Gold-Silver Rate Today, 11 July 2022: डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याच्या भावात घसरण,ही गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे का? पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 11 July 2022: सोमवारी भारतात सोन्याचा भाव घसरला. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 11 जुलै रोजी सोन्याचे वायदे 10 ग्रॅमसाठी 0.10 टक्क्यांनी घसरून 50,726 रुपयांवर आले. सोमवारी चांदीचे वायदे एक किलोसाठी 0.14 टक्क्यांनी घसरून 57,050 रुपयांवर आले. डॉलरच्या वाढत्या मूल्यामुळे सोने-चांदीच्या भावावर दबाव आणला आहे.

Gold and Silver Rate Today: Gold price drops
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात घसरण 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावात आज घसरण झाली
  • चांदीच्या भावातदेखील घसरण
  • अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याचा परिणाम

Gold and Silver Rate Today, 11 July 2022: नवी दिल्ली : सोमवारी भारतात सोन्याचा भाव घसरला. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 11 जुलै रोजी सोन्याचे वायदे 10 ग्रॅमसाठी 0.10 टक्क्यांनी घसरून 50,726 रुपयांवर आले. सोमवारी चांदीचे वायदे एक किलोसाठी 0.14 टक्क्यांनी घसरून 57,050 रुपयांवर आले. डॉलरच्या वाढत्या मूल्यामुळे सोने-चांदीच्या भावावर दबाव आणला आहे. (Gold prices drops marginally, silver also falls, check latest rates)

अधिक वाचा : EPFO Update: ईपीएफओच्या 73 लाख पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, लवकरच खात्यात ट्रान्सफर होणार रक्कम

आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती

आंतरराष्ट्रीय बाजारात,  स्पॉट सोन्याचा भाव 0.10 टक्क्यांनी घसरून 1,740.16 डॉलर प्रति औंस झाला. अमेरिकन सोन्याचे फ्युचर्स 0.2 टक्क्यांनी घसरून 1,739.50 डॉलरवर आले. डॉलर 20 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर स्थिरावला. अमेरिकेतील 10-वर्षांसाठीचा ट्रेझरी परतावा शुक्रवारी एक आठवड्याच्या उच्चांकीवर पोचला आहे.  युरोपियन युनियनमधील महागाई, मंदीची भीती आणि ऊर्जा संकट यामुळे युरो गेल्या दोन दशकांतील नीचांकी पातळीवर आला आहे.

अधिक वाचा : LIC Plan: एलआयसीच्या या बंपर प्लॅनमध्ये एकदा गुंतवणूक करा आणि मिळवा दरमहा 12 हजारांचे पेन्शन...

गुंतवणुकदारांचा कल

गुंतवणुकदार या आठवड्यात जाहीर होणाऱ्या जूनसाठीच्या युनायटेड स्टेट्सच्या ग्राहक किंमत निर्देशांकाचीच री ओढतील अशी चिन्हे आहेत. वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणानुसार, जूनमध्ये ग्राहक किंमतींची आकडेवारी 40 वर्षांच्या उच्चांकावर जाईल, असे अर्थतज्ज्ञांनी सांगितले. मासिक कोर निर्देशांक मात्र मे महिन्यातील 6.0 टक्क्यांवरून 5.8 टक्क्यांपर्यंत घसरताना दिसतो आहे.

SPDR गोल्ड ट्रस्ट या जगातील सर्वात मोठा सोन्याचा-समर्थित एक्सचेंज-ट्रेडेड फंडने सांगितले की त्याची होल्डिंग्स गुरुवारी 1024.43 टनांवरून शुक्रवारी 0.11 टक्क्यांनी घसरून 1023.27 टन झाली. रुपयातील कमजोरी आणि सरकारने अलीकडेच केलेल्या आयात शुल्कात सोन्याच्या समर्थनीय किंमतीमुळे देशांतर्गत बाजारात वाढ झाली.

अधिक वाचा : Online Payment Cost : Paytm, PhonePe च्या सुविधा शुल्कामुळे बिल भरणे झाले महाग, अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी वापरा हे पर्याय

महागाईचा अर्थव्यवस्थेवर दबाव

महागाईच्या आघाडीवर दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळे फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांकडून अमेरिकेच्या केंद्रीय बँकेच्या जूनच्या 14-15 जूनच्या बैठकीनंतरच्या धोरणाचीच री ओढताना व्याजदर वाढीचेच संकेत देण्यात आले. अमेरिकन डॉलरच्या निर्देशांकात 0.65 टक्के वाढ झाल्यामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या भाव काल वाढ झाली. अमेरिकन बेंचमार्क ट्रेझरी परताव्यातदेखील 3 टक्के वाढ झाली आणि सोने-चांदीच्या भावांवर दबाव आला. अमेरिकेतील अर्थव्यवस्थेसंदर्भातील व्यापक आघाडीवरून रोजगारासंदर्भातील आकडेवारी आधी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा चांगली दिसून आली. 

मागील आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सोन्या-चांदीच्या भावात (Gold-Silver Price) घसरण नोंदवण्यात आली. शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात कमजोरी नोंदवण्यात आली. आठवडाभरापूर्वी सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात 5 टक्के वाढ केली होती. यानंतर सलग तीन दिवस सोन्याच्या दरात वाढ झाली होती. 

शुद्धता कशी ओळखावी

सोने खरेदी करण्यापूर्वी शुद्धता जाणून घेणे आवश्यक आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी