Gold-Silver Rate Today, 09 June 2022 : सोन्याच्या तेजीला लगाम, अमेरिकन बॉंडच्या वाढत्या परताव्यामुळे सोने दबावात...पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 09 June 2022: मागील काही दिवसांपासून तेजीत आलेल्या सोन्याच्या भावाला (Gold Price)पुन्हा आळा बसला आहे. सोन्याचे भाव आज स्थिर आहेत. अमेरिकेतील आर्थिक घटकांचा प्रभाव सोन्याच्या भावावर पडतो आहे. वाढलेल्या महागाईशी लढण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve) व्याजदर-वाढीच्या धोरणाचा परिणाम सोन्याच्या भावावर होतो आहे.

Gold and Silver Rate Today:  Gold prices remains flat
Gold and Silver Rate Today: सोन्याचे भाव स्थिर 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावावर अमेरिकेतील घटकांचा दबाव
  • अमेरिकेतील नोकऱ्या आणि रोजगारासंदर्भातील आकडेवारी लवकरच अपेक्षित
  • अमेरिकन बॉंडच्या वाढत्या परताव्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किंमती स्थिर

Gold and Silver Rate Today, 09 June 2022 : नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून तेजीत आलेल्या सोन्याच्या भावाला (Gold Price)पुन्हा आळा बसला आहे. सोन्याचे भाव आज स्थिर आहेत. अमेरिकेतील आर्थिक घटकांचा प्रभाव सोन्याच्या भावावर पडतो आहे. वाढलेल्या महागाईशी लढण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve) व्याजदर-वाढीच्या धोरणाचा परिणाम सोन्याच्या भावावर होतो आहे. त्याचबरोबर या आठवड्यातील प्रमुख अमेरिकन नोकऱ्या (US Jobs) आणि महागाईविषयीची (Inflation) माहिती या आठवड्यात अपेक्षित आहे. त्याचाही दबाव सोन्याच्या भावावर दिसून येतो आहे. कारण या आकडेवारीनुसारच अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे पुढील धोरण ठरणार आहे. अमेरिकेतील साप्ताहिक प्रारंभिक रोजगाराचा डेटा या लवकरच अपेक्षित आहे. (Gold price remain flat amid of US jobs and inflation data, check latest rates) 

अधिक वाचा : RBI ने पुन्हा 0.50 टक्क्यांनी वाढवला रेपो रेट, कर्जाचा EMI वाढणार

सोन्याचा ताजा भाव

भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, स्पॉट मार्केटमध्ये बुधवारी सर्वाधिक शुद्धतेचे सोने 51,038 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीची किंमत 61,685 रुपये प्रति किलो इतकी होती. सोन्याच्या स्पॉट किंमती गेल्या एका आठवड्यात सुमारे 500 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढल्या आहेत, तर याच कालावधीत चांदीच्या किंमती 1,900 रुपये प्रति किलोच्या जवळ पोहोचल्या आहेत.

अधिक वाचा : Adani देणार जिओ मार्ट आणि ॲमेझाॅनला देणार टक्कर, Flipkart सोबत भागीदारी

जाणकारांचे मत

मेहता इक्विटीजचे कमोडिटीजचे उपाध्यक्ष राहुल कलंत्री, म्हणाले की, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीमुळे सोन्याच्या भावाला फायदा होत आहे. "सोने आणि चांदीसाठी, हे सर्व शुक्रवारी आणि पुढील आठवड्यात फेडच्या यूएस चलनवाढीच्या डेटाबद्दल आहे," ते पुढे म्हणाला. "महागाईसंदर्भातील माहितीमधील कोणतीही धक्कादायक बाब बाजारातील गोष्टी हलवू शकतात आणि सोने अलीकडील काळातील भावाची पातळी ओलांडू शकते."
तर ShareIndiaचे उपाध्यक्ष आणि संशोधन प्रमुख, रवी सिंग, म्हणाले की, "उच्च महागाईचा दबाव, उत्तर कोरियाशी संबंधित भू-राजकीय तणाव आणि जागतिक वाढीच्या चिंतेमुळे सोन्याच्या किंमती हळूहळू वर जात आहेत."

अधिक वाचा : बँकेत नोकरीची सुवर्ण संधी; IBPS तर्फे तब्बल 8106 जागांसाठी मेगाभरती जाहीर; त्वरीत करा अर्ज

जागतिक बाजारपेठेतील स्थिती

आज स्पॉट गोल्ड प्रति औंस 1,853.24 डॉलरवर स्थिर होते, तर यूएस गोल्ड फ्युचर्स 0.1 टक्क्यांनी घसरून 1,854.70 डॉलरवर आले. स्पॉट सिल्व्हर 0.2 टक्क्यांनी वाढून 22.07 डॉलर प्रति औंस झाला, तर प्लॅटिनम 0.3 टक्क्यांनी घसरून 1,003.46 डॉलरवर आला. बुधवारी पॅलेडियम 1,930.28 डॉलरच्या जवळपास तीन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्यानंतर 0.9 टक्क्यांनी वाढून 1,960.94 डॉलरच्या पातळीवर पोचला.

याआधी मागील काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात, सोमवारी सोन्याच्या किंमती एका आठवड्यापेक्षा जास्त काळातील त्यांच्या उच्चांकावर पोचल्या होत्या. कमकुवत डॉलरमुळे सोन्याच्या भावात तेजी येण्यास मदत झाली होती. यूएस ट्रेझरीने सराफामध्ये मर्यादित नफा मिळवला असला तरी सोन्याच्या भावात तेजी येण्यास मदत झाली. जागतिक शेअर बाजारात सततच्या विक्रीच्या दबावामुळे गुंतवणुकदार सोन्याकडे वळले होते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी