Gold-Silver Rate Today, 14 June 2022: सोन्याच्या भावात मोठी घसरण, मजबूत डॉलर आणि मंदीच्या भीतीने सराफा बाजारावर दबाव

Gold and Silver Rate Today, 14 June 2022 : आज सोन्याच्या भावात (Gold Price) मोठी घसरण झाली आहे. सोने आपल्या चार आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहे. चांदीच्या भावातदेखील Silver Price) मोठी घसरण झाली आहे. डॉलरचे मूल्य वाढल्यामुळे तसेच अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून (US Fed)अधिक आक्रमक धोरण स्वीकारले जाण्याच्या भीतीमुळे सोन्याच्या भावावर दबाव निर्माण झाला आहे.

Gold and Silver Rate Today: Gold see big fall
Gold and Silver Rate Today: सोने चार आठवड्यांच्या नीचांकीवर 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावात चांगलीच घसरण
  • सोन्याचा भाव चार आठवड्यांच्या नीचांकीवर
  • डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीच्या शक्यतेचा परिणाम

Gold and Silver Rate Today, 14 June 2022: नवी दिल्ली : आज सोन्याच्या भावात (Gold Price) मोठी घसरण झाली आहे. सोने आपल्या चार आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहे. चांदीच्या भावातदेखील Silver Price) मोठी घसरण झाली आहे. डॉलरचे मूल्य वाढल्यामुळे तसेच अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून (US Fed)अधिक आक्रमक धोरण स्वीकारले जाण्याच्या भीतीमुळे सोन्याच्या भावावर दबाव निर्माण झाला आहे. महागाईला आटोक्यात आणण्यासाठी अमेरिक फेडरल रिझर्व्ह आगामी काळात अधिक आक्रमक धोरण स्वीकारेल अशी चिन्हे आहेत. त्याचाही परिणाम सराफा बाजारावर झाला आहे. यामुळे आर्थिक मंदीचा सामना करावा लागण्याच्यी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. याचा विपरित परिणाम सोन्याच्या भावावर झाला आहे. (Gold prices record big fall, silver also drops amid rate hike expectations by US fed)

अधिक वाचा : EPFO Alert : तुमच्या पीएफ खात्यात लवकरच येणार पैसे...मात्र ई-नॉमिनेशनशिवाय मिळणार नाहीत अनेक फायदे! जाणून घ्या नवीन नियम

सोन्याचा ताजा भाव

सकाळी 9.45 वाजता, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्सवर (MCX) सोन्याचा भाव 0.27 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम साठी 50,527 रुपयांवर , तर चांदीचा भाव 0.35 टक्क्यांनी घसरून 60,100 रुपये प्रति किलोग्राम झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव

स्पॉट गोल्ड 0.3% वाढून 1,823.69 डॉलर प्रति औंस वर होते. तेच सत्राच्या आधी 19 मे नंतरच्या सर्वात नीचांकी पातळीवर घसरत ते 1,810.90 डॉलर वर होते. अमेरिकन सोने फ्युचर्स 0.4% घसरून 1,825.20 डॉलरवर आले.

अधिक वाचा : IPL Media Rights: क्रिकेट आणि पैशांची खाण...बीसीसीआयच्या तिजोरीत 46,000 कोटींची भर...आयपीएल लिलाव सुरूच

जागतिक बाजारपेठेतील तीव्र घसरणीचा मागोवा घेत सोन्या-चांदीच्या किमतींनी भारतीय बाजारपेठेतील नुकत्याच झालेल्या घसरणीला पुढे सुरू ठेवले.  MCX वर, सोने आणि चांदी दोघांच्या भावात घसरण झाली आहे. जागतिक बाजारात सोने प्रति औंस 1,825.97 डॉलर या चार आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होते. मजबूत अमेरिकन डॉलर आणि इतर मालमत्तेतील तोटा भरून काढण्यासाठी सोन्याच्या विक्रीमुळे सोन्यावर दबाव आला आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

डॉलर निर्देशांक सोमवारी दोन दशकांच्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर स्थिर होता आणि बहुतेक गुंतवणुकदार त्यामुळे सोन्यापासून दूर गेले. अल्प-मुदतीचे वाढलेले अमेरिकेतील व्याज दर आणि बॉंडचा परतावा बुलियन होल्डिंगची संधी खर्च वाढवते, ज्यामध्ये कोणतेही व्याज मिळत नाही.

अधिक वाचा : NPS: एनपीएसच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार ही जबरदस्त सुविधा, विस्ताराने जाणून घ्या

जाणकारांचे मत

या आठवड्याच्या शेवटी अमेरिकन फेडरल रिझर्व्हचा निर्णय येण्यापूर्वी बाजारातील अनिश्चितता उच्च राहू शकते. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह मोठ्या प्रमाणावर व्याजदर वाढवेल म्हणजेच 0.5% नी वाढवेल अशी अपेक्षा आहे. वाढलेल्या महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढला अधिक वेगवान करण्याची योजना आखल्यास बाजारातील गुंतवणुकदारांना अधिक स्पष्टता हवी असेल. आर्थिक घडामोडींवर अंदाज घेण्यासाठी गुंतवणुकदार विविध कल तपासून मग पावले उचलू शकतात.

चीनमधील घटकांचाही दबाव सोन्याच्या बाजारावर आहे. कोरोना व्हायरस नियंत्रणात ठेवण्यासाठी चीनचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जोपर्यत ती स्थिती साफ होत नाही तोपर्यत चीनच्या अर्थव्यवस्थेबाबत अस्थिरता राहणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी