Gold and Silver Rate Today, 23 June 2022: नवी दिल्ली: सोन्याच्या भावात (Gold Price) आज घसरण झाली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे (US Fed) चेअरमन जेरोम पॉवेल यांनी अमेरिकन सिनेट बँकिंग समितीसमोर दिलेल्या साक्षीत केलेल्या टिप्पण्यांनंतर डॉलर स्थिर राहिल्याने आज सकाळी सोन्याचे भाव घसरले. सुरुवातीच्या व्यवहारात वायदे बाजारात चांदीचा भाव ( Silver Price)अर्धा टक्का घसरला. पॉवेल म्हणाले की, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह महागाई रोखण्यासाठी मंदी आणण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु असे केल्याने आर्थिक मंदीचा धोका असला तरीही किंमती नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह पूर्णपणे कटीबद्ध आहे. (Gold falls after Powell testimony, check latest rates)
अधिक वाचा : जुलै महिन्यात येणार गुड न्यूज ! सरकार महागाई भत्ता (DA) 3 नव्हे तर 5 टक्के वाढवणार
सहा प्रमुख चलनांच्या गटाशी सोन्याची तुलना करणारा डॉलर निर्देशांक 104.12 स्तरावर जवळजवळ स्थिर राहिला. सोन्याचा डॉलरशी व्यस्त संबंध आहे. ऑगस्ट डिलिव्हरीसाठी सोन्याचा वायदा 0.22 टक्क्यांनी घसरून 50,791 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. जुलै डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 0.67 टक्क्यांनी घसरून 60,243 रुपये प्रति किलोग्रॅम झाला.
अधिक वाचा : Free Ration Update: केंद्राचा मोठा धक्का! रेशनकार्ड लाभार्थ्यांना मिळणार नाही मोफत गहू
आपल्या साक्षीमध्ये, जेरॉम पॉवेल यांनी मान्य केले की मंदी ही "नक्कीच एक शक्यता" आहे आणि जगभरातील गेल्या काही महिन्यांतील घटनांमुळे महागाई कमी करणे अधिक कठीण झाले आहे. विश्लेषकांनी सांगितले की, सुरक्षित गुंतवणूक प्रकार म्हणून असेलली मागणी सोन्याच्या किंमतीतील घसरणीवर मर्यादा ठेवू शकते.
अधिक वाचा : How to Make Money Double: या योजनेत पैसे गुंतवा आणि मिळवा दुप्पट पैसे; पैसे बुडण्याचाही नाही धोका
“भू-राजकीय अनिश्चितता आणि आर्थिक मंदीची वाढती चिंता सोने-चांदीसारख्या धातूंना आधार देण्याची शक्यता आहे. सोन्याला 1,828-1,816 डॉलरवर समर्थन आहे, तर प्रतिकार 1,852-1,861 डॉलरवर आहे. चांदीला 21.10-20.85 डॉलरवर आधार आहे. तर 21.65-21.95 डॉलरवर अडथळा आहे," असे मत मेहता इक्विटीजचे कमोडिटीजचे राहुल कलंत्री यांनी व्यक्त केले.
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह जुलैमध्ये व्याजदरात आणखी 75-बेसिस-पॉइंटची वाढ करू शकते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये अर्धा-टक्के-पॉइंट वाढ होईल आणि लवकरात लवकर नोव्हेंबरपर्यंत यात घट होणार नाही.
एकीकडे सोन्याच्या भावावर दबाव निर्माण होत घसरण होत असतानाच जागतिक शेअर बाजारात सततच्या विक्रीच्या दबावामुळे गुंतवणुकदारांचा कल सोन्याकडे वळला आहे. सलग महिनाभराच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीत वाढ झाली आहे. डॉलर दोन दशकांच्या उच्चांकावरून मागे पडला आहे आणि यूएस आर्थिक वाढीवरील वाढत्या चिंतेने गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणूक प्रकाराकडे वळत आहे. तथापि, यूएस फेडरल रिझर्व्हची आक्रमक दरवाढ आणि ताळेबंदातील कपात हे अजूनही सोन्याच्या तेजीला मोठा अडथळा निर्माण करतील. त्यातच अमेरिकन फेडरल रिझर्व्ह वस्तूंच्या किंमतींना आळा घालण्यासाठी व्याजदर वाढीचे धोरण स्वीकारत आहे. त्याचा परिणाम होत डॉलर मजबूत होणार आहे. परिणामी सोन्याच्या भावावर दबाव येत सोन्याच्या किंमती ्स्थिर राहतील किंवा त्यात घसरण होण्याची शक्यता आहे.