नवी दिल्ली : सोन्याचा दर पुन्हा वाढू लागला आहे. गुरुवारी, एमसीएक्सवर ऑगस्ट डिलिव्हरीसाठीचे सोने 91 रुपयांच्या वाढीसह उघडले परंतु दुपारी 12 नंतर ते 189 रुपयांनी वधारले. बातमी लिहिण्यापर्यंत ती प्रति 10 ग्रॅम 47028 रुपये होती. त्याचबरोबर चांदीची किंमतही वाढत आहे. जुलै डिलीव्हरीचा चांदीचा भाव 498 रुपयांनी वाढून 68,633 रुपये प्रतिकिलोवर होता.
बुधवारी सकाळच्या कमकुवत मागणीमुळे सट्टेबाजांनी त्यांच्या सौद्यात घट केली. त्यामुळे स्थानिक फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचे दर बुधवारी 15 रुपयांनी घसरले आणि 46,540 रुपये प्रति १० ग्रॅमवर गेले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर ऑगस्टमध्ये डिलीव्हरीसाठी असलेले सोन्याचे भाव 15 रुपयांनी म्हणजे 0.03 टक्क्यांनी घसरून 46,540 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्यात 11,409 लॉटची उलाढाल होती.
बाजाराचे विश्लेषक म्हणाले की, व्यापाऱ्यांनी सौद्यांच्या संख्येत घट केल्यामुळे सोन्याच्या वायदा किंमत नुकसान झाले. जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 0.39 टक्क्यांनी घसरून 1,756.70 डॉलर प्रति औंस झाले.
बुधवारी चांदीचे भाव 116 रुपयांनी वाढून, 68,390 रुपये प्रतिकिलोवर बंद झाले. मजबूत हाजीर मागणीमुळे व्यापाऱ्यांनी आपल्या सौद्यांची संख्या वाढवल्याने चांदीत तेजी दिसून आली.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सप्टेंबरच्या डिलीव्हरीची चांदीचा वायदाचा भाव 116 रुपये म्हणजे 0.17 टक्क्यांनी वाढून 68,390 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. फ्युचर्स कराराचा व्यवहार 11,869 लॉटमध्ये झाला.
बाजार विश्लेषकांनी सांगितले की देशांतर्गत बाजारात दृढ कल असल्याने व्यापऱ्यांनी सौद्यांच्या संख्यात वाढ केली. त्यामुळे वायदा व्यापारात चांदीचे दर वाढले. जागतिक पातळीवर मात्र न्यूयॉर्कमध्ये चांदीची किंमत 0.22 टक्क्यांनी घसरून 25.85 डॉलर प्रति औंस झाली.