Gold-Silver Rate Today, 13 May 2022: सोन्यात किंचित घसरण, आणखी घसरण्याची चिन्हे, खरेदीची संधी, पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 13 May 2022: सोन्याच्या भावात (Gold Price) किरकोळ घसरण झाली आहे. मजबूत डॉलरच्या दबावाखाली असलेल्या सोन्याच्या स्पॉट किमतींमधील कमजोरीचा मागोवा घेत शुक्रवारी एमसीएक्सवर (MCX) जून फ्युचर्स किरकोळ घसरले. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की महागाईच्या दबावावर नियंत्रण ठेवण्यासाठी यूएस फेडरल रिझर्व्हच्या (US fed) आक्रमक कृतींच्या चिंतेमुळे डॉलर गुरुवारी 20 वर्षांच्या नवीन उच्चांकाच्या जवळ स्थिर झाला. या आठवड्यात सराफा 3 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

Gold and Silver Rate Today: gold to slide further
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात होणार आणखी घसरण 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावात किंचित घसरण
  • चांदीच्या किंमतीत मात्र थोडीशी वाढ
  • अमेरिकेतील वाढती महागाई, मजबूत झालेला डॉलर, कच्च्या तेलाच्या किंमती याचा सोन्याच्या भावावर नकारात्मक परिणाम

Gold and Silver Rate Today, 13 May 2022: नवी दिल्ली : सोन्याच्या भावात (Gold Price) किरकोळ घसरण झाली आहे. मजबूत डॉलरच्या दबावाखाली असलेल्या सोन्याच्या स्पॉट किमतींमधील कमजोरीचा मागोवा घेत शुक्रवारी एमसीएक्सवर (MCX) जून फ्युचर्स किरकोळ घसरले. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की महागाईच्या दबावावर नियंत्रण ठेवण्यासाठी यूएस फेडरल रिझर्व्हच्या (US fed) आक्रमक कृतींच्या चिंतेमुळे डॉलर गुरुवारी 20 वर्षांच्या नवीन उच्चांकाच्या जवळ स्थिर झाला. या आठवड्यात सराफा 3 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. ही घसरण मागील दोन महिन्यांतील सर्वात जास्त आहे. अमेरिकेतील अल्प-मुदतीच्या व्याज दरातील वाढ आणि बॉंडचा परतावा याचा सोन्याच्या भावावर थेट परिणाम होतो आहे. आज सकाळी MCX वर जून सोन्याचा वायदा 0.08 टक्क्यांनी घसरून 50,135 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत होता. मात्र, चांदीचा भाव (silver price) 0.19 टक्क्यांनी वाढून 58,865 रुपये प्रतिकिलो झाला. (Gold price to slide further amid strong US dollar, Check latest rates)

अधिक वाचा : PIB Fact Check : या सरकारी योजनेत मिळतायेत 30 लाख रुपये, फक्त 10,100 जमा करा... जाणून घ्या संपूर्ण गोष्ट

सोने तीन महिन्यांच्या नीचांकीवर

आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. कारण दोन दशकांतील सर्वात मजबूत स्थितीतील डॉलरमुळे सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. याचा परिणाम होत सोन्यामध्ये सलग चौथी साप्ताहिक घसरण होऊ शकते. स्पॉट गोल्ड 0.1% घसरून 1,820.54 डॉलर प्रति औंस, सत्रापूर्वी 7 फेब्रुवारीपासून सर्वात कमी घसरले होते. अमेरिकन सोने फ्युचर्स 0.2% घसरून 1,821.20 डॉलरवर आले.

अधिक वाचा : Elon Musk’s Chinese lookalike : इलॉन मस्कचा चीनी डुप्लिकेट इंटरनेटवर झाला व्हायरल, मस्क म्हणतात भेटण्याची आहे इच्छा, जर…पाहा फोटो

अमेरिकेतील महागाई, कच्चे तेल यांचा प्रभाव

सकाळी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 0.11 टक्क्यांनी घसरून 50,117 रुपये 10 ग्रॅम झाला, तर चांदीचा भाव 0.13 टक्क्यांनी घसरून 58,830 रुपये प्रति किलोग्राम झाला. वेगवान दर वाढीच्या भीतीने मागील सत्रात सोन्याच्या विक्रीवर दबाव आणला. कारण अमेरिकेतील चलनवाढीचे आकडे ४० वर्षांच्या उच्चांकावर आहेत. काल, सोन्याच्या किंमतीच्या तुलनेत सामान्यपणे बदलणारा अमेरिकन डॉलर 0.90 टक्क्यांनी वाढला. मागणीच्या चिंतेमुळे, कच्चे तेल आणि औद्योगिक धातूंच्या विक्रीच्या दबावामुळे गुंतवणुकदार अमेरिकन डॉलर निर्देशांकाकडे आकर्षित झाले आहेत. तांत्रिकदृष्ट्या, आजच्या सत्रात सोन्याच्या किंमती कमी राहण्याची शक्यता आहे आणि यात विक्रीची संधी असू शकते. सोन्याला 50700 रुपयांवर प्रतिकार आणि 50000 रुपयांवर आधार आहे. सोन्याच्या भावात 49500 रुपयांच्या पातळीपर्यंत घसरण शक्य आहे. चांदीला  58000 रुपयांच्या भावावर आधार आाहे आणि तर 60500 रुपयांच्या पातळीवर प्रतिरोध आहे, असे स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे वरिष्ठ कमोडिटी संशोधन विश्लेषक निरपेंद्र यादव यांनी सांगितले.

अधिक वाचा : Adani-Ambani Wealth | अदानी-अंबानींना लागला मंगळ...संपत्तीl मोठी घट आणि श्रीमंतांच्या यादीतदेखील झाली घसरण

लग्नसराईत सोन्याच्या घसरणीमुळे दिलासा

भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. सर्वसामान्य नागरिक अशावेळी दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. सोन्याच्या भावात झालेल्या घसरणीचा फायदा त्यामुळे सर्वसामान्यांना होऊ शकतो. ऐन लग्नसराईत त्यांना दिलासा मिळाला आहे. तुम्हीदेखील जर सोन्याचे दागिने विकत घेणार असाल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी