Gold and Silver Rate Today, 24 June 2022 : नवी दिल्ली : सोन्याच्या भावावर (Gold Price)मोठा दबाव दिसून येतो आहे. त्यामुळे सोन्याचा कल घसरणीकडे दिसून येतो आहे. जुलै महिन्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून 75-बेसिस-पॉइंटने व्याजदरातील वाढीच्या अपेक्षेने डॉलरचे मूल्य स्थिर राहिल्याने शुक्रवारी सकाळी वायदे बाजारात सोन्याच्या भावात किरकोळ घसरण झाली. एमसीएक्सवर सोन्याचा भाव म्हणजे ऑगस्ट फ्युचर्स 44 रुपये किंवा 0.09 टक्क्यांनी घसरून 50,550 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले. तर चांदीचा भाव (Silver Price)1 रुपयांनी वाढून 59,505.00 रुपयांवर व्यवहार करत होता. (Gold prices under pressure, drops marginally, silver rises marginally)
अधिक वाचा : MPSC : मोठी नोकरभरती! एमपीएससीकडून 800 ‘दुय्यम निबंधक’पदांसाठीची जाहिरात, पाहा विस्ताराने
अमेरिकन काँग्रेसच्या समितीसमोर दुसऱ्या दिवशी साक्ष देताना, अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी गुरुवारी सांगितले की 40 वर्षांतील उच्चांकी महागाईला लगाम घालण्याची अमेरिकन फेडरल रिझर्व्ह कटीबद्ध आहे. सहा प्रमुख चलनांशी सोन्याची तुलना करणारा डॉलर निर्देशांक 104.29 स्तरावर स्थिर राहिला. मजबूत डॉलर इतर चलने धारण करणार्या खरेदीदारांसाठी सोने अधिक महाग बनवतो.
अधिक वाचा : IAF Agniveer Job 2022: अग्निवीरांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या कधीपर्यंत आणि कसा करायचा अर्ज
विश्लेषकांनी नमूद केले की सातत्याने वाढणाऱ्या महागाईने जगभरातील मध्यवर्ती बँकांना आक्रमकपणे व्याजदर वाढवण्यास भाग पाडले आहे. प्रणालीतील अतिरिक्त तरलता पूर्ववत करण्यासाठी सोपे चलनविषयक धोरण घ्यावे लागते आहे. FOMC द्वारे अमेरिकेतील व्याजदरात वाढ अपेक्षेपेक्षा खूपच जलद आणि जास्त झाली आहे. एमके ग्लोबलने गुरुवारी एका नोटमध्ये सांगितले. "सतत उच्च महागाईदराच्या आकड्यांच्या आधारे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह अधिक आक्रमक बनले आहे. यामुळे यूएस डॉलरला बळ मिळाले आहे आणि चलन उत्पन्नही पॉलिसी दरांमध्ये वाढ होत आहे," असे त्यात म्हटले आहे.
अधिक वाचा : बँकांच्या संपाबाबत मोठा निर्णय, युनियननी केली घोषणा
दुसऱ्या साप्ताहिक घसरणीसह परदेशातील बाजारात सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात स्थिर होत्या. सत्राच्या सुरुवातीला 1,820.99 डॉलर या एका आठवड्याच्या नीचांकी पातळीवर जाऊन स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्यांनी वाढून 1,824.72 डॉलर प्रति औंस झाले. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.2 टक्क्यांनी घसरून 1,825.90 डॉलरवर आले. SPDR गोल्ड ट्रस्ट, जगातील सर्वात मोठा सोन्याचा आधार असलेला एक्सचेंज-ट्रेडेड फंड, ने सांगितले की, त्याची होल्डिंग्स एका दिवसापूर्वीच्या 1,071.77 टनांवरून गुरुवारी 0.81 टक्क्यांनी घसरून 1,063.07 टनांवर आली.
स्पॉट सिल्व्हर 0.4 टक्क्यांनी वाढून 21.02 डॉलर प्रति औंस आणि प्लॅटिनम 0.9 टक्क्यांनी वाढून 915.11 डॉलरवर आले. परंतु चांदीच्या भावात दोन्ही साप्ताहिक भावातील तोट्याचा कल होता.
जून महिन्यात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे भाव, मजबूत डॉलर, अमेरिकन फेडरल रिझर्व्हने आक्रमक धोरण घेत व्याजदरात केलेली वाढ आणि आगामी काळातदेखील होणारी व्याजदरातील वाढ या सर्व घटकांचा परिणाम सोन्याच्या भावावर आणि वायदे बाजारावर होतो आहे.