Gold-Silver Rate Today, 09 May 2022: सोन्याच्या भावात घसरण! अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे धोरण, बॉंडचा परतावा याचा सोन्यावर दबाव...पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 09 May 2022 : लग्नसराईच्या या हंगामात सोन्याच्या भावात (Gold Price)झालेल्या घसरणीचा फायदा तुम्ही घेऊ शकता. डॉलरच्या मूल्यात झालेल्या वाढीमुळे सुरक्षित गुंतवणूक समजल्या जाणाऱ्या सोन्यावर दबाव आला आहे. चादींचीही (Silver Price)चमक कमी होत घसरण झाली आहे. याचा परिणाम होत आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी सोन्याचे भाव घसरले. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (US Fed)अत्यंत आक्रमकपणे आपले धोरण पुढे नेत आहेत.

Gold and Silver Rate Today: Gold price drops
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात घसरण 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावात झाली घसरण, चांदीही उतरली
  • लग्नसराईत सर्वसामान्यांना खरेदीची संधी
  • अमेरिकन घटकांचा सोन्याच्या किंमतीवर दबाव

Gold and Silver Rate Today, 09 May 2022 : नवी दिल्ली : लग्नसराईच्या या हंगामात सोन्याच्या भावात (Gold Price)झालेल्या घसरणीचा फायदा तुम्ही घेऊ शकता. डॉलरच्या मूल्यात झालेल्या वाढीमुळे सुरक्षित गुंतवणूक समजल्या जाणाऱ्या सोन्यावर दबाव आला आहे. चादींचीही (Silver Price)चमक कमी होत घसरण झाली आहे. याचा परिणाम होत आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी सोन्याचे भाव घसरले. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (US Fed)अत्यंत आक्रमकपणे आपले धोरण पुढे नेत आहेत. तर अमेरिकन ट्रेझरीच्या वाढत्या परताव्यामुळे (US Treasury yields) सोन्याच्या भावावर अधिक दबाव आला आहे. स्पॉट गोल्ड घसरून 1,874.89 डॉलर प्रति औंस वर होते, तर अमेरिकन सोन्याचे फ्युचर्स देखील 0.4% घसरून 1,874.80 डॉलरवर आले आहेत. आगामी काळातदेखील अमेरिकतील आणि जागतिक घटकांचा प्रभाव सोन्याच्या भावावर पडणार आहे. त्याचबरोबर चांदीच्या भावातदेखील घसरण झाली आहे. (Gold prices under pressure of US fed policy & strong US yields, check latest rates)

अधिक वाचा : Warren Buffett Thoughts : पैशांच्या राशीवर लोळणारा कुबेर...'वॉरेन बफे' म्हणतात तुमच्याकडील संपत्ती हे तुमच्या यशाचे मोजमाप नाही...याला मानतात खरी संपत्ती

सोन्याचा आजचा भाव

आज सकाळी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 10 ग्रॅमसाठी सोन्याचा कॉन्ट्रॅक्ट 0.03 टक्क्यांनी किरकोळ घसरून 51,328 रुपये झाला, तर चांदीचा भाव 0.14 टक्क्यांनी घसरून 62,460 रुपये प्रति किलोग्रॅम झाला. देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे सोन्याला मागणी आहे. सोन्याच्या भावात घसरण झाल्याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होणार आहे.

अधिक वाचा : Cheapest Home Loan | कमी व्याजदरात होम लोन हवंय? मग या बँका देतायेत सर्वात कमी व्याजदरात होम लोन

अमेरिकन घडामोडी

आगामी धोरणाबाबत अमेरिकन फेडरल रिझर्व्ह आक्रमक धोरण स्वीकारत असल्यामुळे सोन्याच्या  किंमती दबावाखाली राहिल्या. मात्र आजचे सत्र सोन्याच्या किमतींसाठी महत्त्वपूर्ण असू शकते कारण रशियाने युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या नाटो देशांविरुद्ध आपल्या विजय दिनी युद्धाची घोषणा करण्याची धमकी दिली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यानंतर सोन्याच्या किंमतीत रिकव्हरी दिसून आली आहे. रशियाच्या विजयाच्या दिवशी इक्विटी मार्केटला धक्का बसू शकतो आणि सोन्यासारखा सुरक्षित गुंतवणूक प्रकार लोकांना अधिक आकर्षित करू शकतो. सोन्याला 50800 रुपयांचा सपोर्ट आणि 51500 रुपयांवर रेझिस्टन्स आहे आणि या पातळीच्या वरच्या किंमती 52000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. चांदीला 61800 रुपयांवर आणि 63500 रुपयांवर रेझिस्टन्स आहे, असे स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे वरिष्ठ कमोडिटी रिसर्च अॅनालिस्ट निरपेंद्र यादव यांनी सांगितले.

अधिक वाचा : Mother’s Day 2022 : आनंद महिंद्रा यांनी तामिळनाडूच्या 'इडली अम्मा'ला भेट दिले नवीन घर...मातृदिनाची सुंदर भेट, पाहा व्हिडिओ!

फेडरल रिझव्‍‌र्हचे चेअर जेरोम पॉवेल यांनी आगामी बैठकींमध्ये 75-बेसिस-पॉइंट दर वाढ नाकारल्याने सोने आणि चांदीने उडी घेतली, जूनच्या बाजाराच्या अपेक्षांच्या विरोधात. सोने सध्‍या 1900 डॉलरच्‍या पातळीची पुन:परीक्षण करत आहे आणि जर खराब आर्थिक डेटा दिसला तर तो 1938 डॉलरवर जाऊ शकतो. सोन्याची रॅली फेडच्या अधिक अनुकूल ट्रेंडला प्रतिसाद म्हणून होती. आता आपण सोन्यामध्ये जवळपास 30 डॉलरची तेजी पाहिली आहे, जर सोने 1900 डॉलरच्या वर टिकून राहिले तर आपण 1930 डॉलरपर्यंत आणखी चढ-उतार पाहू शकतो. अमेरिकन शेअर बाजार गडगडल्याचा मोठा परिणाम सोन्याच्या भावावर झाला आहे. भारतीय शेअर बाजारदेखील घसरल्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होऊ शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी