RBI चा मोठा निर्णय! गोल्ड स्कीमशी निगडीत नियमात केला बदल, गुंतवणुकदारांवर थेट परिणाम

Gold Deposit Scheme: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) मूळ ठेवीदार किंवा डिपॉझिटरचा किंवा गुंतवणुकदाराचा (Original Depositor) मृत्यू झाल्यास लॉक इन पीरियडच्या आधी गोल्ड मोनेटायझेशन स्कीम (Gold Monetization Scheme)अंतर्गत मुदतीपूर्वीच गुंतवणूक किंवा पैसे काढून घेण्यास परवानगी दिली आहे.

RBI on Gold Deposit Scheme
आरबीआयकडून गोल्ड डिपॉझिट स्कीमच्या नियमात बदल 
थोडं पण कामाचं
  • आरबीआयकडून गोल्ड डिपॉझिट स्कीमच्या नियमात बदल
  • मूळ ठेवीदार किंवा डिपॉझिटरचा किंवा गुंतवणुकदाराचा (Original Depositor) मृत्यू झाल्यास लॉक इन पीरियडच्या आधी पैसे काढता येणार
  • मुदतीपूर्वी पैसे काढून घेतल्यास व्याजदरात होणार कपात

Gold Deposit Scheme | मुंबई: गोल्ड डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी (Gold Deposit Scheme) महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) मूळ ठेवीदार किंवा डिपॉझिटरचा किंवा गुंतवणुकदाराचा (Original Depositor) मृत्यू झाल्यास लॉक इन पीरियडच्या आधी गोल्ड मोनेटायझेशन स्कीम (Gold Monetization Scheme)अंतर्गत मुदतीपूर्वीच गुंतवणूक किंवा पैसे काढून घेण्यास परवानगी दिली आहे. या स्कीमध्ये मुदतीपूर्वीच गुंतवणूक काढून घेता येत होती मात्र त्यासाठी लॉक इन पीरियड होता. म्हणजे ३ किंवा ५ वर्षांच्या लॉक इन पीरियडआधी गुंतवणूक काढून घेता येत नव्हती. (Gold Deposit Scheme : RBI changes the rules regarding the Gold Deposit Scheme, direct impact on investors)

मुदतीआधीच पैसे काढल्यास किती व्याजदर मिळणार

आरबीआयने दिलेल्या सवलतीनुसार जर गुंतवणुकदार किंवा ठेवीदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील सदस्य  काही व्याज सोडून उर्वरित रक्कम मुदतीपूर्वीच काढून घेऊ शकतात. मीडियम टर्म गोल्ड डिपॉझिट स्कीमच्या प्रकरणात लॉक इन पीरियड ३ वर्षे असतो. जर अशा प्रकरणात गुंतवलेली रक्कम सहा महिन्यांच्या आत काढून घेण्यात आली तर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. सहा महिने ते १ वर्ष या कालावधीत गुंतवणूक काढून घेण्यास आल्यास मिळणारा व्याजदर हा मूळ व्याजदरापेक्षा (सध्या २.२५ टक्के)कमी म्हणजे शून्य ते १.२५ टक्के असणार आहे. लॉंगटर्म गोल्ड डिपॉझिट स्कीमसाठी लॉक इन पीरियड ५ वर्ष असतो. यावर २.५० टक्के व्याजदर आहे. जर गुंतवणूक एक वर्षाच्या आत काढून घेतली तर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. 

एक वर्ष ते २ वर्षे यांच्यादरम्यान जर गुंतवणूक काढून घेण्यास आली तर डिपॉझिट रेटमध्ये १ टक्के कपात केली जाईल. याचप्रकारे दोन वर्षे ते तीन वर्षे या दरम्यान जर गुंतवणूक काढून घेण्यात आली तर व्याजदर शून्य ते ०.७५ टक्क्यांनी कमी केला जाईल. तर ३ ते ५ वर्षांदरम्यान जर गुंतवलेली रक्कम काढून घेण्यात आली तर व्याजदरात ०.२५ टक्के कपात केली जाणार आहे.

पेनल्टी कुठे लागणार

मीडियम टर्म गोल्ड डिपॉझिट स्कीम आणि लॉंग टर्म गोल्ड डिपॉझिट स्कीम ५-७ वर्षे आणि १२-१५ वर्षांच्या कालावधीसाठी असतात. त्यामुळेच लॉक इन पीरियडनंतरदेखील जर गुंतवणूक काढून घेण्यात आली तर ती मुदतपूर्व प्रक्रियाच समजली जाईल. अशा प्रकारात मूळ ठेवीदार किंवा गुंतवणुकदाराच्या कुटुंबातील सदस्यांनादेखील पेनल्टी भरावी लागेल.गोल्ड डिपॉझिट स्कीम ही गुंतवणुकदारांमध्ये लोकप्रिय असते. सोन्याशी निगडीत गुंतवणूक ही नेहमीच आकर्षक असते. गुंतवणुकदार मृत झाल्यानंतर त्याने केलेल्या गुंतवणुकीसंदर्भात अनेकवेळा तांत्रिक अडचणी निर्माण होतात. या प्रकाराला अधिक सुलभ करण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलेले आहे. गोल्ड डिपॉझिट स्कीमध्ये एकूण कालावधी, व्याजदर आणि लॉक इन पीरियड या महत्त्वाच्या बाबी असतात.

गोल्ड डिपॉझिट स्कीम

ग्राहकांकडे किंवा नागरिकांकडे जे सोने घरातच किंवा लॉकरमध्ये पडून असते, वापरात नसते अशा सोन्याला बॅंकाकडे ठेवीच्या रुपात ठेवता येते. यावर बॅंका नागरिकांना व्याज देतात. यावर करसवलतदेखील मिळते. शिवाय सोने बॅंकांकडे सुरक्षित राहते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी