Gold-Silver Rate Today, 07 July 2022: मजबूत डॉलरने केली सोन्याच्या मुस्कटदाबी, सोन्याच्या भाव किंचित वाढला मात्र थांबली घोडदौड

Gold and Silver Rate Today, 07 July 2022: मागील सत्रात आधीच्या कित्येक महिन्यांच्या तुलनेत सोन्याच्या भावात (Gold Price) वाढ झाली आहे. चांदीच्या भावातदेखील (Silver Price) वाढ झाली असली तरी त्यावर दबाव आहे. मात्र हा दिलासा तात्पुरता असू शकतो, असा इशारा तज्ञांनी दिला. आंततराष्ट्रीय बाजारात डॉलर चांगलाच मजबूत झाला आहे. त्यामुळे सुरक्षित अशा सोने आणि चांदीच्या बाजारावर दबाव आला आहे.

Gold and Silver Rate Today: Gold rises marginally
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात किंचित वाढ 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावात थोडीशी वाढ
  • चांदीही थोडीशी वधारली
  • मात्र सराफा बाजारावर अमेरिकन घटकांचा दबाव

Gold and Silver Rate Today, 07 July 2022 : नवी दिल्ली : मागील सत्रात आधीच्या कित्येक महिन्यांच्या तुलनेत सोन्याच्या भावात (Gold Price) वाढ झाली आहे. चांदीच्या भावातदेखील (Silver Price) वाढ झाली असली तरी त्यावर दबाव आहे. मात्र हा दिलासा तात्पुरता असू शकतो, असा इशारा तज्ञांनी दिला. आंततराष्ट्रीय बाजारात डॉलर चांगलाच मजबूत झाला आहे. त्यामुळे सुरक्षित अशा सोने आणि चांदीच्या बाजारावर दबाव आला आहे. एमसीएक्सवर (MCX) गोल्ड फ्युचर्स जास्त व्यापार करीत होते, ते 0.29 टक्के किंवा 148 रुपये वाढून प्रति 10 ग्रॅम 50,648 रुपयांच्या पातळीवर होते. त्याचप्रमाणे, चांदीचा फ्युचर्सचा व्यवहार 0.58 टक्क्यांनी किंवा 331 रुपयांनी वाढून प्रति किलो 57,057 रुपयांच्या पातळीवर पोचला होता. (Gold & silver prices are under pressure amid rising dollar)

अधिक वाचा : मुकेश अंबानींची आणखी एक मोठी डील, आता रिलायन्स स्टोअरमध्ये मिळणार 'GAP' प्रोडक्ट्स

अमेरिकन घटकांचा सोन्यावर दबाव

महागाईच्या आघाडीवर दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळे फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांकडून अमेरिकेच्या केंद्रीय बँकेच्या जूनच्या 14-15 जूनच्या बैठकीनंतरच्या धोरणाचीच री ओढताना व्याजदर वाढीचेच संकेत देण्यात आले. अमेरिकन डॉलरच्या निर्देशांकात 0.65 टक्के वाढ झाल्यामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या भाव काल वाढ झाली. अमेरिकन बेंचमार्क ट्रेझरी परताव्यातदेखील 3 टक्के वाढ झाली आणि सोने-चांदीच्या भावांवर दबाव आला. अमेरिकेतील अर्थव्यवस्थेसंदर्भातील व्यापक आघाडीवरून रोजगारासंदर्भातील आकडेवारी आधी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा चांगली दिसून आली. 

अधिक वाचा : Children Adhar Card : मुलांचं आधार कार्ड बनवताना या गोष्टी विसरू नका, अन्यथा भविष्यात होईल डोकेदुखी

अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे धोरण

अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीतील महत्त्वाच्या मुद्द्यांनुसार बहुतेक अधिकाऱ्यांनी जुलै महिन्यात त्यांच्या पुढच्या बैठकीत महागाई कमी करण्यासाठी व्याजदर 50 किंवा 75 बेस पॉईंट्सने वाढविण्याचे समर्थन केले, असे आयसिसिडायरेक्टने आपल्या नोटमध्ये सांगितले. “त्याच वेळी, जागतिक बाजारपेठेतील आशावादी भावना आणि अमेरिकेच्या दहा वर्षांच्या ट्रेझरीच्या परताव्यामुळे सोने-चांदीच्या भावात वाढ झाली,” असे त्यात नमूद केले.

अधिक वाचा : Life Insurance : तुमच्यासाठी किती रकमेचा आयुर्विमा पुरेसा ठरेल? यासाठीची सूत्रे जाणून घ्या

सोन्याची मागणी 

भारतातील सराफांनी गेल्या आठवड्यात जोरदार सवलत दिली. कारण बाजारातील सोन्याची मागणी कमकुवत राहिली आहे. त्यातच आयात शुल्क वाढीवर व्याजदर वाढीचा दबाव दिसण्याची मिळण्याची शक्यता आहे. तर सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या चीनमधील कोरोनामुळे प्रभावातील झालेली अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येते आहे. 

स्पॉट मार्केटमध्ये, सर्वाधिक शुद्ध सोने प्रति 10 ग्रॅम 51,298 रुपयांना विकले गेले तर बुधवारी चांदीचा भाव 56,449 रुपयांच्या पातळीवर होता. शेवटच्या सत्राच्या तुलनेत सोन्याचा स्पॉट भाव 1,000 रुपयांपेक्षा जास्त वाढला आहे. तर चांदी त्याच काळात प्रति किलो 1,700 रुपयांनी घसरली आहे. 

मेहता इक्विटीजचे व्हीपी कमोडिटीज, राहुल कलंत्री म्हणाले की, सोन्यातील विक्री नऊ महिन्यांच्या नीचांकीपर्यंत पोचली आहे. 
"उर्जेच्या संकटामुळे आणि मोठ्या महागाईमुळे युरोपियन युनियनला सर्वाधिक धोका असल्याचे दिसते आहे. कारण युरोने 20 वर्षांची नीचांकी गाठली आहे. गुंतवणुकदार मौल्यवान आणि औद्योगिक धातूंमध्ये विक्रीचे धोरण अवलंबत आहेत आणि अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवणूक वाढवत आहेत. " असे ते पुढे म्हणाले. 

जागतिक बाजार

सुरक्षित सोन्याच्या भावाला सपोर्ट करत स्पॉट गोल्ड प्रति औंस 0.3 टक्क्यांनी वाढून 1,744.19 डॉलर प्रति औंसवर पोचले. तर यूएस गोल्ड फ्युचर्स 0.3 टक्क्यांनी वाढून 1,741.80 डॉलरवर पोचले.  स्पॉट सिल्व्हरमध्ये 0.7 टक्क्यांनी वाढून 19.3२ डॉलर प्रति औंसवर पोचले, तर प्लॅटिनम 0.2 टक्क्यांनी वाढून  857.53 डॉलरवर आणि पॅलेडियम 1.2 टक्क्यांनी वाढून 1,927.92 डॉलरवर पोचले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी