Gold and Silver Rate Today, 12 July 2022 : नवी दिल्ली : सोन्याच्या दरातील चढ-उताराचे चक्र सुरूच आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन व्यवहार दिवस सोन्याच्या भावात घसरण नोंदवल्यानंतर सोमवारी पिवळ्या धातूमध्ये किंचित वाढ झाली. मात्र मंगळवारच्या व्यवहारात पुन्हा एकदा सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव किरकोळ वाढून 50877 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 56046 रुपये प्रति किलो झाला. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर सोन्याचे भाव वधारल्याचे दिसून आले. (Gold price under pressure, silver drops marginally, check latest rates)
मंगळवारी सकाळी इंडिया बुलियन असोसिएशनने (https://ibjarates.com) जारी केलेल्या दरानुसार, सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 107 रुपयांनी घसरून 50,770 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचप्रमाणे चांदीचा भाव 699 रुपयांनी घसरून 56046 रुपये किलो झाला. वेबसाइटनुसार, 23 कॅरेट सोन्याचा दर 50567 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा दर 46322 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 20 कॅरेट सोन्याचा दर 37928 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
अधिक वाचा : 7th Pay Commission: कर्मचाऱ्यांना डीए वाढ मिळण्यापूर्वीच मिळाली एक मोठी खूशखबर! केंद्र सरकारची मोठी घोषणा...
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर मंगळवारी दुपारी सोने आणि चांदीच्या किमतीत संमिश्र कल दिसून आला. दुपारी 1 च्या सुमारास सोने 50,700 रुपयांवर किरकोळ वाढले होते. त्याचवेळी चांदीचा भाव 56,528 रुपये प्रतिकिलो झाला. आम्ही तुम्हाला सांगतो की IBJA देशभरात सार्वत्रिक आहे. या वेबसाइटवर दिलेल्या दराव्यतिरिक्त 3 टक्के जीएसटी शुल्क भरावे लागेल.
सोने खरेदी करण्यापूर्वी शुद्धता जाणून घेणे आवश्यक आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.
डॉलर 20 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर स्थिरावला. अमेरिकेतील 10-वर्षांसाठीचा ट्रेझरी परतावा शुक्रवारी एक आठवड्याच्या उच्चांकीवर पोचला आहे. युरोपियन युनियनमधील महागाई, मंदीची भीती आणि ऊर्जा संकट यामुळे युरो गेल्या दोन दशकांतील नीचांकी पातळीवर आला आहे. गुंतवणुकदार या आठवड्यात जाहीर होणाऱ्या जूनसाठीच्या युनायटेड स्टेट्सच्या ग्राहक किंमत निर्देशांकाचीच री ओढतील अशी चिन्हे आहेत. वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणानुसार, जूनमध्ये ग्राहक किंमतींची आकडेवारी 40 वर्षांच्या उच्चांकावर जाईल, असे अर्थतज्ज्ञांनी सांगितले. मासिक कोर निर्देशांक मात्र मे महिन्यातील 6.0 टक्क्यांवरून 5.8 टक्क्यांपर्यंत घसरताना दिसतो आहे.
महागाईच्या आघाडीवर दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळे फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांकडून अमेरिकेच्या केंद्रीय बँकेच्या जूनच्या 14-15 जूनच्या बैठकीनंतरच्या धोरणाचीच री ओढताना व्याजदर वाढीचेच संकेत देण्यात आले. अमेरिकन डॉलरच्या निर्देशांकात 0.65 टक्के वाढ झाल्यामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या भाव काल वाढ झाली. अमेरिकन बेंचमार्क ट्रेझरी परताव्यातदेखील 3 टक्के वाढ झाली आणि सोने-चांदीच्या भावांवर दबाव आला.