Gold Jewelley For Weedding : लग्न सोहळ्याला EMIवर खरेदी करू शकतात सोन्याचे दागिने

काम-धंदा
भरत जाधव
Updated Nov 30, 2022 | 11:40 IST

Buy Jewellery In EMI: दिवसेंदिवस सोन्याचे दर गगनाला भिडू लागले आहेत. यामुळे सर्वसामान्याचे सोनं घेण्याचं स्वप्न हे अपूर्ण राहत आहे. परंतु आम्ही तुम्हाला अशी एक योजना सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुमचं सोनं घेण्याचं स्वप्नही पूर्ण होणार आणि पैसेही कमी लागणार. अर्था सोन्याच्या दागिन्याचे जेवढी किमत आहे, तितके पैसे द्यावे, लागतील परंतु एकाचवेळी सर्व पैसे देण्याची गरज नाही.

Gold Jewelery on EMI:Buy Gold Jewelery On EMI, Wedding Season 2022
लग्न सोहळ्याला EMIवर खरेदी करू शकतात सोन्याचे दागिने   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सोने ईएमआयवर खरेदी करत असाल तर तुम्हाला आजच सर्व पैसे देण्याची गरज नाही.
  • डबल रेट गोल्ड प्रोटेक्शनमुळे तुम्हाला वाढलेल्या दराप्रमाणे पैसे देण्याची गरज राहणार नाही.
  • सोने- किंवा हिऱ्यांचे दागिने घेताना तुम्हाला आधी 10 ते 20 टक्के रक्कम डाउन पेमेंट म्हणून भरावी लागेल.

Buy Gold-Diamond Jewellery In EMI: लग्नसराईचा (Wedding ceremony) हंगाम सुरू झाला आहे. तुमच्या घरात किंवा नातेवाईकाच्या घरी लग्न सोहळा असतात, परंतु या सोहळ्यात जाण्यासाठी माता-भगिनींकडे दागिने (Jewellery)नसतात. दागिने नसल्याने महिलांचे सौंदर्य खुलून येत नाही. अनेक महिलांना चारचौघींमध्ये जाणे कमीपणाचे वाटत असते. सोन्याच्या दागिन्याचे दर दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. या वाढत्या किमतीमुळे तुम्हाला दागिने घेणे हे परवडणारे नसते. महागडे सोने तुमचे बजेट बिघडवत असते. यामुळे अनेक महिला दागिने घेण्याचा निर्णय रद्द करत असतात. आज आम्ही अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत, ज्यातून ते दागिने घडविण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. (Gold jewelery can be bought on EMI for weddings)

अधिक वाचा  :  व्हॉट्सअ‍ॅपने लॉंच केले एक नवीन धमाल फीचर, स्वत:ला मेसेज करा
ज्याप्रमाणे तुम्ही घर किंवा कार किंवा इतर ग्राहकोपयोगी वस्तू EMI मध्ये खरेदी करत आहात, त्याचप्रमाणे तुम्ही EMIभरून या लग्नाच्या हंगामात सोने किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करू शकता. हो, अगदी खरं या योजनेविषयी आपण जाणून घेणार आहोत. 

EMIवर सोने किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करण्याचे  फायदे 

सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. मंगळवार 29 नोव्हेंबर 2022 रोजी सोन्याचा भाव 52,478 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. जर तुम्ही सोने ईएमआयवर खरेदी करत असाल तर तुम्हाला आजच सर्व पैसे देण्याची गरज नाही.  दागिन्याचे पैसे देण्यासाठी तुम्हाला 6 ते 9 महिन्याचा कालावधी दिला जाईल. जर समजा हप्ता भरत असताना जर सोन्याचा दर वाढला तरी तुम्हाला त्याचे जास्त पैसे द्यावे लागणार नाही. डबल रेट गोल्ड प्रोटेक्शनमुळे तुम्हाला वाढलेल्या दराप्रमाणे पैसे देण्याची गरज राहणार नाही. परंतु सोने- किंवा हिऱ्यांचे दागिने घेताना तुम्हाला आधी 10 ते 20 टक्के रक्कम डाउन पेमेंट म्हणून भरावी लागेल.

अधिक वाचा  :  व्यवसायासाठी सरकार 'या' योजनेतून देईल 10 लाख रुपयांचे कर्ज

येथे EMIवर दागिने उपलब्ध

देशात अनेक ज्वेलर्स आहेत परंतु सर्वच EMI वर सोने किंवा हिऱ्याचे दागिने विकत नाहीत. तुम्ही EMI वर सोने किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कल्याण ज्वेलर्सचे Candere तुम्हाला हा पर्याय उपलब्ध करून देते. याशिवाय तुम्ही Melorra कडून EMI मध्ये दागिने देखील खरेदी करू शकता.  या दोन कंपन्यांशिवाय,  Augmont मधूनदेखील सोन्याचे दागिने EMIद्वारे खरेदी करता येतील. orraकडूनही EMI द्वारे हिऱ्याचे दागिने खरेदी करू शकतात. 

कशी कराल खरेदी

Melorra कंपनी ग्राहकांना EMI पर्यायांतर्गत दागिने खरेदी करण्याचा पर्याय मिळत असतो. आता तुमच्या म्हणाल की, अधिक किमतीचे दागिने घ्यावी लागत असतील. पण तुम्ही 10 हजारापासून ते 10 लाख रुपयांपर्यंतचे दागिने हप्त्यावर घेऊ शकतात. ग्राहक 6 महिने, 9 महिने आणि 12 महिन्यापर्यंत आपण या दागिन्याचे पैसे किंवा हप्ते भरू शकतो. हप्त्याच्या या तिन्ही पर्यायापैकी ग्राहक एक पर्याय निवडू शकतो. ईएमआयवर सोनं घेत असताना ग्राहकांना पहिल्यावेळेस 10 ते 20 रक्क भरावी लागेल. त्यानंतर ECS द्वारे बँक खात्यातून पैसे कापले जातील.  

अधिक वाचा  : सरकारी योजनेद्वारे मॅरेज सर्टिफिकेटवर मिळणार 2.50 लाख

Melorraने  यासाठी वित्तीय कंपन्यांशी करार केला आहे. ईएमआय सुविधेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना पॅन,आधार, पत्त्याचा पुरावा आणि उत्पन्नाच्या पुराव्याची प्रत सादर करावी लागेल.  Melorra पेमेंटची चिंता सोडून ग्राहक सहजपणे EMI द्वारे दागिने खरेदी करू शकतात कल्याण जवेलर्सच्या Candereमधूनही  सोने आणि हिऱ्याचे दागिने देखील EMI वरून खरेदी करता येतात. ज्यामध्ये आकर्षक डबल रेट गोल्ड प्रोटेक्शन (DGRP) प्लॅनसह पेमेंट पर्याय उपलब्ध करुन दिला जातो.  सोन्यासाठी 2 ते 6  आणि हिऱ्यांसाठी 2 ते 12 महिन्यांपर्यत हप्त्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. शून्य प्रक्रिया शुल्कासह केवळ 10% भरून तुम्ही दागिन्यांचे मालक होऊ शकता. 

Candere ऐवजी  Augmontमधूनही हप्त्याने तुम्ही सोने आणि हिऱ्याचे दागिने खरेदी करू शकतात. यासाठी 20 टक्के रक्कम बुकिंग म्हणून भरावी लागेल. तर उर्वरित रक्कम 3, 6 किंवा 9 EMIमध्ये भरावी लागेल.पैसे भरल्यानंतर, ग्राहकाचे दागिने वितरित केले जातात. सोन्याच्या किमतीतील चढउतारांचाही खरेदीवर परिणाम होत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी