Gold Price Today 19 April 2022 update : नवी दिल्ली : जागतिक घटकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भारतात सोन्याच्या भावात घसरण झाली. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याचा भाव (Gold Price) 0.13 टक्क्यांनी 10 टक्क्यांनी घसरून 52,560 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गुरुवारी चांदीचा भावही घसरला. चांदीचा भाव (Silver Price) 0.33 टक्क्यांनी घसरून एक किलोग्रामसाठी 68,180 रुपयांवर आला. सध्या भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. या काळात सोन्याच्या मागणीत वाढ होत असते. त्यामुळे सोन्याच्या भावात तेजी येते. मात्र आंतरराष्ट्रीय घटकांच्या दबावामुळे सोन्याच्या भावात घसरण होते आहे. विशेषत: अमेरिकन बॉंड्सचा परतावा आणि अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी यांचा मोठा परिणाम सोन्याच्या भावावर होतो आहे. (Gold continues to fall on 4th consecutive day, Should you buy it?)
अधिक वाचा : Real Estate update | जाणून घ्या, कोणती शहरे घर खरेदीसाठी आहेत सर्वात स्वस्त आणि महाग
अमेरिकेच्या ट्रेझरी उत्पन्नात तेजी आल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी सोन्याचे भाव कमी झाले. स्पॉट गोल्ड 0.3 टक्क्यांनी घसरून 1,951.76 डॉलर प्रति औंस इतका होता. अमेरिकन सोने फ्युचर्स 0.1 टक्क्यांनी घसरून 1,954.50 डॉलरवर आले. अमेरिकेच्या 10 वर्षांच्या ट्रेझरीच्या म्हणजे बॉंडच्या (US Treasury yields) परताव्यात वाढ झाली आहे. कारण गुंतवणुकदारांना महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (US Federal Reserve)व्याजदर वाढवण्याची अपेक्षा होती.
अधिक वाचा : PM Kisan update | पीएम किसान योजनेत तुम्ही ही चूक तर केली नाही ना? नोटीस पाठवून केली जातेय वसुली!
गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. कारण अमेरिकन बॉंड्सचा वाढलेला परतावा आणि डॉलरच्या वाढीचा दबाव सोन्याच्या भावावर आला आहे. सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. सकाळी 9.37 वाजता, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याचे कॉन्ट्रॅक्ट 0.07 टक्क्यांनी घसरले. सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 52,592 रुपयांवर होता तर चांदी 0.31 टक्क्यांनी घसरून 68,194 रुपये प्रति किलोग्रॅमवर आली होती.
अधिक वाचा : Unemployment Allowance | 'हे' सरकार बेरोजगार तरुणांना दर महिन्याला देते 7,500 रुपये, असा करा अर्ज
आज सोने आणि चांदीच्या भावावर अमेरिकेतली रोजगाराची आकडेवारी आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या भाषणाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. सोन्याच्या भावात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. सोन्याची 51,100 रुपयांच्या पातळीवर तर चांदीची 67,400 रुपयांची पातळी चाचपणी होण्याची शक्यता आहे. मात्र रशिया-युक्रेन शांतता चर्चेच्या अंदाजामुळे सोने-चांदीच्या भावातील घट मर्यादित राहू शकते, असे जाणकारांना वाटते आहे. बुधवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली कारण अमेरिकन डॉलरची किंमत कमी झाली होती. आंतरराष्ट्रीय सोने प्रति औंस 1,955.60 डॉलरवर स्थिरावले, 0.17% ने कमी झाले. तर चांदी 0.47% घसरून 25.27 डॉलर प्रति औंसवर स्थिरावली. देशांतर्गत बाजारात सोने 0.23 टक्क्यांनी घसरून 52,628 रुपयांवर आणि चांदी 0.53 टक्क्यांनी घसरून 68,406 रुपयांवर स्थिरावली.