Gold and Silver Rate Today, 17 May 2022: नवी दिल्ली : मोठ्या घसरणीनंतर सोन्याच्या भावात (Gold Price)सुधारणा झाली आहे. मागील सत्रात मोठी उसळी घेतल्यानंतर आज भारतीय बाजारात सोने आणि चांदीचे भाव (Silver Price)संमिश्र होते. एमसीएक्सवर (MCX), सोन्याचे फ्युचर्स 0.17% वाढून 50,331 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले तर चांदी 0.16% घसरून 60831 रुपये प्रति किलो झाली. सरलेल्या सत्रात, सोने 0.8% वधारले तर चांदीने जवळपास 3% झेप घेतली. यामध्ये अमेरिकन डॉलरच्या स्थितीचा लाभ झाला. (Gold prices rises marginally but Silver drops, check latest rates)
जागतिक बाजारात, सोन्याचे दर प्रति औंस 1,825.29 डॉलरवर स्थिर होते कारण यूएस डॉलर इंडेक्समध्ये घसरण झाल्याने वाढत्या यूएस बाँड उत्पन्नाचा दबाव कमी झाला. स्पॉट सिल्व्हर 0.2% घसरून 21.56 डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम 945.76 डॉलरवर स्थिर होता. तर पॅलेडियम 1.2% घसरून 2,002.17 डॉलरवर आला.
सोमवारी जवळपास 20 वर्षांच्या उच्चांकावरून घसरल्यानंतर आज डॉलर निर्देशांक स्थिर होता. कमकुवत डॉलरमुळे इतर चलने असलेल्या खरेदीदारांसाठी सोने अधिक आकर्षक बनते. मात्र 10-वर्षाच्या बेंचमार्क अमेरिकन ट्रेझरी उत्पन्नात वाढ झाली, त्यामुळे व्याज नसलेल्या सोन्याची मागणी मर्यादित झाली.
आर्थिक संकटाच्या काळात सोन्याकडे सुरक्षित आश्रयस्थान आणि महागाईविरूद्ध बचावाचे साधन म्हणून पाहिले जाते. सोमवारी, सोन्याने तीन महिन्यांहून अधिक नीचांकी पातळी गाठली परंतु ट्रेझरी उत्पन्नातील घसरणीचा मागोवा घेत नंतर तो मार्ग उलटला. चीनमधील कामकाज पुन्हा सुरू झाल्याने सर्व हार्ड कमोडिटीची मागणी सुधारेल असा गुंतवणुकदारांना विश्वास वाटत असल्याने चांदी अलीकडच्या नीचांकीवरून वाढली.
आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीमुळे भारतीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या भावावर दबाव दिसून येतो आहे. ऐन लग्नसराईमध्ये सोन्याच्या भावात चढउतार होत आहेत.
अधिक वाचा : Multibagger Stock : हा 23 पैशांचा शेअर पोचला 9 रुपयांवर...एका वर्षात 1 लाखाचे झाले 40 लाख
स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्यांनी वाढून 1,812.15 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर होते. तर स्पॉट सिल्व्हर 0.1 टक्क्यांनी घसरून 21.06 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर आले आहे. तर प्लॅटिनम मात्र स्थिर असून 938.46 डॉलरच्या पातळीवर व्यवहार करते आहे. पॅलाडियम 0.3 टक्क्यांची वाढ नोंदवत ,
1,949.88 डॉलरच्या पातळीवर पोचले आहे.
लग्नसराईत भारतात सोन्याची मागणी वाढते. अशातच सोन्याच्या भावात मात्र चढउतार होत आहेत.