Gold-Silver Rate Today, 20 June 2022: सोन्याच्या भावात किंचित वाढ, चांदीची वधारली, पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 20 June 2022: सोन्याच्या भावात (Gold Price) सोमवारी थोडीशी वाढ झाली. पण डॉलरच्या वाढलेल्या किंमतीमुळे सोने-चांदीचे आकर्षण गुंतवणुकदारांमध्ये कमी झाले आहे. डॉलर निर्देशांक सुमारे दोन दशकांतील सर्वोच्च पातळीच्या जवळ गेला आहे. त्यामुळे सोने-चांदी परकी खरेदीदारांसाठी कमी आकर्षक बनले आहे.अमेरिकेतील आर्थिक घटकांचा सोने आणि चांदीच्या भावावर (Silver Price) मोठा परिणाम होतो आहे.

Gold and Silver Rate Today: Gold rises marginally
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात किंचित वाढ 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावावर अमेरिकन घटकांचा दबाव, मात्र तरीही किंचित वाढ
  • चांदीच्या भावातदेखील थोडीशी वाढ
  • अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणामुळे सोने अस्थिर

Gold and Silver Rate Today, 20 June 2022 : नवी दिल्ली : सोन्याच्या भावात (Gold Price) सोमवारी थोडीशी वाढ झाली. पण डॉलरच्या वाढलेल्या किंमतीमुळे सोने-चांदीचे आकर्षण गुंतवणुकदारांमध्ये कमी झाले आहे. डॉलर निर्देशांक सुमारे दोन दशकांतील सर्वोच्च पातळीच्या जवळ गेला आहे. त्यामुळे सोने-चांदी परकी खरेदीदारांसाठी कमी आकर्षक बनले आहे.अमेरिकेतील आर्थिक घटकांचा सोने आणि चांदीच्या भावावर (Silver Price) मोठा परिणाम होतो आहे. परिणामी मागील काही आठवड्यांपासून सोने अस्थिर झाले आहे. सोन्याच्या भावात चढउतार होत आहेत. (Gold prices rises marginally, silvers also gains, check latest rates)

अधिक वाचा : Free Ration Update: मोठा धक्का! रेशनकार्ड लाभार्थ्यांना मिळणार नाही मोफत गहू, सरकारचे आदेश

सोन्याचा ताजा भाव

एमसीएक्सवर ( MCX)सोन्याचे फ्युचर्स -3.28% वर व्यवहार करत होते. एमसीएक्सवर सोने 0.17 टक्क्यांनी किंवा 86 रुपयांनी वाढून 50,920 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोचले. तर चांदीचा वायदा 0.22 टक्‍क्‍यांनी किंवा 133 रुपयांनी वाढून 61,070 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोचला.

भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, स्पॉट मार्केटमध्ये, सर्वोच्च शुद्धतेचे सोने 51,169 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा भाव 61,576 रुपये प्रति किलो होता. सोन्याच्या स्पॉट किमतींनी चार सत्रांनंतर 51,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडला आहे. तर केवळ एका सत्रात चांदीचा भाव प्रति किलो 1,000 रुपयांपेक्षा जास्त वाढला आहे. मजबूत डॉलर आणि प्रमुख मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात वाढ केल्याने सोने मागील आठवड्यात घसरले. कारण सोने बाळगल्यास त्यावर कोणतेही व्याज मिळत नाही.

अधिक वाचा : PM Awas Yojana: पीएम आवास योजनेबाबत सरकारने केली मोठी घोषणा! सर्वांवर होईल परिणाम

जाणकारांचे मत

अॅक्सिस सिक्युरिटीजच्या कमोडिटीजचे प्रमुख प्रीतम पटनाईक म्हणाले की महागाई नियंत्रणाची एक समान थीम व्यावहारिकपणे जगभरातील सर्व मध्यवर्ती बॅंकांनी अवलंबली आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत उच्च व्याजदर व्यवस्था लागू झाली आहे.

"मजबूत डॉलर आणि अमेरिकन बॉन्ड्सच्या परताव्यातील वाढ यामुळे सोने-चांदीच्या भावावर सतत दबाव कायम ठेवला आहे," असे ते पुढे म्हणाले. "सोन्या-चांदीच्या भावात थोडीसी अस्थिरता येऊ शकते. 

अधिक वाचा : Sovereign Gold Bond : घसरलेले सोने मिळवा आणखी स्वस्तात, गुंतवणूक करून करा जोरदार कमाई, 20 जूनपासून संधी...जाणून घ्या

ShareIndiaचे  व्हाइस प्रेसिडेंट आणि रिसर्चचे प्रमुख, रवी सिंग, म्हणाले की, सोन्याच्या भावात कमजोर इक्विटी आणि भू-राजकीय तणावामुळे किंचित वाढ होते आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने वाढवलेल्या व्याजदरांमुळे सोन्याच्या भावात चढउतार होत आहेत. 

जागतिक बाजारपेठ

स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी घसरून 1,836.67 डॉलर प्रति औंस झाले. अमेरिकन सोने वायदे 1,840.00 डॉलरवर सपाट होते. स्पॉट सिल्व्हर 0.7 टक्क्यांनी घसरून 21.49 डॉलर प्रति औंस आणि प्लॅटिनम 0.8 टक्क्यांनी घसरून 934.34 डॉलरवर आला, तर पॅलेडियम 0.8 टक्क्यांनी वाढून 1,830.81 डॉलरवर आला.

जागतिक शेअर बाजारात सततच्या विक्रीच्या दबावामुळे गुंतवणुकदार सोन्याकडे वळले आहेत. सलग महिनाभराच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचा भाव अस्थिर झाला आहे. डॉलर दोन दशकांच्या उच्चांकावरून मागे पडला आहे आणि यूएस आर्थिक वाढीवरील वाढत्या चिंतेने गुंतवणूकदारांना सुरक्षित मालमत्तेकडे वळवले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी