापला गेला आहे, नो टेन्शन! असा मिळेल रिफंड

भारतातील सोन्याची स्थिती

भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, स्पॉट मार्केटमध्ये, सर्वोच्च शुद्धतेचे सोने 52,218 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर होते. तर चांदीचा भाव 58,123 रुपये प्रति किलो होता. सोन्याच्या स्पॉट किंमती गेल्या एका आठवड्यात सुमारे 1,100 रुपयांनी वधारल्या आहेत. तर याच कालावधीत चांदीचा भाव 2,700 प्रति किलोपेक्षा जास्त घसरला आहे. सोन्याच्या भावावर काही प्रमाणात विक्रीचा दबाव जाणवू शकतो. कारण गुंतवणुकदार बुधवारी होणाऱ्या अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या (US Fed)बैठकीनंतर प्रकाशित होणाऱ्या मुख्य मुद्द्यांची  वाट पाहत आहेत, असे शेअरइंडियाचे उपाध्यक्ष आणि संशोधन प्रमुख रवी सिंग यांनी सांगितले.

"अमेरिकन फेडरल रिझर्व्ह या महिन्यात आणखी 75 bps व्याजदर वाढवू शकेल अशी अपेक्षा आहे. मात्र अधिक आक्रमक पावले उचलली गेल्यास सोन्याच्या भावावर मोठा परिणाम दिसून शकतो.," ते पुढे म्हणाले.

अधिक वाचा : Radhakishan Damani : डी-मार्टचे मालक राधाकिशन दमानी यांनी शेअर बाजाराच्या घसरणीत 3 महिन्यांत गमावले 26,000 कोटी

जागतिक बाजारपेठ

स्पॉट गोल्ड प्रति औंस 1,809.45 डॉलरवर स्थिर होता. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.5 टक्क्यांनी वाढून 1,809.90 डॉलरवर पोचले. स्पॉट सिल्व्हर 0.7 टक्क्यांनी वाढून 20.09 डॉलर प्रति औंस, तर प्लॅटिनम 0.3 टक्क्यांनी घसरून 883.39 डॉलर आणि पॅलेडियम 0.1 टक्क्यांनी घसरून 1,924.60 डॉलरवर आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी