Gold-Silver Rate Today, 08 July 2022: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावावर दबाव, चांदीही घसरली; सोन्यात मोठ्या घसरणीची शक्यता, पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 08 July 2022 : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सोन्या-चांदीच्या भावात (Gold-Silver Price) घसरण नोंदवण्यात आली. शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात कमजोरी नोंदवण्यात आली. आठवडाभरापूर्वी सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात ५ टक्के वाढ केली होती. यानंतर सलग तीन दिवस सोन्याच्या दरात वाढ झाली होती. मंगळवारी 52 हजारांच्या वर बंद झालेले सोने आता 51 हजारांच्या खाली जाते आहे.

Gold and Silver Rate Today: Gold price drops
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात घसरण 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय बाजारात दबाव
  • चांदीच्या भावात किंचित घसरण
  • आगामी काळात सोने-चांदी घसरण्याची शक्यता

Gold and Silver Rate Today, 08 July 2022: नवी दिल्ली : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सोन्या-चांदीच्या भावात (Gold-Silver Price) घसरण नोंदवण्यात आली. शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात कमजोरी नोंदवण्यात आली. आठवडाभरापूर्वी सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात ५ टक्के वाढ केली होती. यानंतर सलग तीन दिवस सोन्याच्या दरात वाढ झाली होती. मंगळवारी 52 हजारांच्या वर बंद झालेले सोने आता 51 हजारांच्या खाली जाते आहे. शुक्रवारी चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली.मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोन्यात किंचित वाढ आणि चांदीच्या दरात घसरण झाली. (Gold under pressure, silver also drops, check latest rates)

अधिक वाचा : Bank of Baroda Update : महत्त्वाचे! बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी चेकसाठी लागू झाला नवा नियम...जर 'हे' केले नाही तर चेक अडकणार

सोने आणि चांदीचा ताजा भाव

मल्टी-कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर, ऑगस्टमधील सोन्याचा वायदा वाढून 50,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. सप्टेंबरचा चांदीचा वायदा 0.07 टक्क्यांनी घसरून 56,899 रुपये प्रति किलोग्रॅमवर होता. दोन दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे भाव स्थिर राहिले. दोन्ही मौल्यवान धातू आंतरराष्ट्रीय बाजारात किंचित सकारात्मक नोंदीवर स्थिरावले.

अधिक वाचा : Salary Protection Insurance: आता नोकरी गेल्यावरही दर महिन्याला खात्यात येणार पगार! पगार संरक्षण विम्याचे संपूर्ण गणित जाणून घ्या

चांदीचा भाव किलोमागे 255 रुपयांनी घसरला

शुक्रवारी इंडिया बुलियन असोसिएशनने (https://ibjarates.com) जारी केलेल्या दरानुसार, सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 6 रुपयांनी किरकोळ घसरून 50,877 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तसेच चांदीचा भाव 255 रुपयांनी घसरून 56626 रुपये प्रति किलो झाला. वेबसाइटनुसार, 23 कॅरेट सोन्याचा दर 50673 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा भाव 46606 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 20 कॅरेट सोन्याचा भाव 38158 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

ऑगस्ट फ्युचर्स शुक्रवारी आंतरराष्ट्रीय स्पॉट किमतींमध्ये दिसलेल्या सकारात्मक ट्रेंडचा मागोवा घेत उच्च व्यवहार करत होते कारण डॉलर दोन दशकांच्या उच्चांकावरून किंचित खाली आला होता. सोने एका महिन्याहून अधिक काळातील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण नोंदवणार आहे, असे रॉयटर्सच्या अहवालात म्हटले आहे. या आठवड्यात सोन्याचे भाव 3.7 टक्क्यांनी घसरले आहेत, असे आकडेवारीवरून दिसून आले आहे.

अधिक वाचा : SBI : स्टेट बॅंकेच्या ग्राहकांनी लगेच अकाउंट चेक करा, बॅंकेने बंद केली असंख्य खाती, या खात्यातील व्यवहार थांबवले...

शुद्धता कशी ओळखावी

सोने खरेदी करण्यापूर्वी शुद्धता जाणून घेणे आवश्यक आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.

महागाईच्या आघाडीवर दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळे फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांकडून अमेरिकेच्या केंद्रीय बँकेच्या जूनच्या 14-15 जूनच्या बैठकीनंतरच्या धोरणाचीच री ओढताना व्याजदर वाढीचेच संकेत देण्यात आले. अमेरिकन डॉलरच्या निर्देशांकात 0.65 टक्के वाढ झाल्यामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या भाव काल वाढ झाली. अमेरिकन बेंचमार्क ट्रेझरी परताव्यातदेखील 3 टक्के वाढ झाली आणि सोने-चांदीच्या भावांवर दबाव आला. अमेरिकेतील अर्थव्यवस्थेसंदर्भातील व्यापक आघाडीवरून रोजगारासंदर्भातील आकडेवारी आधी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा चांगली दिसून आली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी