Gold-Silver Rate Today, 13 June 2022: सोन्याच्या चकाकीला अमेरिकन वेसण, चांदीदेखील घसरली, पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 13 June 2022: गेल्या सत्रातील मासिक उच्चांक गाठल्यानंतर सोमवारी सोन्याच्या भावात (Gold Price) घसरण झाली आहे. चांदीचा भावदेखील (Silver Price) उतरला आहे. अमेरिकेतील महागाईची विक्रमी वाढ (US Inflation) आणि त्यासंदर्भातील आकडेवारीमुळे अमेरिकेतील बॉंडचा परतावा वाढवला आहे. त्यामुळेच सुरक्षित गुंतवणूक प्रकार समजल्या जाणाऱ्या सोन्याच्या मागणीवर परिणाम झाला आहे. गुंतवणूक म्हणून सोन्याबद्दल आकर्षण त्यामुळे कमी झाले आहे.

Gold and Silver Rate Today: Gold price under pressure
Gold and Silver Rate Today: सोन्याचा भाव दबावाखाली 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावात थोडीशी घसरण
  • चांदीचा भावदेखील उतरला
  • अमेरिकेतील महागाई, डॉलरची मजबूती आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे धोरण याचा परिणाम

Gold and Silver Rate Today, 13 June 2022: नवी दिल्ली : गेल्या सत्रातील मासिक उच्चांक गाठल्यानंतर सोमवारी सोन्याच्या भावात (Gold Price) घसरण झाली आहे. चांदीचा भावदेखील (Silver Price) उतरला आहे. अमेरिकेतील महागाईची विक्रमी वाढ (US Inflation) आणि त्यासंदर्भातील आकडेवारीमुळे अमेरिकेतील बॉंडचा परतावा वाढवला आहे. त्यामुळेच सुरक्षित गुंतवणूक प्रकार समजल्या जाणाऱ्या सोन्याच्या मागणीवर परिणाम झाला आहे. गुंतवणूक म्हणून सोन्याबद्दल आकर्षण त्यामुळे कमी झाले आहे. अमेरिकेतील 10 वर्षांच्या कालावधीच्या बॉंडचा परतावा वाढला आहे. त्यातच अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून आक्रमक धोरण स्वीकारले जाण्याच्या चिन्हांमुळे सराफा बाजारावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. (Gold prices under pressure of US factors, Silver also drops, check latest rates)

आर्थिक संकटाच्या काळात सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक प्रकार म्हणून पाहिले जाते. वाढलेल्या महागाईचा सामना करण्यासाठी फेडरल रिझर्व्ह आक्रमक धोरण स्वीकारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे.

अधिक वाचा : HDFC Bank alerts : तुमचे एचडीएफसी बँकेत खाते आहे का? तुम्हालाही असा ईमेल किंवा एसएमसएस आला आहे काय? व्हा सावध!

सोन्याचा ताजा भाव

एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स घसरले आहे. सोन्याचे फ्युचर्स 0.18 टक्क्यांनी किंवा 91 रुपयांनी घसरत 51,610 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले. तर चांदीचा भावदेखील 0.80 टक्क्यांनी घसरून 498 रुपये प्रति किलो 61,431 रुपये झाला. बुलियनला अनेकदा महागाईविरोधात हेजिंग म्हणून पाहिले जाते. परंतु जेव्हा अमेरिकन फेडरल रिझर्व्ह अल्पकालीन व्याजदर वाढवते तेव्हा होल्डिंगची संधी किंमत जास्त असते, कारण सोन्याला व्याज मिळत नाही.

भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, स्पॉट मार्केटमध्ये, सर्वोच्च शुद्धतेचे सोने प्रति 10 ग्रॅम 50,935 रुपयांच्या पातळीवर होते. तर चांदीचा भाव 60,881 रुपये प्रति किलो इतका होता. गेल्या एका आठवड्याच्या कालावधीत सोन्याच्या स्पॉट किंमती प्रति 10 ग्रॅम 500 रुपयांहून अधिक घसरल्या आहेत. तर याच काळात चांदीच्या दरात सुमारे 1,900 रुपयांची घसरण झाली आहे.

अधिक वाचा : Traffic Rule : ट्रॅफिक कॉन्स्टेबलने तुमच्या गाडीची चावी काढली, तर जागेवरच करा हे काम ; पाहा काय आहे नियम?

जाणकारांचे मत

कोटक सिक्युरिटीजचे कमोडिटी रिसर्चचे प्रमुख रवींद्र राव यांनी सांगितले की, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आक्रमकपणे कृती करेल या अपेक्षेमुळे अमेरिकन डॉलरमधील मजबूती आली आहे आणि बॉंडच्या परताव्यातदेखील वाढ झाली आहे. परिणामी या घटकांचा दबाव सोन्याच्या भावावर आला आहे. "महागाईची चिंता, वाढीची चिंता आणि भू-राजकीय तणाव यांनी मात्र सोन्याच्या किंमती स्थिर ठेवल्या आहेत," असे ते पुढे म्हणाले. "ईटीएफमधील गुंतवणुकीनेदेखील सोन्यामध्ये काही प्रमाणात खरेदीचा ट्रेंड दाखवला आहे. त्यामुळे सोन्याचा भाव तेजीत राहू शकतो."

अधिक वाचा : Bank Privatization: या सरकारी बँकेचे जुलैमध्ये होणार खासगीकरण! तयारी सुरू झाली...तुमचे खातेही आहे का या बॅंकेत?

जागतिक बाजारपेठ

स्पॉट गोल्ड 0.5 टक्क्यांनी घसरून 1,862.29 डॉलर प्रति औंस होता. यूएस गोल्ड फ्युचर्स देखील 0.5 टक्क्यांनी घसरून 1,866.80 डॉलरवर आले. स्पॉट सिल्व्हर 1.1 टक्क्यांनी घसरून 21.63 डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम 1.5 टक्क्यांनी घसरून 958.51 डॉलर आणि पॅलेडियम 2.1 टक्क्यांनी घसरून 1,894.72 डॉलरवर आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी