Gold-Silver Rate Today, 10 May 2022: अस्थिर शेअर बाजाराच्या पार्श्वभूमीवर...सोन्याचा भावात किंचित वाढ, कधी तेजी कधी मंदी...पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 10 May 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात (Gold Price) वाढ झाली. यामागे मुख्य कारण अमेरिकन ट्रेझरी परताव्यात (US Treasury) घसरण होणे हे आहे. डॉलरच्या स्थिर ताकदीमुळे सुरक्षित गुंतवणूक असलेल्या सोन्यावरील दबाव कमी झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 0.2% वाढून 1,856.75 डॉलर प्रति औंस वर होते. US सोने फ्युचर्स 0.3% घसरून 1,853.90 डॉलरवर होते.

Gold and Silver Rate Today: Gold prices rise
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात किंचित वाढ 
थोडं पण कामाचं
  • सोने आणि चांदीच्या भावात किंचित वाढ
  • अमेरिकन बॉंडचा परतावा, अस्थिर शेअर बाजाराचा सोन्याच्या भावावर परिणाम
  • आंतरराष्ट्रीय घटकांच्या प्रभावामुळे सोने दबावाखाली आणि अस्थिर

Gold and Silver Rate Today, 10 May 2022: नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात (Gold Price) वाढ झाली. यामागे मुख्य कारण अमेरिकन ट्रेझरी परताव्यात (US Treasury) घसरण होणे हे आहे. डॉलरच्या स्थिर ताकदीमुळे सुरक्षित गुंतवणूक असलेल्या सोन्यावरील दबाव कमी झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 0.2% वाढून 1,856.75 डॉलर प्रति औंस वर होते. US सोने फ्युचर्स 0.3% घसरून 1,853.90 डॉलरवर होते. सोन्याचा भाव सध्या अमेरिकेतील घडामोडी, अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे धोरण, डॉलरचे मूल्य, अमेरिकन बॉंडचा परतावा यांच्यावर अवलंबून आहे. या घटकांच्या हिंदोळ्यावर सोने आणि चांदीचा भाव दोलायमान आहेत. एमसीएक्सवर (MCX)देखील सोन्याच्या भावात किंचित वाढ झाली आहे. चांदीचा भावदेखील एमसीएक्सवर वधारला आहे. (Gold prices are volatile amid unstable share market & US factors)

अधिक वाचा : QR code scam : सावधान! क्युआर कोडद्वारे पैसे मिळत नाहीत...घोटाळ्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हे जाणून घ्या

सोन्याचा ताजा भाव

10-वर्षांसाठीच्या अमेरिकन बॉंडच्या परताव्यात मागील सत्रातील साडेतीन वर्षांतील सर्वोच्च पातळीपासून घट झाल्याने त्यांची घसरण वाढवली. त्याचा फायदा सराफा बाजाराला झाला. आज मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 0.21 टक्क्यांनी वाढून 51,065 रुपये 10 ग्रॅमवर ​​होता, तर चांदीचा भाव 0.67 टक्क्यांनी वाढून 61,912 रुपये प्रति किलोग्रामवर होता.

अधिक वाचा : PM-WANI : वाय-फायशी कनेक्ट करणे झाले सोपे, प्रत्येक वेळी OTP टाकण्याच्या त्रासातून मुक्ती

तेजी मंदीच्या हिंदोळ्यावर सोने

सध्या भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशात सोन्याच्या मागणीत वाढ होते. दुसरीकडे जागतिक आणि भारतीय शेअर बाजारात अस्थिरता आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण होते आहे. या घटकांचा सोन्याच्या भावावर परिणाम होतो आहे. एकीकडे अस्थिर वातावरणामुळे सुरक्षित गुंतवणूक प्रकार असलेल्या सोन्याच्या भावात वाढ होते तर दुसरीकडे मजबूत डॉलर आणि अमेरिकेतील बॉंडचा परतावा यामुळे सोन्याच्या भावावर दबाव येतो. त्यामुळे सध्यातरी सोन्याचे भाव अस्थिर दिसून येत आहेत.

अधिक वाचा :  Social Securities Scheme | अटल पेन्शन योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनांना 7 वर्षे पूर्ण... वैशिष्ट्ये, पात्रता, फायदे तपासा

डॉलर इफेक्ट

डॉलर निर्देशांक माफक प्रमाणात वाढला, तर बाँड उत्पन्नावर दबाव राहिला. सोन्याचा भाव तुलनेने स्थिर राहिला. चीनच्या व्यापार संतुलनाची आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमी आली, ज्यामुळे चांदी आणि इतर औद्योगिक धातूंवर घसरणीचा दबाव आला. सोन्याचे भाव उच्च पातळी राखण्यासाठी धडपडत आहेत आणि आजच्या सत्रात विक्रीचा दबाव अपेक्षित आहे. 51600 रुपयांवर त्याचा प्रतिरोध आणि 50900 रुपयांवर सपोर्ट आहे, या पातळीच्या खाली घसरल्याने 50500 रुपयांची चाचणी होण्याची शक्यता आहे. 61800 रुपयांच्या खाली गेल्यास चांदी 60000 रुपयांची पातळी तपासण्याची शक्यता आहे. प्रतिकार पातळी 63000 रुपयांवर आहे, असे स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे वरिष्ठ कमोडिटी संशोधन विश्लेषक निरपेंद्र यादव यांनी सांगितले. 

कॉमेक्स येथे सोन्याच्या किमती मंगळवारी सकाळच्या व्यापारात प्रति औंस 1860 डॉलरच्या जवळ आल्याने सोन्याच्या किंमती मजबूत झाल्या. यूएस बाँड उत्पन्न आणि कमकुवत डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याच्या किमतींनी समर्थन पातळीच्या जवळ घसरण थांबवली. इक्विटी निर्देशांकातील घसरणीनेही सोन्याला आधार दिला.

स्पॉट गोल्डमध्ये सोन्याला 1850 डॉलर पातळीचा आधार आणि 1872 डॉलर प्रति औंस पातळीचा अडसर राहण्याची शक्यता आहे. MCX गोल्ड जून फ्युचर्स सपोर्ट 50700 रुपये आणि रेझिस्टन्स रुपये 51300 प्रति 10 ग्रॅम आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी