Gold-Silver Rate Today, 12 May 2022: सोन्याच्या भावात किंचित वाढ, चांदी मात्री थोडी घसरली...पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 12 May 2022: भारतीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या भावावर दबाव दिसून येतो आहे. आज सोन्याच्या भावात (Gold Price) किंचित वाढ झाली असून चांदीच्या भावात (Silver Price) हलकी घसरण झाली आहे. जागतिक बाजारात, सोन्याचा भाव आज वाढला. यूएस डॉलरमधील पुलबॅकमुळे सोन्याच्या भावात वाढ झाली. यूएस ग्राहक किंमत डेटाने सूचित केले की एप्रिलमध्ये महागाई शिखरावर आली असेल. यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (US Fed) अधिक आक्रमकपणे व्याजदरात वाढीची चिंता काही प्रमाणात घटली आहे.

Gold and Silver Rate Today: Gold rises marginally
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात किंचित वाढ 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावात झाली किंचित वाढ
  • चांदीच्या भावात मात्र थोडीशी घसरण
  • अमेरिकेतील आकडेवारी, महागाई, अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे धोरण यांचा सोन्यावर दबाव

Gold and Silver Rate Today, 12 May 2022: नवी दिल्ली : भारतीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या भावावर दबाव दिसून येतो आहे. आज सोन्याच्या भावात (Gold Price) किंचित वाढ झाली असून चांदीच्या भावात (Silver Price) हलकी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर (MCX)सोन्याचे वायदे 0.18% वाढून 50,911 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले तर चांदीचे वायदे 0.4% घसरून 60,520 रुपये प्रति किलो झाले. जागतिक बाजारात, सोन्याचा भाव आज वाढला. यूएस डॉलरमधील पुलबॅकमुळे सोन्याच्या भावात वाढ झाली. यूएस ग्राहक किंमत डेटाने सूचित केले की एप्रिलमध्ये महागाई शिखरावर आली असेल. यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (US Fed) अधिक आक्रमकपणे व्याजदरात वाढीची चिंता काही प्रमाणात घटली आहे. परिणामी अमेरिकन ट्रेझरीचा परतावा घटला आहे. (Gold prices show slight hike, Silver drops marginally, check latest rates)

अधिक वाचा : PAN-Aadhar Mandatory: सरकारने बँक-पोस्ट ऑफिसचे बदलले नियम, आता या रकमेच्या व्यवहारासाठी पॅन-आधार तपशील आवश्यक

ईटीएफ आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचा दबाव

कालच्या वाढीनंतर कमोडिटी एक्सचेंजवर (COMEX) सोन्याचे व्यवहार 1850 डॉलर प्रति औंसच्या जवळ होते. अमेरिकन डॉलर इंडेक्स आणि बाँड यिल्ड म्हणजेच अमेरिकन बॉंडचा परतावा यांनी अलीकडील काही नफा कमी केल्याने सोने 3 महिन्यांच्या नीचांकीवरून सावरले आहे. सोन्याला वाढीव मागणीचा फायदाही झाला. कारण महागाईच्या संदर्भात सुरक्षित गुंतवणूक प्रकार  म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. प्रमुख अर्थव्यवस्थांमधील चलनवाढीच्या आकडेवारीने महागाईचा दबाव ठळक केला. ईटीएफमधील गुंतवणूक बाहेर पडल्याने आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या अधिक आक्रमक पतधोरणामुळे मात्र सोन्याच्या भावावर नियंत्रण ठेवले आहे.  सोने 1850 डॉलर प्रति औंसच्या पातळीच्या जवळ स्थिरावले आहे. परंतु जोपर्यंत यूएस डॉलर निर्देशांक झपाट्याने सुधारत नाही तोपर्यंत मोठी वाढ प्रत्यक्षात येऊ शकत नाही," असे कोटक सिक्युरिटीजचे व्हीपी- हेड कमोडिटी रिसर्च रवींद्र राव म्हणाले.

अधिक वाचा : Passport Application | पासपोर्ट बनवणार असाल तर हे काम नक्की करा, नाहीतर अर्ज येईल परत...

अस्थिरतेत सोने हा चांगला गुंतवणूक पर्याय

कमकुवत डॉलर विदेशी खरेदीदारांसाठी ग्रीनबॅक-किंमतीचे सोने आकर्षक बनवते, तर कमी ट्रेझरी उत्पन्न शून्य-उत्पन्न सोने बाळगण्याचा खर्च कमी करते. स्पॉट गोल्ड मागील सत्रात 1% पर्यंत वाढल्यानंतर 0.2% वाढून 1,855.11 डॉलर प्रति औंस झाला. इतर मौल्यवान धातूंमध्ये स्पॉट सिल्व्हर 0.1% वाढून 21.57 डॉलर प्रति औंस, तर प्लॅटिनम 0.2 % घसरून 990.64 डॉलर वर आले.

अधिक वाचा : Indian Post Vacancy : महाराष्ट्रात पोस्टात आहे नोकरी, अर्ज करण्याची आहे ही अखेरची तारीख, वाचा सविस्तर

अमेरिकेतील वाढती महागाई

बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीत यूएस ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) गेल्या महिन्यात 0.3% वाढला. ऑगस्ट नंतरची ही सर्वात कमी वाढ आहे. मात्र वार्षिक आधारावर, ग्राहक किंमत निर्देशांक एप्रिलमध्ये वार्षिक आधारावर 8.3% वर चढला, मार्चमध्ये हा निर्देशांक 8.5% होता. परंतु अर्थशास्त्रज्ञांच्या 8.1% अंदाजापेक्षा तो जास्त आहे.

जो बायडेन मान्य केले महागाईचे आव्हान

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी एप्रिलच्या एकूणच चलनवाढीतील मंदीला "हृदयवर्धक" म्हटले आहे. परंतु चलनवाढ अजूनही एक मोठे आव्हान असल्याचे मान्य केले. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने गेल्या आठवड्यात आपला बेंचमार्क व्याजदर अर्ध्या टक्क्यांनी वाढवला. ही 22 वर्षांतील सर्वात मोठी वाढ आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी