Gold in Bank Locker: बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेलं सोनं किती सुरक्षित? जाणून घ्या काय आहेत नियम

Gold in Bank locker: आपल्याकडील सोन्याचे दागदागिने अनेकजण हे बँकेतील लॉकरमध्ये ठेवतात. मात्र, बँकेतील लॉकरमध्ये ठेवण्यात आलेलं हे सोनं किती सुरक्षित आहे? या संदर्भात आरबीआयची काय नियमावली आहे? वाचा.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • १ जानेवारी २०२२ पासून देशभरात बँक लॉकर्स नियम लागू झाले
  • तुमच्या बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या सर्व वस्तूंची यादी तुमच्याकडे असावी
  • ग्राहकांनी आपल्या लॉकरच्या संदर्भातील शुल्क वेळेवर भरावे

Gold ornaments in Bank locker: आपल्यापैकी अनेकजण सोने-चांदीचे दागिने खरेदी करतात. सोन्यात केलेली गुंतवणूक ही अडचणीच्या काळात उपयोगी ठरत असते आणि त्यामुळेच नागरिक सोन्यात गुंतवणूक करण्यावर भर देतात. मात्र, घरात सोन्याचे दागिने ठेवण्यापेक्षा बँकेतील लॉकरमध्ये ठेवण्यास नागरिक प्राधान्य देतात. पण सोन्या-चांदचे हे मौल्यवान दागिने बँकेतील लॉकरमध्ये किती सुरक्षित आहेत? (Gold kept in bank locker know how it is safe and what is rules read in marathi)

चोरी होण्याच्या भीतीने अनेकजण सोने-चांदीचे दागिने बँकेतील लॉकरमध्ये ठेवतात. पण लॉकरमध्ये ठेवलेले मौल्यवान दागिने चोरीला गेले किंवा बँकेच्या निष्काळजीपणामुळे गायब झाले तर? तुम्हीही बँकेतील लॉकरमध्ये सोन्याचे दागिने, हिरे, चांदीच्या वस्तू ठेवल्या असतील किंवा बँकेतील लॉकरमध्ये मौल्यवान दागिने ठेवण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी तुम्हाला आरबीआयची लॉकरच्या संदर्भातील नियमावली माहिती असणे आवश्यक आहे.

अधिक वाचा : Salary Hike in 2023: खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, पुढील वर्षी पगारात होणार इतकी मोठी वाढ

लॉकरची सुरक्षा बँकांची 

आरबीआयच्या नवीन नियमांनुसार आता ग्राहकांना चिंता करण्याची गरज नाही. कारण, बँकेच्या निष्काळजीपणामुळे लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे नुकसान झाल्यास बँक पैसे देण्यास पात्र असेल. रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेत म्हटलेय की, "ज्या बँकेत तुमचे लॉकर आहे त्या बँकेची जबाबदारी आहे की तुमच्या लॉकरच्या सुरक्षेसाठी सर्व योग्य ती खबरदारी आणि पावले उचलणे"

अधिक वाचा : GST On House Rent: घरभाड्यावर लागणार 18 टक्के जीएसटी, कोणाला भरावा लागणार हा जीएसटी...

नुकसान भरपाई मिळते का? 

बँकेच्या निष्काळजीपणामुळे, चुकीमुळे बँकेच्या आवारात आग लागणे, चोरी होणे, दरोडा, इमारत कोसळण्याच्या सारख्या घटना घडू नयेत आणि त्या संबंधी योग्य ती काळजी घेणे बँकांची जबाबदारी असते. बँक असा दावा करु शकत नाहीत की, लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या सामानासाठी ते त्यांच्या ग्राहकांवर कोणतेही दायित्व ठेवत नाहीत. अशा प्रकारच्या घटनांमुळे ग्राहकांचे नुकसान झाल्यास लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या १०० पट पर्यंत बँकांचे दायित्व असेल.

अशा परिस्थितीत बँक नुकसान भरपाई देणार नाही

केंद्रीय बँकांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, जर भूकंप, पूर, वीज कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे किंवा ग्राहकाच्या कोणत्याही चुकीमुळे, निष्काळजीपणामुळे लॉकरमधील सामग्री, साहित्याचे नुकसान झाल्यास बँक जबाबदार राहणार नाही. तसेच अशा प्रकारच्या आपत्तींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी बँकांनी त्यांच्या लॉकर सिस्टमची योग्य खबरदारी घेतली पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी