Gold-Silver Rate Today, 31 May 2022 : सोन्याच्या भावावर दबाव, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने घसरले, पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 31 May 2022: आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. कारण यूएस बाँडचे उत्पन्न मजबूत झाले आणि डॉलर मजबूत झाला. मार्च 2021 नंतर प्रथमच सोने दुसर्‍या सलग मासिक तोट्याकडे जात आहे. आज सकाळी, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर सोन्याच्या भावात किरकोळ घसरण झाली.

Gold and Silver Rate Today: Gold price drops
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात थोडीशी घसरण 
थोडं पण कामाचं
  • आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव घसरले
  • एमसीएक्सवर सोने फ्युचर्स घसरले
  • डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या भावावर दबाव

Gold and Silver Rate Today, 31 May 2022: नवी दिल्ली : आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. कारण यूएस बाँडचे उत्पन्न मजबूत झाले आणि डॉलर मजबूत झाला. मार्च 2021 नंतर प्रथमच सोने दुसर्‍या सलग मासिक तोट्याकडे जात आहे. आज सकाळी, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर सोन्याचा भाव 0.03 टक्क्यांनी किरकोळ घसरून 10 ग्रॅमसाठी 50,901 रुपयांवर आला तर चांदीचा भाव 0.64 टक्क्यांनी घसरून 61,489 रुपये प्रति किलोग्रॅम झाला. अमेरिकन घटकांचा मोठा दबाव सध्या सोन्याच्या भावावर दिसून येतो आहे. (Gold prices under pressure in international market amid strong US dollar)

अधिक वाचा : Money Making : तुमची नोकरी व्यवसाय सांभाळून घरून करा या 3 गोष्टी आणि करा दणदणीत कमाई...

अमेरिकन घटकांचा सोन्यावर दबाव

यूएस बाजारातील सुट्टीमुळे सोने काल सावरले होते. यूएस डॉलर इंडेक्स आणि बाँड यिल्डने सोन्या-चांदीच्या किमतींना आधार दिला. आजचा दिवस डेटाने भरलेला आहे ज्यामुळे मौल्यवान धातूंमध्ये अस्थिरता वाढेल. तथापि, यूएस डॉलर निर्देशांकात अल्पकालीन कमजोरीमुळे मौल्यवान धातूंच्या किमती खालच्या स्तरावर समर्थनीय राहू शकतात. गोल्ड ऑगस्ट कॉन्ट्रॅक्टला 50800 रुपयांवर समर्थन आणि 51300 रुपयांवर रेझिस्टन्स आहे. चांदीला 61000 रुपयांवर  रेझिस्टन्स आणि 62500 रुपयांच्या पातळीवर समर्थन आहे, असे स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे वरिष्ठ कमोडिटी रिसर्च अॅनालिस्ट निरपेंद्र यादव यांनी सांगितले.

अधिक वाचा : PM Kisan: आज शेतकऱ्यांना मिळणार भेट, 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 हजार कोटी रुपये होणार जमा...

मजबूत रोखे उत्पन्न आणि यूएस डॉलरमधील ताकद यामुळे सोन्याच्या किंमती मंगळवारी सौम्यपणे कमी झाल्या, ज्यामुळे सराफा बाजारातील मागणी कमी झाले. सोने सरळ दुसऱ्या मासिक तोट्याकडे जात आहे. 10-वर्षांच्या कालावधीसाठीच्या यूएस बॉंडच्या उत्पन्न झालेली वाढ सोन्याचे आकर्षण कमी करते, तर मजबूत डॉलर परकी खरेदीदारांसाठी सोने अधिक महाग बनवते.

सोन्याचा ताजा भाव

एमसीएक्सवर सोन्याचे फ्युचर्स 4.23 % 0.10 टक्क्यांनी किंवा 50 रुपयांनी कमी होऊन 51,044 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत होते. मात्र, चांदीचा भाव 0.64 टक्क्यांनी घसरून 395 रुपयांनी कमी होऊन 61,487 रुपये प्रति किलोवर पोचला.

उच्च अल्प-मुदतीचे यूएस व्याजदर सोने खरेदीची संधी वाढवतात. परंतु मंदीसारख्या आर्थिक संकटाच्या वेळी सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक प्रकार म्हणूनही पाहिले जाते.

अधिक वाचा : FD Rules : रिझर्व्ह बॅंकेने बदलले एफडीचे नियम! जाणून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान...

जागतिक शेअर बाजारात सततच्या विक्रीच्या दबावामुळे गुंतवणुकदार सोन्याकडे वळले आहेत. सलग महिनाभराच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीत वाढ झाली आहे. डॉलर दोन दशकांच्या उच्चांकावरून मागे पडला आहे आणि यूएस आर्थिक वाढीवरील वाढत्या चिंतेने गुंतवणूकदारांना सुरक्षित मालमत्तेकडे वळवले आहे. तथापि, यूएस फेडरल रिझर्व्हची आक्रमक दरवाढ आणि ताळेबंदातील कपात हे अजूनही सोन्याच्या तेजीला मोठा प्रतिकार करतील. पीपल्स बँक ऑफ चायनाने पाच वर्षांच्या एलपीआरमध्ये केलेल्या कपातीमुळे औद्योगिक धातू आणि कच्च्या तेलाच्या किमतींना आधार मिळाला आहे, याचाही परिणाम मागील आठवड्यात सोन्याच्या भावावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात, सोमवारी सोन्याच्या किंमती एका आठवड्यापेक्षा जास्त काळातील त्यांच्या उच्चांकावर पोचल्या होत्या. कमकुवत डॉलरमुळे सोन्याला मदत झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी