Gold-Silver Rate Today, 22 July 2022: सोन्याच्या भावात मोठी घसरण, सोन्याने गाठली नीचांकी, पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 22 July 2022: जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे आज सोन्याच्या भावात (Gold price) सातत्याने घसरण होत आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण होत असून, सध्या सोन्याचा भाव दीड वर्षाच्या नीचांकी पातळीवर आहे. चांदीच्या भावातदेखील (Silver Price)अस्थिरता आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही सोने-चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक संधी आहे.

Gold and Silver Rate Today: Gold continues to fall
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात घसरण सुरूच 
थोडं पण कामाचं
  • सोन्याचा भाव नीचांकीवर पोचला
  • चांदीच्या भावातदेखील घसरण
  • जागतिक बाजारपेठेत डॉलरच्या वाढत्या ताकदीचा परिणाम सोन्या-चांदीच्या भावावर दिसतो आहे

Gold and Silver Rate Today, 22 July 2022 : नवी दिल्ली : जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे आज सोन्याच्या भावात (Gold price) सातत्याने घसरण होत आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण होत असून, सध्या सोन्याचा भाव दीड वर्षाच्या नीचांकी पातळीवर आहे. चांदीच्या भावातदेखील (Silver Price)अस्थिरता आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही सोने-चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. वायदे बाजारातदेखील सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. चांदीचा भावदेखील उतरला आहे. (Gold continues to fall amid global trends)

अधिक वाचा : पीठ, डाळ, तांदुळासह १४ वस्तूंवर नाही GST

सोन्या-चांदीचा ताजा भाव 

मल्टीकमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्सवर (MCX) आज सकाळी सोन्याचा भाव 30 रुपयांनी घसरून 50,345 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर MCX वर चांदीचा भाव सकाळी 76 रुपयांनी घसरून 55,335 रुपये प्रति किलो झाला. याआधी सोन्याचा व्यवहार 50,385  रुपयांवर सुरू झाला होता, तर चांदीचा व्यवहार 55,435  रुपयांवर सुरू होता. इतकेच नाही तर सोन्याचा भाव सध्या मागील बंद किमतीपेक्षा 0.06 टक्क्यांनी घसरतो आहे. तर चांदीचा भाव सध्या मागील बंद किमतीपेक्षा 0.14 टक्क्यांनी घसरतो आहे.

अधिक वाचा : ITR Filing 2021-22: प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख, मुदतीनंतरचा दंड आणि प्रक्रिया जाणून घ्या

जागतिक बाजारपेठेची स्थिती काय आहे?

जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. आज, अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 1,713.47 डॉलर प्रति औंसवर आली, जी मागील बंद किंमतीपेक्षा 0.32 टक्क्यांनी कमी आहे. दुसरीकडे, चांदीची स्पॉट किंमत देखील 18.76 डॉलर प्रति औंस होती, जी मागील बंद किंमतीपेक्षा 0.30 टक्के कमी आहे. इतकेच नाही तर जागतिक बाजारात सोन्याची किंमत एक दिवस आधी ऑगस्ट 2021 नंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचली होती. म्हणजेच जागतिक बाजारातही सोन्याची सातत्याने घसरण होत आहे.

अधिक वाचा : House Construction Tips: स्वस्तात सुंदर घर बांधायचंय? मग विस्ताराने जाणून घ्या ही सोपी पद्धत आणि टिप्स...करा लाखोंची बचत

तज्ञ काय म्हणतात?

जागतिक स्तरावर सोन्याच्या भावावर मजबूत अमेरिकन डॉलरचा परिणाम होतो आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात 0.75% ते 1% वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर डॉलर आंतरराष्ट्रीय पातळीवर ऐतिहासिक उच्चांकीवर पोचला आहे आणि अमेरिकेतील बॉंडच्या परताव्यातदेखील वाढ झाली आहे. या तिन्ही घटकांचा परिणाम होत सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याबद्दल सध्या नकारात्मक कल आहे. 

आता तज्ज्ञ काय म्हणतात? त्यामुळे सोन्याच्या वाढत्या किमतीबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जागतिक बाजारपेठेत डॉलरच्या वाढत्या ताकदीचा परिणाम सोन्या-चांदीच्या भावावरही दिसून येईल. आणि याच दबावाखाली सोन्याचा भाव एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. बाजारातील वातावरणानुसार, गुंतवणूकदार सध्या फक्त डॉलरमध्ये गुंतवणूक करत आहेत, तर सोन्यात विक्री करत आहेत. त्याचबरोबर भारतीय बाजारपेठेत सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात वाढ केल्यानंतर त्याचा वापर कमी झाला आहे. म्हणजेच सोन्याच्या भावात आणखी घसरण दिसून येते.

आता जागतिक बाजारपेठेकडे लक्ष दिले असता आज जागतिक बाजारातही सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली असून ती एका वर्षातील नीचांकी पातळीवर गेली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी