Gold and Silver Rate Today, 11 June 2022: नवी दिल्ली : आठवडाभर घसरण नोंदवल्यावर किंवा स्थिर राहत, एका ठराविक पातळीवर राहणाऱ्या सोन्याच्या भावाने (Gold Price) अखेरीस आठवड्याच्या शेवटी मजबूत वाढ नोंदवली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर ऑगस्टसाठी सोन्याचा भविष्यातील कॉन्ट्रॅक्ट 51,694 रुपये प्रति 10 ग्रॅम वर संपला. एका सत्रात 689 रुपयांचा फायदा झाला. संपूर्ण आठवडा अस्थिरतेत गेल्यानंतर स्पॉट सोन्याच्या किंमतीने शेवटी क्लोजिंग आधारावर 1865 डॉलर प्रति औंस पातळीवर ब्रेकआउट दिला. आगामी काळात सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत. महागाईविषयक धोरण, महागाईची आकडेवारी आणि प्रमुख अर्थव्यवस्थांच्या जीडीपीची आकडेवारी इत्यादी घटकांचा प्रभाव सोन्याच्या भावावर पडतो आहे. (Gold price surged after remaining flat for a week, check latest rate)
कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या भावात वाढ झाली कारण अमेरिकेतील महागाईविषयक ताज्या आकडेवारीने 41 वर्षांचा उच्चांक दाखवला. तज्ज्ञांच्या मते स्पॉट सोन्याच्या किंमतीने 1865 डॉलर प्रति औंस स्तरावर ताजे ब्रेकआउट दिले आहे. सोने आता 1900 डॉलरच्या पातळीवर जाण्याची तयारी आहे. जाणकारांनी MCX सोन्याच्या भावासाठी सकारात्मक कलाची अंदाज व्यक्त केला आहे आणि नजीकच्या काळात सोने 52,200 रुपये ते 52,600 रुपयांच्या पातळीवर जाण्याचा अंदाज वर्तवला. तज्ञ पुढे म्हणाले की सोन्याच्या भावाला 50,500 रुपयांच्या पातळीवर मजबूत सपोर्ट आहे. तर सोन्याला मुख्य सपोर्ट 48,800 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे.
अधिक वाचा : IPL Media Rights : अॅमेझॉनची आयपीएल मीडिया हक्कांच्या शर्यतीतून माघार...अंबानींच्या रिलायन्सचा मार्ग सोपा
आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याच्या कारणाविषयी बोलताना, रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडच्या कमोडिटी अँड करन्सी रिसर्चच्या उपाध्यक्ष सुगंधा सचदेवा म्हणाल्या, "सोन्याचे भाव आठवडाभर स्थिर होते. ते एका मर्यादित रेंजमध्ये वरखाली होत होते. परंतु सोन्याच्या भावात वाढ होण्याच्या दिशेने वातावरण निर्माण झाले आहे. गुंतवणुकदार काही दिवस सोन्यापासून बाजूला राहिले कारण ते अनेक आर्थिक घडामोडींवर लक्ष ठेवून होते. यात महागाईविषयक धोरण, महागाईची आकडेवारी आणि प्रमुख अर्थव्यवस्थांच्या जीडीपीची आकडेवारी इत्यादी बाबींचा समावेश आहे. अलीकडील घसरणीनंतर डॉलर पुन्हा उंचावला याचाही परिणाम होत सोन्याचे भाव खाली राहिले. तर दुसरीकडे, ECB ने जवळपास दशकानंतर पुढील महिन्यात दर वाढीची मोहीम सुरू करण्यासाठी पायाभरणी केली आहे आणि महागाईला लगाम घालण्यासाठी पुढील महिन्यात मालमत्ता खरेदी देखील थांबवणार आहे. युरो झोनमध्ये वार्षिक महागाई 8.1% झाली आहे. ही एक विक्रमी पातळी आहे. शिवाय, अमेरिकेतील महागाईच्या ताज्या आकडेवारीने 41 वर्षांचा उच्चांक दर्शविला आहे. कारण मे महिन्यात महागाईत वार्षिक 8.6% वाढ झाली आहे ज्यामुळे महागाई वाढण्याची भीती पुन्हा वाढली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे आक्रमक धोरण कडक होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, भारतात रिझर्व्ह बॅंकेने देखील रेपो दरात 50bps ने वाढ केली आहे. तर बँक ऑफ ऑस्ट्रेलियाने या आठवड्यात रोख दरात 50 bps वाढीची घोषणा केली.
अधिक वाचा : आता क्रेडिट कार्डनेही होणार UPI पेमेंट, जाणून घ्या Google Pay वर ही सुविधा कशी मिळवायची?
आंतरराष्ट्रीय बाजारात, सोमवारी सोन्याच्या किंमती एका आठवड्यापेक्षा जास्त काळ सोन्याचा भाव दबावाखाली होता. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे महागाईविषयक धोरण, अमेरिकेतील महागाईची ताजी आकडेवारी आणि प्रमुख अर्थव्यवस्थांच्या जीडीपीची आकडेवारी तसेच मोठ्या देशांमधील मध्यवर्ती बॅंकांचे पतधोरण यासारख्या महत्त्वाच्या आर्थिक घटकांचा दबाव सोन्याच्या भावावर होता.