Gold and Silver Rate Today, 24 May 2022: नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात घट झाली. कारण मागील सत्रातील घसरणीनंतर यूएस डॉलरने किंचित पुनरागमन केले. याचा परिणाम सराफा बाजारावर झाला आहे. स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी घसरून 1,850.40 डॉलर प्रति औंसवर होते. अमेरिकन सोन्याचे वायदे 1,848.20 डॉलरवर स्थिर होते. सकाळी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्सवर(MCX)सोन्याचा भाव (Gold Price)0.16 टक्क्यांनी वाढून 50,990 रुपये 10 ग्रॅम झाला, तर चांदीचा भाव (Silver Price) 0.05 टक्क्यांनी वाढून 61,333 रुपये प्रति किलोग्राम झाला. (Gold prices drops in international market amid of surge in US stock market, check latest rates)
यूएस इक्विटी मार्केट डाऊ जोन्स 2 टक्क्यांहून अधिक वाढल्याने सोने आणि चांदीच्या भावातील मागील सत्रातील सुरुवातीच्या दिवसांची वाढ थांबली. युरोझोन आणि यूएसकडून आज संध्याकाळी जाहीर होणारी आर्थिक आकडेवारी सोन्याच्या भावासाठी महत्त्वाची आहे. सहा प्रमुख चलनांची दिशा ठरवणारा डॉलर काल 1 टक्क्यांनी घसरला.
यूएस बेंचमार्क ट्रेझरी उत्पन्न 2 टक्क्यांहून अधिक वाढले आणि सोन्याच्या तेजीला मर्यादा घालते. आज सोन्याच्या भावात फारशी वाढ अपेक्षित नाही. सोन्याला 50,700 रुपयांचा सपोर्ट आणि 51,300 रुपयांचा प्रतिकार आहे. चांदीला 60500 रुपयांवर समर्थन आणि 62000 रुपयांवर प्रतिरोध आहे, असे स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे वरिष्ठ कमोडिटी संशोधन विश्लेषक निरपेंद्र यादव यांनी सांगितले.
जागतिक शेअर बाजारात सततच्या विक्रीच्या दबावामुळे गुंतवणुकदार सोन्याकडे वळले आहेत. सलग महिनाभराच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीत वाढ झाली आहे. डॉलर दोन दशकांच्या उच्चांकावरून मागे पडला आहे आणि यूएस आर्थिक वाढीवरील वाढत्या चिंतेने गुंतवणूकदारांना सुरक्षित मालमत्तेकडे वळवले आहे. तथापि, यूएस फेडरल रिझर्व्हची आक्रमक दरवाढ आणि ताळेबंदातील कपात हे अजूनही सोन्याच्या तेजीला मोठा प्रतिकार करतील. पीपल्स बँक ऑफ चायनाने पाच वर्षांच्या एलपीआरमध्ये केलेल्या कपातीमुळे औद्योगिक धातू आणि कच्च्या तेलाच्या किंमतींना आधार मिळाला आहे, ज्यामुळे गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या भावात तेजी आली होती. मात्र आता अमेरिकन शेअर बाजारात अचानक मोठी तेजी आल्याने गुंतवणुकदारांचा कल पुन्हा एकदा इक्विटी बाजाराकडे वळला आहे. याचा फटका सोने आणि चांदीच्या भावाला बसला आहे. सोन्यामध्ये पुन्हा तेजी येण्याची चिन्हे दिसत असताना आता या बदलांमुळे सोन्याची घोडदौड थांबली आहे. अमेरिकेतील आर्थिक स्थितीबद्दलची आकडेवारी समोर आल्यावर शेअर बाजार आणि सोने-चांदीच्या भावाची दिशा स्पष्ट होणार आहे.
भारतात लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांना सोन्याच्या भावातील घसरणीमुळे यंदा थोडासा दिलासा मिळाला आहे. या कालावधीत सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होत असते. त्यामुळे सोन्याचे भाव वाढत असतात. मात्र यंदा सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय घटकांचा मोठा दबाव आहे.