Gold-Silver Rate Today, 16 June 2022: सोन्याच्या भावात वाढ, मात्र अजूनही उच्चांकीपेक्षा स्वस्त...गुंतवणुकीची चांगली संधी!

Gold and Silver Rate Today, 16 June 2022 : सोन्याच्या भावात (Gold Price) आज थोडीशी वाढ झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या मूल्यात किंचित घट झाली आहे. त्याचा फायदा होत गुरुवारी सोन्याच्या भावात वाढ झाली. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ (interest rate hike by US Fed) केल्याने डॉलरचे मूल्य घसरले. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 75-बेसिस-पॉइंटच्या वाढीस मंजूरी दिली.

Gold and Silver Rate Today: Gold price rises
Gold and Silver Rate Today: सोन्याचा भावात किंचित वाढ 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावात आज वाढ
  • अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्याचा परिणाम
  • मात्र अद्यापही सोने उच्चांकीपेक्षा बरेच खाली, गुंतवणुकीची संधी

Gold and Silver Rate Today, 16 June 2022: नवी दिल्ली: सोन्याच्या भावात (Gold Price) आज थोडीशी वाढ  झाली आहे.  अमेरिकन डॉलरच्या मूल्यात किंचित घट झाली आहे. त्याचा फायदा होत गुरुवारी सोन्याच्या भावात वाढ झाली. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ (interest rate hike by US Fed) केल्याने डॉलरचे मूल्य घसरले. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 75-बेसिस-पॉइंटच्या वाढीस मंजूरी दिली. ही वाढ विक्रमी आहे. वाढ चाललेल्या महागाईला आळा घालण्यासाठी आणि मंदीच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्हने आक्रमक धोरण स्वीकारले आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या भावातदेखील (Silver Price) आज वाढ झाली आहे. (Gold price rises marginally, silver also gains amid of interest rate hike by US fed)

अधिक वाचा : Federal Reserve : अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ, 28 वर्षांतील सर्वात मोठी वाढ

सोन्याचा ताजा भाव

एमसीएक्सवर (MCX)सोन्याचे फ्युचर्स सुमारे 0.40 टक्क्यांनी वाढले होते. सोन्याचे फ्युचर्स 202 रुपयांनी वाढून 50,640 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत होते. तर चांदीचा वायदा 0.70 टक्‍क्‍यांनी किंवा 424 रुपयांनी वाढून 61,121 रुपये प्रति किलोवर पोचला होता. बुलियनला म्हणजे सोने-चांदीला अनेकदा महागाईच्या संदर्भात संतुलन साधण्याचे साधन म्हणून पाहिले जाते, परंतु जेव्हा अमेरिकन फेडरल रिझर्व्ह अल्पकालीन व्याजदर वाढवते तेव्हा ते ठेवण्याची संधी खर्च जास्त असते. कारण सोन्याला व्याज मिळत नाही.

अधिक वाचा : SBI Scheme : एसबीआयच्या या खास योजनेत एकदा पैसे जमा करा, दरमहा व्याजासह, होईल जबरदस्त कमाई

सोन्यात गुंतवणुकीची संधी

जून महिन्याच्या सुरूवातीपासूनच सोन्याच्या भावात चढउतार सुरू आहेत. मे महिन्याच्या शेवटी 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,125 रुपयांवर बंद झाला होता. तर जूनच्या सुरूवातीलाचा सोन्याचा भाव 50,506 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये झाला होता. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू इच्छित असाल तर सध्या चांगली संधी आहे. मागील महिनाभरापासून शेअर बाजारात चढउतार होत आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगलीच घसरण झाली आहे.

भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, स्पॉट मार्केटमध्ये बुधवारी सर्वाधिक शुद्धतेचे सोने 50,954 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीची किंमत 60,750 रुपये प्रति किलो इतकी होती. सोन्याच्या स्पॉट किमती तीन सत्रांनंतर 51,000 रुपयांपर्यंत पोचल्या आहेत. तर चांदीचा भाव मागील सत्राच्या तुलनेत 1,000 रुपये प्रति किलोच्या जवळपास वाढला आहे.

अधिक वाचा :  NPS: एनपीएसच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार ही जबरदस्त सुविधा, विस्ताराने जाणून घ्या

जागतिक बाजारपेठ

स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्यांनी घसरून 1,831.63 डॉलर प्रति औंस झाले. तर यूएस गोल्ड फ्युचर्स 0.8 टक्क्यांनी वाढून 1,833.40 डॉलरवर आले. स्पॉट सिल्व्हर 0.1 टक्क्यांनी वाढून 21.67 डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम 0.2 टक्क्यांनी वाढून 940.98 डॉलर आणि पॅलेडियम 0.5 टक्क्यांनी वाढून 1,870.79 डॉलरवर पोचले.

शेअर बाजारातील घसरण सुरू आहे. त्यातच अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली आहे. परिणामी गुंतवणुकदार शेअर बाजाराकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. याचा फायदा होत सोने आणि चांदीच्या भावात वाढ होते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी