Gold-Silver Rate Today, 21 June 2022: कभी खुशी कभी गम! अस्थिर जागतिक बाजारपेठ, डॉलरमधील चढउतारामुळे सोने अस्थिर....पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 21 June 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात (Gold Price) थोडीशी वाढ झाली. डॉलरचे मूल्य तुलनेने कमी झाले आहे. त्याचबरोबर जगभरातील महत्त्वाच्या मध्यवर्ती बॅंका व्याजदर वाढीबाबत काय करतात यावर गुंतवणुकदारांनी लक्ष केंद्रीत केले आहे. याचा परिणाम सोन्याच्या भावावर होतो आहे.

Gold and Silver Rate Today: Gold Price rises
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात किंचित वाढ 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या किंचित वाढ
  • डॉलर तुलनेने नरमला तर जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता याचा सोन्याच्या भावावर परिणाम
  • सोने एका ठराविक पातळीवर चढउतार नोंदवते आहे

Gold and Silver Rate Today, 21 June 2022 : नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात (Gold Price) थोडीशी वाढ झाली. डॉलरचे मूल्य तुलनेने कमी झाले आहे. त्याचबरोबर जगभरातील महत्त्वाच्या मध्यवर्ती बॅंका व्याजदर वाढीबाबत काय करतात यावर गुंतवणुकदारांनी लक्ष केंद्रीत केले आहे. याचा परिणाम सोन्याच्या भावावर होतो आहे. सोमवारी सोन्या-चांदीचे भाव स्थिर ते नकारात्मक झाले आणि सोन्याचा भाव पूर्वीच्या सपोर्ट झोनमध्ये संघर्ष करत होता कारण अमेरिकन बाजाराला सुट्टी होती. (Gold rises marginally amid soft dollar & volatile global markets)

अधिक वाचा : Bank FD : एचडीएफसी, आयसीआयसीआयसह देशातील आघाडीच्या बँकांमध्ये एफडीवर सर्वाधिक व्याज कुठे मिळतंय ते जाणून घ्या

सोन्याचा ताजा भाव

सकाळी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 0.2 टक्क्यांनी वाढून 50,836 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर होता. तर चांदीचा भावसुद्धा 0.46 टक्क्यांनी वाढून 61,021 रुपये प्रति किलोग्रामवर पोचला होता. सोमवारी मोठ्या प्रमाणावर रेंज-बाउंड ट्रेडिंगनंतर, स्पॉट गोल्ड 0.2% वाढून 1,841.13 डॉलर प्रति औंस झाला. यूएस गोल्ड फ्युचर्स 0.1% ने वाढून 1,842.90 डॉलरवर स्थिर झाले.

अधिक वाचा : Traffic Rule : आता सर्व कागदपत्रे असतानाही कापले जाणार 2000 चे चलान, कार, मोटारसायकल चालकांनी सावधान!

आंतरराष्ट्रीय बाजारपेठ

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 0.07 टक्क्यांनी घसरून 1,840.60 डॉलरवर स्थिरावले. तर चांदीदेखील 0.20 टक्क्यांनी घसरून 21.59 डॉलरवर स्थिरावली. देशांतर्गत बाजारातही सोन्याचा भाव 0.19 टक्क्यांच्या घसरणीसह 50,735 रुपयांवर आणि चांदीचा भाव 0.32 टक्क्यांच्या घसरणीसह 60744 रुपयांवर स्थिरावला, असे मेहता इक्विटीजचे व्हीपी कमोडिटीज राहुल कलंत्री यांनी सांगितले.

सोन्याला 1828-1816 डॉलरच्या पातळीवर आधार आहे. तर 1852-1861 डॉलरच्या पातळीवर अडथळा आहे. चांदीला 21.35-20.95 डॉलरवर आधार आहे. तर 21.85-21.95 डॉलरवर अडथळा आहे. रुपयाच्या बाबतीत सोन्याला 50,440-50,110 रुपयांच्या पातळीवर आधार आहे. तर 50,980-51,240 रुपयांच्या पातळीवर अडथळा आहे. चांदीला 60,120-59,550 रुपयांवर आधार आहे, तर 61,380-61,710 रुपयांवर अडथळा आहे, असेही ते म्हणाले.

अधिक वाचा : Free Ration Update: मोठा धक्का! रेशनकार्ड लाभार्थ्यांना मिळणार नाही मोफत गहू, सरकारचे आदेश

जागतिक बाजारातील स्थिती

जागतिक शेअर बाजारात होत असलेल्या घसरणीमुळे आणि शेअर्सच्या विक्रीच्या दबावामुळे गुंतवणुकदार सोन्याकडे वळले आहेत. जून महिन्यात सोन्या-चांदीच्या भावात मे महिन्याच्या तुलनेत घसरण झाली आहे. अमेरिकेतील आर्थिक स्तरावरील वाढत्या चिंतेने गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणूक प्रकाराकडे वळवले आहे. मात्र अमेरिकन फेडरल रिझर्व्हची आक्रमक दरवाढामुळे सोन्याच्या भावातील तेजीला अटकाव निर्माण होतो आहे. पीपल्स बँक ऑफ चायनाने पाच वर्षांच्या एलपीआरमध्ये केलेल्या कपातीमुळे औद्योगिक धातू आणि कच्च्या तेलाच्या किमतींना आधार मिळाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात काही घटक अनुकूल तर काही घटक प्रतिकूल असल्यामुळे सोने एका पातळीत बांधले गेले आहे. सोन्याला त्यामुळे अस्थिरतेला सामोरे जावे लागते आहे.

भारतात लग्नसराईच्या हंगामात सोन्याची मागणी वाढते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना सोन्याचे भाव एका विशिष्ट पातळीत वरखाली होत असल्याचा फायदा होतो आहे. आगामी काळात अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे धोरण आणि जगातील महागाईसंदर्भातील स्थिती यावर सोन्याची वाटचाल अवलंबून राहणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी